Realme C3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Feb 2020 12:24:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रियलमी फॅन्सना कंपनीची भेट, आता ओपन सेल मध्ये मिळेल ब्रँडचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C3 https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-open-sale-in-india-till-21-february-price-specifications-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-open-sale-in-india-till-21-february-price-specifications-offer/#respond Wed, 19 Feb 2020 12:24:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6636 Realme C3 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post रियलमी फॅन्सना कंपनीची भेट, आता ओपन सेल मध्ये मिळेल ब्रँडचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने या महिन्यात भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Realme C3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. लो बजेट मध्ये आलेला हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला होता ज्याची बेस किंमत 6,999 रुपये आहे. रियलमी सी3 गेल्या 14 फेब्रुवारीला भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध झाला होता. कंपनीने हा फोन फ्लॅश सेल मध्ये आणला होता ज्यात काही मिनिटांतच Realme C3 वर सोल्ड आउटचा बोर्ड लागला होता. पण आता आपल्या फॅन्ससाठी रियलमीने Realme C3 स्मार्टफोन ओपन सेल मध्ये उपलब्ध करण्याची योजना बनवली आहे.

Realme ने माहिती दिली आहे कि कंपनी आपला नवीन स्मार्टफोन रियलमी सी3 भारतात ओपन सेलसाठी उपलब्ध करणार आहे. पण हा ओपन सेल फक्त 21 फेब्रुवारी पर्यंत चालू राहील. म्हणजे ज्या स्मार्टफोन यूजरना Realme C3 विकत घ्यायचा आहे ते 21 फेब्रुवारी पर्यंत हा ओपन सेल मध्ये घेऊ शकतील. हा ओपन सेल रियलमीच्या वेबसाइट व्यतिरिक्त फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर चालू राहील. Realme C3 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme C3

Realme C3 चा बॉडी-टू-स्क्रीन रेशियो 89.8 टक्के आहे तसेच कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 6.5 इंचाचा मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. रियलमी सी3 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हेलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम जी52 जीपीयू आहे.

Realme C3 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme C3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी आणि अनलॉकिंगसाठी या फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा डिवाईस 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी 30 दिवसांचा स्टॅन्डबाय टाईम आणि 10.6 तास PUBG खेळू देते.

The post रियलमी फॅन्सना कंपनीची भेट, आता ओपन सेल मध्ये मिळेल ब्रँडचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-open-sale-in-india-till-21-february-price-specifications-offer/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/#respond Tue, 11 Feb 2020 12:17:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6554 Xiaomi Redmi 8A Dual कंपनीने 6,499 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च केला गेला आहे जो येत्या 18 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा आणि 5000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जो 6,999 रुपयांच्या बेस किंमतीती विकत घेता येईल. Realme C3 ला टक्कर देत भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Xiaomi ने पण आपला नवीन एंट्री लेवल स्मार्टफोन Redmi 8A Dual आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Xiaomi Redmi 8A Dual कंपनीने 6,499 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च केला गेला आहे जो येत्या 18 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi Redmi 8A Dual

स्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi Redmi 8A Dual मध्ये 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ आईपीएस डॉटनॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने रेडमी 8ए डुअल पी21आई नॅनो कोटिंगने कवर केला आहे जी फोनला हलक्या फुलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. रेडमी 8ए डुअल कंपनीने ब्लू, वाईट आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या डिजाईनला Xiaomi ने ऑरा ग्रिल एक्स डिजाईनचे नाव दिले आहे.

Xiaomi Redmi 8A Dual एंडरॉयड आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. शाओमी रेडमी 8ए डुअल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Redmi 8A Dual डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे रेडमी 8ए डुअल च्या फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरा सेंसर्स मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे.

Xiaomi Redmi 8A Dual हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड सह एक मेमरी कार्ड पण वापरता येते. हा स्मार्टफोन 4जी वोएलटीई सोबत वोवाई-फाई फीचरला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Xiaomi Redmi 8A Dual मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट सपोर्ट असेलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. पण बॉक्स मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल. शाओमी रेडमी 8ए डुअल टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो तसेच हा फोन रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतो.

