Realme C20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 May 2021 14:09:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/#respond Tue, 04 May 2021 14:09:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10815 Realme C20A या महिन्याच्या शेवटी Bangladesh टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे कि हा फोन Bangladesh मध्ये Eid च्या दिवशी सादर केला जाईल.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme पुन्हा एकदा आपल्या लो-बजेट फोन्सच्या C-सीरीजमध्ये नवीन फोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि Realme च्या C सीरीजमध्ये Realme C20A नावाचा फोन लवकरच लॉन्च केला जाणार आहे. हा फोन कंपनी Bangladesh च्या टेक मार्केटमध्ये सादर करेल. रियलमीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये फोनची बॅटरी आणि डिवाइसच्या स्क्रीन साइजची माहिती समोर आली आहे. कंपनीने यापूर्वी आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये Realme C20, Realme C21 आणि Realme C25 भारतीय टेक मंचावर सादर केले आहेत. (Realme C20a officially launch soon)

Realme C20A लॉन्च डेट

Realme C20A या महिन्याच्या शेवटी Bangladesh टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे कि हा फोन Bangladesh मध्ये Eid च्या दिवशी सादर केला जाईल. म्हणजे फोन 12 मेच्या आसपास लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त OPPO A54 5G फोन

Realme C20A चा टीजर

Realme C20A मध्ये असेल 5000mAh battery

लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. तसेच डिवाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोन बजेट कॅटेगरीमध्ये LCD डिस्प्लेसह येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. फोनमध्ये Realme C20 सारखे फीचर्स असू शकतात.

Realme C20

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. Realme C20 स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 2GB LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

Realme C20 चा फोटो

कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो.

Realme C20 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, Micro-USB, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20a-officially-launch-soon/feed/ 0
Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/#respond Thu, 01 Apr 2021 12:44:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10470 अपकमिंग Realme C-सीरीजचे फोन एकसारख्या डिजाइनसह सादर केले जातील.

The post Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल कालच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपल्या सी-सीरीजमध्ये तीन नवीन लो बजेट फोन्स सादर करू शकते. त्यानुसार, आज कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि 8 एप्रिलला भारतीय टेक मंचावर Realme C25, Realme C21 आणि Realme C20 स्मार्टफोन लॉन्च केले जातील. कंपनीने मीडिया इनवाइटमध्ये लॉन्च डेट सोबतच 6,000एमएएच बॅटरी हाईलाईट केली आहे. तर, दुसरीकडे Realme C-सीरीजचे हे तीन फोन्स ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर पण दिसले आहेत, त्यामुळे स्पष्ट झाले आहेत कि फोनची विक्री Flipkart च्या माध्यमातून पण केली जाईल. (realme c20 realme c21 realme c25 launch date in india april 8 and flipkart availability)

किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी

तिन्ही रियलमी सी-सीरीजचे फोन जागतिक स्थरावर लॉन्च केले गेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबाबत सर्वकाही आधीपासून माहित आहे. तिन्ही फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. तसेच 8 एप्रिलला कंपनी या फोनचा लॉन्च इवेंट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter, Facebook आणि YouTube वर लाइव करेल.

हे देखील वाचा : दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा

Realme C20, Realme C21, आणि Realme C25 ची डिजाइन

अपकमिंग Realme C-सीरीजचे फोन एकसारख्या डिजाइनसह सादर केले जातील. या तिन्ही फोनमध्ये वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल असतील. फक्त Realme C21 आणि Realme C25 रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह येतील.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी आणि 48MP रियर कॅमेऱ्यासह आला Vivo X60t, 8GB रॅम आणि डायमनसिटी 1100 चिपसेटवर होईल लॉन्च

Realme C20, Realme C21, आणि Realme C25 चे स्पेसिफिकेशन्स

Realme C20 मध्ये 6.5-इंचाचा HD + डिस्प्ले आणि मीडियाटेक Helio G35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच, हा एंट्री-लेवल फोन ग्लोबल मार्केटमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला होता. इतर स्पेक्स पाहता फोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्याचा समावेश आहे. फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्टसह येते.

