Qualcomm - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 08 Oct 2020 13:28:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लेटेस्ट आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह Qualcomm लॉन्च करेल आपला गेमिंग स्मार्टफोन! https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-to-launch-gaming-phone-in-partnership-with-asus/ https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-to-launch-gaming-phone-in-partnership-with-asus/#respond Thu, 08 Oct 2020 13:28:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8439 कंपनी 1 डिसेंबरला एका इवेंटचे आयोजन करणार आहे, ज्यात कंपनी आपली आपला नवीन Snapdragon 875 SoC लॉन्च करणार आहे. आशा आहे कि या इवेंट मध्ये कंपनी स्मार्टफोन संबंधित माहिती पण देऊ शकते.

The post लेटेस्ट आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह Qualcomm लॉन्च करेल आपला गेमिंग स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक वर्ल्ड मध्ये मोबाईल गेमिंगचा व्यवसाय वाढत आहे आणि ते पाहून आता मोबाईल फोन निर्माता कंपन्या त्यानुसार फोन डिजाइन करत आहेत, जे यूजर्सना शानदार गेमिंग एक्सपीरियंस देऊ शकतील. तसेच समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टनुसार चिपसेट बनवणारी कंपनी क्वालकॉम कथितरित्या आपल्या स्वतःचा गेमिंग स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. सध्या Qualcomm च्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही, पण कंपनी 1 डिसेंबरला एका इवेंटचे आयोजन करणार आहे, ज्यात कंपनी आपली आपला नवीन Snapdragon 875 SoC लॉन्च करणार आहे. आशा आहे कि या इवेंट मध्ये कंपनी स्मार्टफोन संबंधित माहिती पण देऊ शकते.

टेक वेबसाइट Digitimes ने इंडस्ट्री सूत्रांकडून याची माहिती दिली आहे कि क्वालकॉम आसुस सोबत मिळून एक गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे कि हा अपकमिंग हँडसेट क्वालकॉम ब्रॅंडिंग अंतर्गत लॉन्च होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनचे मुख्य एलिमेंट्स आसुस द्वारे तयार केले जात आहेत.

असे बोलले जात आहे कि आसुस आणि क्वालकॉम या प्रोजेक्ट वर एकत्रित काम करत आहेत, त्यामुळे हा स्मार्टफोन Republic of Gamers अंतर्गत पण येऊ शकतो. पण आता काही बोलणे चुकीचे ठरेल.

अलीकडेच Nvidia ने ARM ला विकत घेतले होते. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Nvidia माली जीपीयूला आपल्या डिजाइनशी रिप्लेस करू शकते, जो GeForce ब्रॅंडिंग सह येईल. तसेच स्नॅपड्रॅगॉन 875 SoC मध्ये एड्रिनो सीरीज जीपीयू मिळू शकतो.

ASUS ने काही दिवसांपूर्वी भारतात आरओजी फोन 3 चा अजून एक नवीन रॅम व स्टोरेज वेरिएंट लॉन्च केला आहे. Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 52,999 रुपये ठेवण्यात आली आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. असूस आरओजी फोन 3 चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 57,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The post लेटेस्ट आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह Qualcomm लॉन्च करेल आपला गेमिंग स्मार्टफोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-to-launch-gaming-phone-in-partnership-with-asus/feed/ 0
आता स्वस्त मोबाईल मध्ये पण असेल 5G, बदलेल स्मार्टफोन्सची दुनिया https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-snapdragon-700-600-series-mid-range-5g-chipset-oppo-vivo-realme-redmi-motorola-lg/ https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-snapdragon-700-600-series-mid-range-5g-chipset-oppo-vivo-realme-redmi-motorola-lg/#respond Mon, 09 Sep 2019 09:09:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5253 हे ब्रँड्स साल 2020 च्या सुरवातीला स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आणू शकतात.