किंमत व सेल

Xiaomi Redmi 8A Dual चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Redmi 8A Dual येत्या 18 फेब्रुवारी पासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच कंपनीने सांगितले आहे कि येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि डुअल रियर कॅमेऱ्यासह फक्त 6,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi Redmi 8A Dual first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-dual-launched-in-india-two-rear-camera-5000mah-battery-specs-price-sale-availability/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3 चा नवीन मॉडेल https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-with-triple-rear-camera-to-launch-in-indonesia-on-19-february-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-with-triple-rear-camera-to-launch-in-indonesia-on-19-february-specs-price/#respond Mon, 10 Feb 2020 13:26:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6550 इंडोनेशिया मध्ये लॉन्च होणाऱ्या Realme C3 मध्ये आणखी काय नवीन असेल हे 19 फेब्रुवारीला लॉन्च नंतर समजेल.

The post ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3 चा नवीन मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या आठवड्यात भारतात आपल्या ‘सी सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला आहे. कंपनीने रियलमी सी3 लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे. हा स्मार्टफोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 14 फेब्रुवारी पासून सेलसाठी उपलब्ध होईल. इंडिया लॉन्च नंतर इंडोनेशिया वरून बातमी येत आहे कि रियलमी 19 फेब्रुवारीला Realme C3 स्मार्टफोन तिथे पण लॉन्च करेल. पण इंडोनेशिया मध्ये लॉन्च होणाऱ्या Realme C3 भारतात लॉन्च झालेल्या फोन पेक्षा वेगळा असेल. कंपनीच्या वेबसाइट वरून समजले आहे कि इंडोनेशिया मध्ये Realme C3 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.

Realme इंडोनेशियाने आपल्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया वर Realme C3 टीज करायला सुरवात केली आहे जो 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल. फोनच्या टीजर वरून माहिती मिळाली आहे कि इंडोनेशिया मध्ये Realme C3 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. हा स्मार्टफोन भारतात डुअल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया मध्ये नवीन रियलमी फोन RMX2020 मॉडेल सह सर्टिफाइड झाला होता. तीन रियर कॅमेरा सेंसर्स व्यतिरिक्त इंडोनेशिया मध्ये लॉन्च होणाऱ्या Realme C3 मध्ये आणखी काय नवीन असेल हे 19 फेब्रुवारीला लॉन्च नंतर समजेल.

Realme C3

रियलमी सी3 ने भारतात दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. फोनचा 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 7,999रुपयांमध्ये आला आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 6.5 इंचाचा मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. रियलमी सी3 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हेलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम जी52 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme C3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी आणि अनलॉकिंगसाठी या फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा डिवाईस 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme C3 14 फेब्रुवारी पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट पासून Frozen Blue आणि Blazing Red कलर मध्ये विकत घेता येईल. रियलमी इंडियाच्या वेबसाइट वर हा फोन 2 जीबी रॅम सह पण लिस्टेड आहे. त्यामुळे आशा आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी हा नवीन रॅम वेरिएंट पण भारतीय बाजारात लॉन्च करेल. बोलले जात आहे कि या नवीन 2 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 6,499 रुपये किंवा 5,999 रुपये असू शकते.

The post ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3 चा नवीन मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-with-triple-rear-camera-to-launch-in-indonesia-on-19-february-specs-price/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/ https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/#respond Thu, 06 Feb 2020 12:52:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6525 कथित Redmi 9A स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आजच भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme ने आपल्या या स्मार्टफोन सह लो बजेट सेग्मेंट मध्ये Xiaomi ला आव्हान दिले आहे. रियलमीच्या या आव्हानाचा स्वीकार करत आज भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड शाओमीने पण आपल्या नवीन फोनची घोषणा केली आहे. Xiaomi ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला भारतात आपला नवीन फोन लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस पण लो बजेट मध्ये येऊन Realme C3 ला टक्कर देईल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन आणि Redmi इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर पोस्ट करत कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाइट वर पण ब्रँडच्या आगामी मोबाइलचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 11 फेब्रुवारीला Xiaomi इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्यासह 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करेल.

