5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

देश आणि जगभरातील प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपन्या एकापेक्षा एक स्मार्टफोन सध्या मार्केटमध्ये सादर करत आहेत. ग्राहकांची आवड बघून कंपन्या प्रयत्न करत आहेत कि ते फ्लॅगशिप सोबतच बजेट सेगमेंटच्या फोनमध्ये मागणी जास्त असलेले फीचर देण्याचा. आजकल फोन विकत घेताना ग्राहक फोनचे सर्व फीचर्स काळजीपूर्वक बघतात. पण यापैकी एक फीचर ज्यावर सर्वांचे लक्ष असते ते आहे बॅटरी. जर बॅटरी जास्त दमदार असेल फोन वारंवार चार्ज करावा लागत नाही. हे पाहता आम्ही तुम्हाला अश्याच काही स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत जे 5000एमएएचच्या बॅटरीसह येतात. मोठ्या बॅटरीव्यतिरिक्त या फोनची किंमत 8,000 रुपयांच्या आसपास आहे. जर तुम्ही या किंमतीत एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध बेस्ट ऑप्शनची माहिती देत आहोत. (5000mah Battery phone under Rs 8000)

Realme C20

Realme C20 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी रिवर्स चार्जिंगला सपोर्टसह येते. हा फोन फुल चार्ज होण्यास 2 तासांचा वेळ घेतो. तसेच यात चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळाला असता तर अजून चांगले झाले असते. तसेच, रियलमीचा दावा आहे कि सिंगल चार्जमध्ये सुपर पावर सेविंग मोड ऑन करून Realme C20 43 दिवस वापरता येईल. स्मार्टफोनची आरंभिक किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हा लो बजेट कॅटेगरीमध्ये कंपनीद्वारे काही दिवसांपूर्वीच मार्केटमध्ये आणण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना

Realme C20चा फोटो

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये MediaTek Helio G35 चिपसेट आहे. इतकेच नव्हे तर Realme च्या या फोनमध्ये 2GB LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते. कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो.

Samsung Galaxy M02

या फोनची आरंभिक किंमत 7,499 रुपये आहे. खरं तर फोन कमी किंमतीत लॉन्च झाला होता. पण, कंपनीने काही दिवसांपूर्वी डिवाइसची किंमत वाढवली आहे. गॅलेक्सी एम02 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. फोन एकदा चार्ज करून रोजच्या वापराने जवळपास 2 दिवस वापरता येईल. तसेच Samsung Galaxy M02 मध्ये 6.5 इंचाची एचडी+ स्क्रीन, अँड्रॉइड 10 ओएस आणि ऑक्टा-कोर मीडियाटेक चिपसेट आहे.

हे देखील वाचा : 6,000 रुपयांनी स्वस्त झाला 7,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F62

Samsung Galaxy M02 चा फोटो

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम02 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy M02 स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO C3

फक्त 7499 रुपयांमध्ये 5000एमएएच बॅटरीसह येणारा POCO C3 पण एक चांगला ऑप्शन आहे. हा फोन गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता. पोको सी3 मध्ये 6.53 इंचाचा एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट आहे. फोन अँड्रॉइड 10 ओएससह मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी पोको सी3 मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टकोर प्रोसेसरसह 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट आहे.

POCO C3 चा फोटो

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO C3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलवर डावीकडे चौरस आकारात आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच पोको सी3 चा रियर कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको सी3 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Spark 7

डिवाइसमध्ये 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Tecno Spark 7 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. बजेट फोनसाठी फेमस टेक्नो बराच काळ आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इंडियन टेक मंचावर नव-नवीन फोन सादर करत आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 7 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा HD+ चा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Helio A25 चिपसेट, Android 11 Go edition वर आधारित कंपनीच्या कस्टम यूएई HiOS 7.5 वर चालतो.

हे देखील वाचा : 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त OPPO A54 5G फोन

Tecno Spark 7P चा फोटो

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 7 स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे त्या सोबत कंपनीने AL लेंस आणि क्वाड LED फ्लॅश दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नोच्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 9i

पावर बॅकअपसाठी Redmi 9i मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमीच्या या फोनची आरंभिक किंमत 7,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ (720×1600) डॉट ड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. फोन TUV Rheinland सर्टिफिकेशनसह येतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये Aura 360 डिजाइन टेक्चर बॅक आहे. स्मार्टफोन 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G25 चिपसेटवर सादर केला गेला आहे जो एक एंट्री लेवल गेमिंग चिपसेट आहे आणि 12nm टेक्नोलॉजीवर बनवण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन आहे.

Redmi 9i चा फोटो

पावर बॅकअपसाठी Redmi 9i मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन Android 10 बेस्ड MIUI 12 आउट ऑफ द बॉक्स आणि सिस्टम-वाइड डार्क मोडसह येतो. फोटोग्राफीसाठी Redmi 9i मागे सिंगल 13 मेगापिक्सल AI कॅमेरा आणि फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा डिवाइस इतर फीचर्स जसे कि 10W चार्जिंग सपोर्ट, डुअल सिम स्लॉट, 4G VoLTE, वाय-फाय 802.11 b / g / n, ब्लूटूथ 5.0, GPS, microUSB, एक 3.5mm ऑडियो जॅक आणि P2i स्प्लॅश-प्रतिरोधीसह येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here