The post आता स्वस्त मोबाईल मध्ये पण असेल 5G, बदलेल स्मार्टफोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 स्मार्टफोन्स साठी खूप नवीन बदल घेऊन आला आहे. गेल्या वर्षी 4G नेटवर्क आणि 4G एलटीई सपोर्ट असणारे स्मार्टफोन्स बाजारात आले होते ता यावर्षी हे फीचर स्वस्त स्मार्टफोन्स मध्ये पण आले आहे. स्वस्त 4G फोन सोबतच यावर्षी 5G सपोर्ट असलेले स्मार्टफोन्स पण आले आहेत. हे 5G स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले आहेत ज्यांची किंमत जास्त आहे. पण आता लवकरच 5G सपोर्ट असलेले स्वस्त स्मार्टफोन्स पण बाजारात येणार आहेत.

Qualcomm म्हणजे मोबाईल चिपसेट बनवणाऱ्या दिग्गज टेक कंपनीने काल अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन चिपसेट सादर केला आहे. कंपनीने Snapdragon 700 सीरीजचा एक नवीन चिपसेट सादर केला आहे जो 5G baseband ला सपोर्ट करतो. या नवीन चिपसेटच्या घोषणेसोबतच क्वालकॉम ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी कमी रेंज मधील चिपसेट घेऊन येणार आहे जो 5G सपोर्टेड असेल.

5G कनेक्टिविटी आणि सपोर्ट असलेले हे चिपसेट क्वालकॉमच्या Snapdragon 700 आणि Snapdragon 600 सीरीज मध्ये येतील. विशेष म्हणजे सध्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 800 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट 5G ला सपोर्ट करतो जो हाईएंड डिवाईसेज मध्ये आहे. पण स्नॅपड्रॅगॉन 700 आणि 600 सीरीज मध्ये येणारे 5G सपोर्टेड चिपसेट मीड रेंज डिवाईसेज साठी बनवले जातील आणि हे 5G चिपसेट असलेले स्मार्टफोन पण कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

हे देखील वाचा: Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे

12 ब्रँड आणतील स्वस्त 5G फोन

साहजिकपणे जर कमी किंमतीत 5G फोन बनले तर जास्तीत जास्त यूजर हि लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतील. त्यामुळे स्मार्टफोन ब्रँड्स आणि कंपन्या पण मागे राहणार नाहीत. रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि 12 स्मार्टफोन ब्रँड् ने 5G सपोर्ट असलेल्या Snapdragon 700 आणि 600 सीरीजच्या चिपसेट साठी क्वालकॉमशी हातमिळवणी केली आहे. या कंपन्यांमध्ये Oppo, Realme, Redmi, Vivo, Motorola, HMD Global आणि LG Electronics यांचा समावेश आहे. हे ब्रँड्स साल 2020 च्या सुरवातीला स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आणू शकतात.

5G सह हे फीचर्स पण असतील खास

क्वालकॉम ने अजूनतरी 5G टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या Snapdragon 700 आणि Snapdragon 600 सीरीजच्या चिपसेटच्या नावाचा खुलासा केला नाही किंवा सविस्त माहिती सांगितली नाही. पण क्वालकॉम म्हणते कि हा आगामी चिपसेट 5G फंक्शन सह येणारा system-on-chip इंटिग्रेटेड चिपसेट असेल जो जवळपास सर्व मेजर रिजन आणि मेजर फ्रिक्वेंसीवर चालू शकेल. कंपनी नुसार Snapdragon 700 सीरीजचे 5G चिपसेट 7नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर प्रोसेस करतील तसेच नेक्स्ट जेनरेशन एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजन सह चालेल. क्वालकॉम नुसार हे स्नॅपड्रॅगॉन चिपसेट ऐलिट गेमिंग फीचर्स सह येतील.

हे देखील वाचा: OnePlus चा यूनिक आणि स्टाईलिश Smart Remote आला समोर, येत आहे Smart TV

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बर्लिन मध्ये आयोजित IFA 2019 ईवेंट मध्ये Samsung ने पण आपला 5G चिपसेट लॉन्च केला आहे जो Exynos 980 नावाने बाजारात येईल. त्याचबरोबर Huawei ने पण आपला 5G सपोर्ट असलेला सर्वात पावरफुल चिपसेट Kirin 990 पण अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे.

