शाओमी बनवत आहे असा फोन जो चालेल क्वालकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट वर

एंडरॉयड स्मार्टफोनचा जीव फोनच्या प्रोसेसर व चिपसेट मध्येच असतो. चिपसेट बनवणाऱ्या दिग्गज कंपनी क्वालकॉमचे चिपसेट लो बजट फोन पासून हाईएंड फ्लॅगशिप डिवाईसेज मध्ये पण दिसतात. क्वालकॉम ने कालच इंटरनेशनल ईवेंट मधून कंपनीच्या नव्या चिपसेट स्नॅपड्रॅगन 675 ची माहित दिली आहे. या घोषणेच्या काही तासांनी इंडियाची नंबर वन स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमी ने घोषणा केली आहे कि येत्या काही दिवसांत शाओमी इंडिया क्वालकॉम च्या या लेटेस्ट चिपसेट सह एक नवीन स्मार्टफोन देशात लॉन्च करेल.

शाओमी ने जरी अजून फोनचे नाव आणि याची लॉन्च डेट सांगितली नसली तरी कंपनीने हे स्पष्ट केले आहे कि लवकरच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट असलेला शाओमीचा नवीन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे गेल्या तिमाहीत शाओमीने 27 टक्के मार्केट शेयर सह देशात सर्वात जास्त स्मार्टफोन विकले आहेत. शाओमीने पुन्हा एकदा सॅमसंग व अन्य कंपन्यांना मागे टाकत नंबर वन ची जागा मिळवली आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट बद्दल बोलायचे तर हा 11 नॅनो मिटर फॅब्रिकेशनचा वापर करून बनवण्यात आला आहे आणि कंपनीने यात आॅक्टाकोर; क्वाड कोर + क्वाड कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. यात एक प्रोसेसर कोरयो 460 आहे जो​ 2.0 गीगाहट्र्ज आॅक्टाकोरला सपोर्ट करतो आणि हा कोर्टेक्स ए76 आर्किटेक्चर वर आधारित आहे. तसेच दुसरा प्रोसेसर कोर्टेक्स ए55 आर्किटेक्चर वर आधारित आहे जो 1.7गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड सह येतो. यासोबत कंपनी ने एड्रीनो 612जीपीयू इंटीग्रेटेड केला आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट फुल एचडी+ रेजल्यूशनला सपोर्ट करू शकतो. तसेच हा बॅटरी इफिशियंट पण आहे. कपंनीचा दावा आहे कि हा चिपसेट जुन्या मॉडेलपेक्षा गेमिंग मध्ये 30 टक्के जास्त फास्ट आहे. तसेच यात 35 टक्के जास्त वेगवान ब्राउजिंग करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीचा हा मिड रेंज प्रोसेसर 3 कॅमेरा मॉड्यूलला सपोर्ट करू शकेल. तसेच यात 2.5 एक्स वाइड एंगल ​पिक्चर सपोर्ट असेल आणि 48 मेगापिक्सल पर्यंतच्या कॅमेऱ्याचा यासोबत वापर करता येईल. स्पीड बद्दल बोलायचे तर यात 600एमबीपीएस पर्यंतचा डाउनलोडिंग स्पीड आणि 150एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडने अपलोड करता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here