या स्मार्टफोन कंपन्या घेऊन येत आहेत सुपर स्पीड वाले 5जी स्मार्टफोन, बघा त्यांची यादी

2जी नंतर 3जी आणि आता मोबाईल वर 4जी नेटवर्क चालत आहे. 2जी फक्त कॉलिंग आणि स्लो डेटा साठी ओळखला जात होता. तर 3जी आल्या नंतर इंटनेट मध्ये जीव आला आणि लोक मोबाईल वरूनच सेवा वापरू लागले. आता फोन वर 4जी चालू आहे, फास्ट इंटरनेटने कम्यूनिकेशन सिस्टमच बदलून टाकली आहे. असे असूनही लोक अजूनही स्लो इंटरनेटची तक्रार करत आहेत. परंतु लक्षात घ्या कि लवकरच तुमच्या हातात 5जी फोन असेल आणि तुम्ही सुपरफास्ट इंटरनेट वापरू शकाल. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर अनेक कंपन्यांनी आपल्या 5जी फोनची माहिती दिली आहे. 2019 पर्यंत भारता सहित जगातील अनेक देशांमध्ये 5जी फोन उपलब्ध होतील.

23 ऑक्टोबरला क्वालकॉम ने 4जी/5जी समिट 2018 चे आयोजन केले होते आणि त्यात ओपो, वीवो, वनप्लस आणि नोकिया सहित अनेक इतर कंपन्यांनी 2019 मध्ये आपला 5जी फोन लॉन्च करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर काही कंपन्यांनी याची घोषणा आधीच केली होती. खाली आम्ही त्या फोन्सची संपूर्ण यादी दिली आहे ज्यांमध्ये सर्वात आधी 5जी सेवा उपलब्ध होईल.

1. शाओमी मी मिक्स 3 (5जी फोन)
25 ऑक्टोबर 2018 ला शाओमी मी मिक्स 3 चीन मध्ये लॉन्च करत आहे आणि लॉन्चच्या आधी कंपनीने सांगितले आहे कि या फोन मध्ये 5जी सपोर्ट असेल. हा फोन भारतात येईल कि नाही हे अजून निश्चित नाही पण कंपनीने आपला 5जी फोन लॉन्च करून इतर कंपन्यांना आव्हान दिले आहे.

2. सॅमसंग 5जी फोन
बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 5जी सपोर्ट सह सादर केला जाऊ शकतो. मागील काही लीक्स मध्ये असा दावा करण्यात आला होता. तुम्हाला तर माहितीच आहे कि कंपनीचा फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरीज क्वालकॉम च्या लेटेस्ट चिपसेट सह येतो आणि पुढल्या वर्षी त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 असेल ज्यात 5जी क्षमता असेल. त्यामुळे गॅलेक्सी एस10 मध्ये सुपर फास्ट 5जी सपोर्ट असण्याची शक्यता जास्त आहे.

3. एलजी 5जी फोन
प्रमुख कोरियन मोबाईल फोन निर्माता कंपनी एलजीने 2018 च्या सुरवातीलाच माहिती दिली होती कि 2019 च्या सुरवातीला एलजी आपला 5जी फोन लॉन्च करू शकते. तसेच क्वालकॉम इवेंट मध्ये पण कंपनीने याची माहिती दिली आहे. आशा आहे कि एलजी जी8 थिंक मध्ये 5जी सपोर्ट असेल.

4. वनप्लस 5जी फोन
क्वालकॉम इवेंट मध्ये वनप्लस ने सांगितले कि 2019 मध्ये लॉन्च होणारा कंपनीचा फोन 5जी रेडी असेल. त्यामुळे आशा आहे कि कंपनीच्या वनप्लस 7 मध्ये 5जी सपोर्ट असेल. बोलले जात आहे कि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट वर आधारित असेल.

5. वीवो 5जी फोन
प्रमुख चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवोने पण घोषणा केली आहे कि 2019 पर्यंत ते आपला 5जी फोन लॉन्च करतील. कंपनी वी13 किंवा मग नेक्स सीरीज पासून कंपनी 5जी फोनची सुरवात करू शकते. तसेच कंपनीने सांगितले आहे कि 2020 पर्यंत 5जी स्मार्टफोनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. मोठ्या प्रमाणवर उत्पादन झाल्यामुळे कॉस्ट कमी होते. त्यामुळे 2020 पर्यंत 5जी फोन स्वस्तात उपलब्ध होतील.

6. ओपो 5जी फोन
असे होईल का कि वीवो 5जी फोन लॉन्च करेल आणि ओपो मागे राहील. ओपो ने काही महिन्यांपूर्वी याची माहिती दिली होती कि 2019 पर्यंत त्यांचा 5जी फोन लॉन्च होईल. कंपनीचे असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट शेन यीरेन यांनी सांगितले होते कि 2019 पर्यंत कपंनी 5जी फोनचे मास प्रोडक्शन करेल. फोनचे नाव सांगण्यात आले नाही पण ओपो याची सुरवात आपल्या फ्लॅगशिप फोन पासून करेल. आशा आहे कि एफ11 म्हणजे फाइंड सीरीज पासून याची सुरवात होईल.

7. नोकिया 5जी फोन
5जी फोनच्या या शर्यतीत एचएमडी ग्लोबल ब्रांड नोकिया पण मागे नाही. क्वालकॉम 4जी/5जी समिट मध्ये हॉन्गकॉन्ग मध्ये नोकियाने सांगितले कि ते पण 2019 मध्ये आपला 5जी फोन घेऊन येत आहे. त्यामुळे कंपनी नोकिया 9 पासून याची सुरवात करण्याची शक्यता आहे.

8. लेनोवो 5जी फोन
मोटोरोलाचे मालकी हक्क असणारी कंपनी लेनोवोने आधीच सांगितले होते कि सर्वात आधी 5जी फोन तेच घेऊन येतील. कंपनीने काही महिन्यांपूर्वी मोटो झेड3 लॉन्च केला आहे जो 5जी रेडी आहे. हा जगातील पहिला फोन आहे जो 5जी मॉड्यूलला सपोर्ट करतो. तसेच कंपनी ने सांगितले आहे कि 2019 मध्ये त्यांचा नवीन 5जी फोन येईल.

9. हुआवई 5जी फोन
काही महिन्यांपूर्वी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवई ने माहिती दिली होती कि 2019 च्या सुरवातीला कंपनी आपला 5जी फोन घेऊन येईल. हा फोन हुआवई च्याच मॉडम वर असेल. तसेच काही लीक्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हुआवईचा 5जी फोन फोल्डेबल असेल. हुआवई सोबतच ब्रांड आॅनर पण आपला 5जी फोन घेऊन येऊ शकतो.

10. 11, 12. सोनी, एचटीसी आणि झेडटीई 5जी फोन
क्वालकॉमच्या इवेंट मध्ये सोनी, एचटीसी आणि झेडटीई सारख्या कंपन्यांनी पण आपल्या 5जी फोनची माहिती दिली हाये. सर्वानी 2019 मध्ये आपला नए 5जी फोन येणार असलचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here