The post आता स्वस्त मोबाईल मध्ये पण असेल 5G, बदलेल स्मार्टफोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-snapdragon-700-600-series-mid-range-5g-chipset-oppo-vivo-realme-redmi-motorola-lg/feed/ 0
या स्मार्टफोन कंपन्या घेऊन येत आहेत सुपर स्पीड वाले 5जी स्मार्टफोन, बघा त्यांची यादी https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-list-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-list-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 08:34:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2608 23 ऑक्टोबरला क्वालकॉम ने 4जी/5जी समिट 2018 चे आयोजन केले होते आणि त्यात ओपो, वीवो, वनप्लस आणि नोकिया सहित अनेक इतर कंपन्यांनी 2019 मध्ये आपला 5जी फोन लॉन्च करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

The post या स्मार्टफोन कंपन्या घेऊन येत आहेत सुपर स्पीड वाले 5जी स्मार्टफोन, बघा त्यांची यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2जी नंतर 3जी आणि आता मोबाईल वर 4जी नेटवर्क चालत आहे. 2जी फक्त कॉलिंग आणि स्लो डेटा साठी ओळखला जात होता. तर 3जी आल्या नंतर इंटनेट मध्ये जीव आला आणि लोक मोबाईल वरूनच सेवा वापरू लागले. आता फोन वर 4जी चालू आहे, फास्ट इंटरनेटने कम्यूनिकेशन सिस्टमच बदलून टाकली आहे. असे असूनही लोक अजूनही स्लो इंटरनेटची तक्रार करत आहेत. परंतु लक्षात घ्या कि लवकरच तुमच्या हातात 5जी फोन असेल आणि तुम्ही सुपरफास्ट इंटरनेट वापरू शकाल. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर अनेक कंपन्यांनी आपल्या 5जी फोनची माहिती दिली आहे. 2019 पर्यंत भारता सहित जगातील अनेक देशांमध्ये 5जी फोन उपलब्ध होतील.

23 ऑक्टोबरला क्वालकॉम ने 4जी/5जी समिट 2018 चे आयोजन केले होते आणि त्यात ओपो, वीवो, वनप्लस आणि नोकिया सहित अनेक इतर कंपन्यांनी 2019 मध्ये आपला 5जी फोन लॉन्च करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर काही कंपन्यांनी याची घोषणा आधीच केली होती. खाली आम्ही त्या फोन्सची संपूर्ण यादी दिली आहे ज्यांमध्ये सर्वात आधी 5जी सेवा उपलब्ध होईल.

1. शाओमी मी मिक्स 3 (5जी फोन)
25 ऑक्टोबर 2018 ला शाओमी मी मिक्स 3 चीन मध्ये लॉन्च करत आहे आणि लॉन्चच्या आधी कंपनीने सांगितले आहे कि या फोन मध्ये 5जी सपोर्ट असेल. हा फोन भारतात येईल कि नाही हे अजून निश्चित नाही पण कंपनीने आपला 5जी फोन लॉन्च करून इतर कंपन्यांना आव्हान दिले आहे.

2. सॅमसंग 5जी फोन
बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 5जी सपोर्ट सह सादर केला जाऊ शकतो. मागील काही लीक्स मध्ये असा दावा करण्यात आला होता. तुम्हाला तर माहितीच आहे कि कंपनीचा फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरीज क्वालकॉम च्या लेटेस्ट चिपसेट सह येतो आणि पुढल्या वर्षी त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 असेल ज्यात 5जी क्षमता असेल. त्यामुळे गॅलेक्सी एस10 मध्ये सुपर फास्ट 5जी सपोर्ट असण्याची शक्यता जास्त आहे.