Realme C21 मध्ये पण Realme C20 सारखे स्पेसिफिकेशन आहेत. यात 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह येतो. Realme C21 मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यात 13MP चा प्राइमरी सेंसर, 2MP ची मॅक्रो लेंस आणि 2MP चा B & W कॅमेऱ्याचा समावेश आहे. फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

Realme C25 बद्दल बोलायचे झाले तर यात 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलियो जी70 चिपसेट आहे. फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. यात 48MP चा ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Realme C25 मध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे आणि हि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

The post Realme चा ट्रिपल धमाका, 8 एप्रिलला एकसाथ लॉन्च करेल 3 नवीन व स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-realme-c21-realme-c25-launch-date-in-india-april-8-and-flipkart-availability/feed/ 0
रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/#respond Fri, 22 Jan 2021 12:59:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9754 रियलमी सी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा एक लो बजेट फोन आहे जो प्लास्टिक बाॅडी वर बनला आहे आणि वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

The post रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘सी सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Realme C20 नावाने मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल. तर आज रियलमीने आपल्या हा नवीन डिवायस अधिकृतपणे सादर केला आहे. कंपनीने रियलमी सी20 टेक मंचावर सादर केला आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि हीलियो जी35 चिपसेट सारख्या स्पेसिफिकेशन्स सह येतो. Realme C20 सध्या वियतनाम मध्ये लाॅन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme C20

रियलमी सी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा एक लो बजेट फोन आहे जो प्लास्टिक बाॅडी वर बनला आहे आणि वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Realme C20 ची स्क्रीन नॅरो बेजल्स सह येते ज्यात खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

Realme C20 अँड्रॉइड 10 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो रियलमी वनयुआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. वियतनाम मध्ये हा फोन 2 जीबी रॅम वर लाॅन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या एक्सपांडेबल स्टोरेजची माहिती समोर आली नाही.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमीने आपला हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्यासह लाॅन्च केला आहे जो आजच्या घडीला आउट डेटेड म्हणता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोन आकारात रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सह हा फोन सिक्योरिटीसाठी फेस अनलाॅक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वियतनाम मध्ये रियलमी सी20 स्मार्टफोन VND2,490,001 मध्ये लाॅन्च झाला आहे जो Blue आणि Black कलर मध्ये विकत घेता येईल. भारतीय करंसीनुसार हि किंमत 7,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-officially-launched-in-vietnam-know-specs-price-helio-g35-5000-mah-battery-2gb-ram/feed/ 0
स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-c20-price-specs-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-c20-price-specs-before-launch/#respond Wed, 20 Jan 2021 14:31:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9718 लिस्टिंगनुसार, Realme C20 मध्ये 6.5 इंचाचा HD + डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल असेल.

The post स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme आपल्या बजेट कॅटेगरी मधील C सीरीज मध्ये यावर्षी अनेक नवीन फोन्स सादर करण्याचे प्लानिंग करत आहे. अलीकडेच Realme C21 नावाच्या फोन बद्दल माहिती समोर आली होती. सी-सीरीजचा अजून एक फोन Realme C20 बद्दल मोठा खुलासा झाला आहे. वियतनामच्या एका ऑनलाइन रिटेलरने रियलमी सी20 च्या लॉन्चच्या आधीच किंमत व स्पेसिफिकेशन्स सह लिस्टिंग केली आहे. इतकेच नव्हे तर लिस्टिंग वरून आगामी रियलमी फोनचे फोटोज समोर आले आहेत, त्यामुळे फोनची डिजाइन समजली आहे. कंपनीने ऑफिशियली फोन संबंधित कोणतीही माहिती दिली नाही.

