5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत

Realme C20चा फोटो

Realme पुन्हा एकदा आपल्या लो-बजेट फोन्सच्या C-सीरीजमध्ये नवीन फोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि Realme च्या C सीरीजमध्ये Realme C20A नावाचा फोन लवकरच लॉन्च केला जाणार आहे. हा फोन कंपनी Bangladesh च्या टेक मार्केटमध्ये सादर करेल. रियलमीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये फोनची बॅटरी आणि डिवाइसच्या स्क्रीन साइजची माहिती समोर आली आहे. कंपनीने यापूर्वी आपल्या ‘सी’ सीरीजमध्ये Realme C20, Realme C21 आणि Realme C25 भारतीय टेक मंचावर सादर केले आहेत. (Realme C20a officially launch soon)

Realme C20A लॉन्च डेट

Realme C20A या महिन्याच्या शेवटी Bangladesh टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे कि हा फोन Bangladesh मध्ये Eid च्या दिवशी सादर केला जाईल. म्हणजे फोन 12 मेच्या आसपास लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त OPPO A54 5G फोन

Realme C20A चा टीजर

Realme C20A मध्ये असेल 5000mAh battery

लॉन्च डेटबाबत टीज करत कंपनीने फोनच्या काही फीचर्सची पण माहिती दिली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme C20A मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल. तसेच डिवाइसमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोन बजेट कॅटेगरीमध्ये LCD डिस्प्लेसह येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. फोनमध्ये Realme C20 सारखे फीचर्स असू शकतात.

Realme C20

Realme C20 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच देण्यात आली आहे. Realme C20 स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 2GB LPDDR4x RAM देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

Realme C20 चा फोटो

कॅमेरा स्पेसिपिकेशन्स पाहता Realme C20 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिवर्स चार्जला सपोर्ट करते. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो.

Realme C20 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS/ A-GPS, Micro-USB, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here