3. एलजी 5जी फोन
प्रमुख कोरियन मोबाईल फोन निर्माता कंपनी एलजीने 2018 च्या सुरवातीलाच माहिती दिली होती कि 2019 च्या सुरवातीला एलजी आपला 5जी फोन लॉन्च करू शकते. तसेच क्वालकॉम इवेंट मध्ये पण कंपनीने याची माहिती दिली आहे. आशा आहे कि एलजी जी8 थिंक मध्ये 5जी सपोर्ट असेल.

4. वनप्लस 5जी फोन
क्वालकॉम इवेंट मध्ये वनप्लस ने सांगितले कि 2019 मध्ये लॉन्च होणारा कंपनीचा फोन 5जी रेडी असेल. त्यामुळे आशा आहे कि कंपनीच्या वनप्लस 7 मध्ये 5जी सपोर्ट असेल. बोलले जात आहे कि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट वर आधारित असेल.

5. वीवो 5जी फोन
प्रमुख चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवोने पण घोषणा केली आहे कि 2019 पर्यंत ते आपला 5जी फोन लॉन्च करतील. कंपनी वी13 किंवा मग नेक्स सीरीज पासून कंपनी 5जी फोनची सुरवात करू शकते. तसेच कंपनीने सांगितले आहे कि 2020 पर्यंत 5जी स्मार्टफोनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. मोठ्या प्रमाणवर उत्पादन झाल्यामुळे कॉस्ट कमी होते. त्यामुळे 2020 पर्यंत 5जी फोन स्वस्तात उपलब्ध होतील.

6. ओपो 5जी फोन
असे होईल का कि वीवो 5जी फोन लॉन्च करेल आणि ओपो मागे राहील. ओपो ने काही महिन्यांपूर्वी याची माहिती दिली होती कि 2019 पर्यंत त्यांचा 5जी फोन लॉन्च होईल. कंपनीचे असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट शेन यीरेन यांनी सांगितले होते कि 2019 पर्यंत कपंनी 5जी फोनचे मास प्रोडक्शन करेल. फोनचे नाव सांगण्यात आले नाही पण ओपो याची सुरवात आपल्या फ्लॅगशिप फोन पासून करेल. आशा आहे कि एफ11 म्हणजे फाइंड सीरीज पासून याची सुरवात होईल.

7. नोकिया 5जी फोन
5जी फोनच्या या शर्यतीत एचएमडी ग्लोबल ब्रांड नोकिया पण मागे नाही. क्वालकॉम 4जी/5जी समिट मध्ये हॉन्गकॉन्ग मध्ये नोकियाने सांगितले कि ते पण 2019 मध्ये आपला 5जी फोन घेऊन येत आहे. त्यामुळे कंपनी नोकिया 9 पासून याची सुरवात करण्याची शक्यता आहे.

8. लेनोवो 5जी फोन
मोटोरोलाचे मालकी हक्क असणारी कंपनी लेनोवोने आधीच सांगितले होते कि सर्वात आधी 5जी फोन तेच घेऊन येतील. कंपनीने काही महिन्यांपूर्वी मोटो झेड3 लॉन्च केला आहे जो 5जी रेडी आहे. हा जगातील पहिला फोन आहे जो 5जी मॉड्यूलला सपोर्ट करतो. तसेच कंपनी ने सांगितले आहे कि 2019 मध्ये त्यांचा नवीन 5जी फोन येईल.

9. हुआवई 5जी फोन
काही महिन्यांपूर्वी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवई ने माहिती दिली होती कि 2019 च्या सुरवातीला कंपनी आपला 5जी फोन घेऊन येईल. हा फोन हुआवई च्याच मॉडम वर असेल. तसेच काही लीक्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हुआवईचा 5जी फोन फोल्डेबल असेल. हुआवई सोबतच ब्रांड आॅनर पण आपला 5जी फोन घेऊन येऊ शकतो.

10. 11, 12. सोनी, एचटीसी आणि झेडटीई 5जी फोन
क्वालकॉमच्या इवेंट मध्ये सोनी, एचटीसी आणि झेडटीई सारख्या कंपन्यांनी पण आपल्या 5जी फोनची माहिती दिली हाये. सर्वानी 2019 मध्ये आपला नए 5जी फोन येणार असलचे सांगितले आहे.