डिजाइन

लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटोजनुसार रियलमीच्या या हँडसेट मध्ये वाटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले दिला जाईल, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या डिस्प्ले वर तिन्ही बाजूनी खूप कमी बेजल्स आहेत तर बॉटमला बारीक चिन पार्ट मिळतो. तसेच मागे फोन मध्ये चौकोनी सिंगल कॅमेरा दिसत आहे. हँडसेट मध्ये उजवीकडे वाल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. याव्यतिरिक्त फोन Grey आणि Green कलर ऑप्शन मध्ये दिसत आहे.

Realme C20

आशा आहे कि फोन लवकरच भारतासह इतर आशियन बाजारांमध्ये लॉन्च होऊ शकतो. Realme C20 स्पेसिफिकेशन एका प्रमोशनल इमेजच्या माध्यमातून समोर आले आहेतवियतनामी रिटेलर FPT Shop ने रियलमी सी20 ची किंमत व स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती लीक केली आहे.

हे लीक सर्वप्रथम Playfuldroid ने सार्वजनिक केले. गेल्या महिन्यात हा फोन थायलंडच्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकम्युनिकेशंस कमीशन (NBTC) सर्टिफिकेशन वेबसाइट वर दिसला होता.

किंमत

रियलमी सी20 FPT Shop वर 2,690,000 VND (जवळपास 8, 600 रुपये) मध्ये लिस्ट केला गेला आहे. फोनचा फक्त 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज वेरियंट ऑनलाइन दिसला आहे.

Realme C20

स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंगनुसार, Realme C20 मध्ये 6.5 इंचाचा HD + डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल असेल. तसेच डिस्प्ले मध्ये 89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि गोरिल्ला ग्लास 3 लेयर असेल. फोन मध्ये IMG PowerVR GE8320 GPU सह मीडियाटेक Helio G35 SoC असेल. हँडसेट मध्ये 2GB LPDDR4x रॅम आणि 32GB स्टोरेज दिली जाईल, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

कॅमेरा डिपार्टमेंट पाहता Realme C20 मध्ये 8MP चा सिंगल सेंसर आणि एलईडी फ्लॅश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी समोर 5MP चा स्नॅपर देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह 5,000mAh ची बॅटरी आहे.

Realme C20

कनेक्टिविटी फिचर पाहता फोन मध्ये डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि एक माइक्रो-यूएसबी पोर्टचा समावेश आहे. हा Android 10 OS वर Realme UI कस्टम स्किन सह चालेल.

The post स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-c20-price-specs-before-launch/feed/ 0
Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/#respond Thu, 17 Dec 2020 15:08:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9346 Realme C20 इंडोनेशियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे.

The post Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme RMX3063 मॉडेल नंबर असलेला एक स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर लिस्ट झाला होता. या फोनची रियर डिजाईन बऱ्याचअंशी Realme C15 स्मार्टफोन सारखा होता तसेच सर्टिफिकेशन्स साइट वर हा खुलासा पण झाला होता कि या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळेल. तसेच आता रियलमीचा एक आगामी मोबाईल एनबीटीसी वर लिस्ट झाला आहे जिथे स्पष्ट झाले आहे कि कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Realme C20 नावाने मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल.

Realme C20 इंडोनेशियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे. इथे फोनचा मॉडेल नंबर Realme RMX3061 सांगण्यात आले आहे त्यासोबतच स्पष्टपणे फोनचे नाव ‘रियलमी सी20’ लिहिण्यात आले आहे. हि पहिली लिस्टिंग आहे जिथे Realme C20 स्मार्टफोनचे नाव समोर आले आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या स्पेसिफिकेशन्सची तर जास्त माहिती मिळाली नाही पण असे सांगितले आहे कि या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल आणि बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. रियलमी सी20 रियलमी सी15 चा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

Realme C15

रियलमी सी15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक एंड वाइट सेंसर आहे. त्यासोबत सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C15 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात.

The post Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c20-to-launch-with-5000mah-battery-rmx3061-leaked/feed/ 0