लेटेस्ट आणि सर्वात ताकदवान प्रोसेसर सह Qualcomm लॉन्च करेल आपला गेमिंग स्मार्टफोन!

टेक वर्ल्ड मध्ये मोबाईल गेमिंगचा व्यवसाय वाढत आहे आणि ते पाहून आता मोबाईल फोन निर्माता कंपन्या त्यानुसार फोन डिजाइन करत आहेत, जे यूजर्सना शानदार गेमिंग एक्सपीरियंस देऊ शकतील. तसेच समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टनुसार चिपसेट बनवणारी कंपनी क्वालकॉम कथितरित्या आपल्या स्वतःचा गेमिंग स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. सध्या Qualcomm च्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही, पण कंपनी 1 डिसेंबरला एका इवेंटचे आयोजन करणार आहे, ज्यात कंपनी आपली आपला नवीन Snapdragon 875 SoC लॉन्च करणार आहे. आशा आहे कि या इवेंट मध्ये कंपनी स्मार्टफोन संबंधित माहिती पण देऊ शकते.

टेक वेबसाइट Digitimes ने इंडस्ट्री सूत्रांकडून याची माहिती दिली आहे कि क्वालकॉम आसुस सोबत मिळून एक गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे कि हा अपकमिंग हँडसेट क्वालकॉम ब्रॅंडिंग अंतर्गत लॉन्च होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनचे मुख्य एलिमेंट्स आसुस द्वारे तयार केले जात आहेत.

असे बोलले जात आहे कि आसुस आणि क्वालकॉम या प्रोजेक्ट वर एकत्रित काम करत आहेत, त्यामुळे हा स्मार्टफोन Republic of Gamers अंतर्गत पण येऊ शकतो. पण आता काही बोलणे चुकीचे ठरेल.

अलीकडेच Nvidia ने ARM ला विकत घेतले होते. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Nvidia माली जीपीयूला आपल्या डिजाइनशी रिप्लेस करू शकते, जो GeForce ब्रॅंडिंग सह येईल. तसेच स्नॅपड्रॅगॉन 875 SoC मध्ये एड्रिनो सीरीज जीपीयू मिळू शकतो.

ASUS ने काही दिवसांपूर्वी भारतात आरओजी फोन 3 चा अजून एक नवीन रॅम व स्टोरेज वेरिएंट लॉन्च केला आहे. Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 52,999 रुपये ठेवण्यात आली आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. असूस आरओजी फोन 3 चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 57,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here