The post या स्मार्टफोन कंपन्या घेऊन येत आहेत सुपर स्पीड वाले 5जी स्मार्टफोन, बघा त्यांची यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-list-in-marathi/feed/ 0
शाओमी बनवत आहे असा फोन जो चालेल क्वालकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-smartphone-with-qualcomm-snapdragon-675-soc-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-smartphone-with-qualcomm-snapdragon-675-soc-features-in-marathi/#respond Tue, 23 Oct 2018 13:19:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2602 लवकरच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट असलेला शाओमीचा नवीन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये येईल.

The post शाओमी बनवत आहे असा फोन जो चालेल क्वालकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एंडरॉयड स्मार्टफोनचा जीव फोनच्या प्रोसेसर व चिपसेट मध्येच असतो. चिपसेट बनवणाऱ्या दिग्गज कंपनी क्वालकॉमचे चिपसेट लो बजट फोन पासून हाईएंड फ्लॅगशिप डिवाईसेज मध्ये पण दिसतात. क्वालकॉम ने कालच इंटरनेशनल ईवेंट मधून कंपनीच्या नव्या चिपसेट स्नॅपड्रॅगन 675 ची माहित दिली आहे. या घोषणेच्या काही तासांनी इंडियाची नंबर वन स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमी ने घोषणा केली आहे कि येत्या काही दिवसांत शाओमी इंडिया क्वालकॉम च्या या लेटेस्ट चिपसेट सह एक नवीन स्मार्टफोन देशात लॉन्च करेल.

शाओमी ने जरी अजून फोनचे नाव आणि याची लॉन्च डेट सांगितली नसली तरी कंपनीने हे स्पष्ट केले आहे कि लवकरच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट असलेला शाओमीचा नवीन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे गेल्या तिमाहीत शाओमीने 27 टक्के मार्केट शेयर सह देशात सर्वात जास्त स्मार्टफोन विकले आहेत. शाओमीने पुन्हा एकदा सॅमसंग व अन्य कंपन्यांना मागे टाकत नंबर वन ची जागा मिळवली आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट बद्दल बोलायचे तर हा 11 नॅनो मिटर फॅब्रिकेशनचा वापर करून बनवण्यात आला आहे आणि कंपनीने यात आॅक्टाकोर; क्वाड कोर + क्वाड कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. यात एक प्रोसेसर कोरयो 460 आहे जो​ 2.0 गीगाहट्र्ज आॅक्टाकोरला सपोर्ट करतो आणि हा कोर्टेक्स ए76 आर्किटेक्चर वर आधारित आहे. तसेच दुसरा प्रोसेसर कोर्टेक्स ए55 आर्किटेक्चर वर आधारित आहे जो 1.7गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड सह येतो. यासोबत कंपनी ने एड्रीनो 612जीपीयू इंटीग्रेटेड केला आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट फुल एचडी+ रेजल्यूशनला सपोर्ट करू शकतो. तसेच हा बॅटरी इफिशियंट पण आहे. कपंनीचा दावा आहे कि हा चिपसेट जुन्या मॉडेलपेक्षा गेमिंग मध्ये 30 टक्के जास्त फास्ट आहे. तसेच यात 35 टक्के जास्त वेगवान ब्राउजिंग करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीचा हा मिड रेंज प्रोसेसर 3 कॅमेरा मॉड्यूलला सपोर्ट करू शकेल. तसेच यात 2.5 एक्स वाइड एंगल ​पिक्चर सपोर्ट असेल आणि 48 मेगापिक्सल पर्यंतच्या कॅमेऱ्याचा यासोबत वापर करता येईल. स्पीड बद्दल बोलायचे तर यात 600एमबीपीएस पर्यंतचा डाउनलोडिंग स्पीड आणि 150एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडने अपलोड करता येईल.

The post शाओमी बनवत आहे असा फोन जो चालेल क्वालकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-smartphone-with-qualcomm-snapdragon-675-soc-features-in-marathi/feed/ 0
शानदार गेमिंग, ट्रिपल कॅमेरा आणि 600एमबीपीएस पर्यंतचा डेटा स्पीड देऊ शकतो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-launches-snapdragon-675-processor-with-the-support-of-tripal-camera-ai-and-advance-gaming-capability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-launches-snapdragon-675-processor-with-the-support-of-tripal-camera-ai-and-advance-gaming-capability-in-marathi/#respond Tue, 23 Oct 2018 12:53:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2600 यावर्षी ऑगस्ट मध्ये कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट सादर केला होता आणि स्नॅपड्रॅगन 675 याचेच अपग्रेड वर्जन आहे.

The post शानदार गेमिंग, ट्रिपल कॅमेरा आणि 600एमबीपीएस पर्यंतचा डेटा स्पीड देऊ शकतो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगातील नंबर एक मोबाईल चिपसेट निर्माता कंपनी क्वालकॉम ने हॉन्गकॉन्ग मध्ये आयोजित 4जी/5जी समिट 2018 मध्ये आपला नवीन चिपसेट सादर केला आहे. खास बाब म्हणजे कंपनी ने यावेळी मिड रेंज चिपसेट जास्त पावरफुल बनवला आहे ज्यामुळे मोबाईल यूजर्स कमी किंमतीती येणाऱ्या फोन मध्ये पण चांगली गेमिंग अनुभवू शकतील. कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट सादर केली आहे जी खूप अडवांस असल्याचे बोलले जात आहे.

यावर्षी ऑगस्ट मध्ये कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट सादर केला होता आणि स्नॅपड्रॅगन 675 याचेच अपग्रेड वर्जन आहे. कंपनीचा दावा आहे कि नवीन चिपसेट खासकरून कॅमेरा, गेमिंग आणि एआई लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे आणि हा आधीपेक्षा खूप फास्ट पण आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 11 नॅनो मिटर फॅब्रिकेशनचा वापर करून बनवण्यात आला आहे आणि कंपनीने यात आॅक्टाकोर; क्वाड कोर + क्वाड कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. यात एक प्रोसेसर कोरयो 460 आहे जो​ 2.0 गीगाहट्र्ज आॅक्टाकोरला सपोर्ट करतो आणि हा कोर्टेक्स ए76 आर्किटेक्चर वर आधारित आहे. तसेच दुसरा प्रोसेसर कोर्टेक्स ए55 आर्किटेक्चर वर आधारित आहे जो 1.7गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड सह येतो. यासोबत कंपनी ने एड्रीनो 612जीपीयू इंटीग्रेटेड केला आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट फुल एचडी+ रेजल्यूशनला सपोर्ट करू शकतो. तसेच हा बॅटरी इफिशियंट पण आहे. कपंनीचा दावा आहे कि हा चिपसेट जुन्या मॉडेलपेक्षा गेमिंग मध्ये 30 टक्के जास्त फास्ट आहे. तसेच यात 35 टक्के जास्त वेगवान ब्राउजिंग करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीचा हा मिड रेंज प्रोसेसर 3 कॅमेरा मॉड्यूलला सपोर्ट करू शकेल. तसेच यात 2.5 एक्स वाइड एंगल ​पिक्चर सपोर्ट असेल आणि 48 मेगापिक्सल पर्यंतच्या कॅमेऱ्याचा यासोबत वापर करता येईल. स्पीड बद्दल बोलायचे तर यात 600एमबीपीएस पर्यंतचा डाउनलोडिंग स्पीड आणि 150एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडने अपलोड करता येईल.

The post शानदार गेमिंग, ट्रिपल कॅमेरा आणि 600एमबीपीएस पर्यंतचा डेटा स्पीड देऊ शकतो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/qualcomm-launches-snapdragon-675-processor-with-the-support-of-tripal-camera-ai-and-advance-gaming-capability-in-marathi/feed/ 0