कंपनीने आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण एवढे मात्र निश्चित कंपनीचा आगामी डिवाईस रेडमी सीरीज मध्ये लॉन्च होईल. आशा आहे की हा स्मार्टफोन Redmi 9A नावाने बाजारात येईल. फोनच्या प्रोडक्ट पेज वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन Redmi 8A सारख्या रियर डिजाईन सह येईल ज्यात बॅक पॅनल वर मधोमध एक पट्टी असेल ज्यावर कॅमेरा सेटअप असेल.

Redmi सीरीजच्या या आगामी स्मार्टफोनचा बॅक पॅनल थोड्या रग्ड पॅटर्न सह येईल. या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो पॅनलच्या मधोमध वर्टिकल शेप मध्ये असेल. तसेच कंपनी खुलासा केला आहे कि कथित Redmi 9A स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल कि नाही याची ठोस माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीला Xiaomi रेडमी सीरीजच्या नवीन स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून एक प्रोडक्ट पण सादर करेल. कंपनीने या नवीन प्रोडक्ट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण चर्चा अशी आहे कि हा नवीन प्रोडक्ट शाओमीची नवीन पावरबॅंक असेल. या नवीन प्रोडक्ट सोबत Redmi 9A च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि याच्या किंमतीची लॉन्च डेटची वाट बघावी लागेल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/#respond Thu, 06 Feb 2020 12:28:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6523 Realme C3 चा 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतात आपल्या ‘सी सीरीज’ चा विस्तार केला आहे. कंपनीने इंडियन मार्केट मध्ये Realme C3 स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे. रियलमी सी3 Realme ने भारतात लॉन्च केलेला साल 2020 चा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे. आज ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माधयमातून Realme C3 ने स्मार्टफोन मार्केट मध्ये पाऊल टाकले आहे. हा स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतात लॉन्च झाला आहे जो 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 14 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Realme C3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद पार्ट देण्यात आला आहे. हा फोन ‘वी’ शेप नॉचला सपोर्ट करतो. फोनचा बॅक पॅनल शाईनी रग्ड डिजाईन सह येतो जो एका खास पॅटर्न वर रिफ्लेक्शन देतो. बॅक पॅनल वर उजवीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सेंसर्सच्या खाली पिक्सल डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये Realme ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह सिम स्लॉट आहे. Realme C3 च्या लोवर वर यूएसबी पोर्ट सह स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme C3 चा बॉडी-टू-स्क्रीन रेशियो 89.8 टक्के आहे तसेच कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 6.5 इंचाचा मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. रियलमी सी3 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हेलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम जी52 जीपीयू आहे.

Realme C3 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme C3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी आणि अनलॉकिंगसाठी या फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा डिवाईस 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी 30 दिवसांचा स्टॅन्डबाय टाईम आणि 10.6 तास PUBG खेळू देते.

किंमत व सेल

Realme C3 चा 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये आला आहे. हा फोन येत्या 14 फेब्रुवारी पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/feed/ 0
Realme SmartTV 24 फेब्रुवारीला होऊ शकते लॉन्च, Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-smarttv-might-launch-on-24-february-in-mwc-2020-realme-india-cmo-francis-wang-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/realme-smarttv-might-launch-on-24-february-in-mwc-2020-realme-india-cmo-francis-wang-tweet/#respond Wed, 05 Feb 2020 12:28:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6511 शा आहे कि Realme SmartTV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्ससाठी टीव्ही मध्ये कंटेंट मिळेल.

The post Realme SmartTV 24 फेब्रुवारीला होऊ शकते लॉन्च, Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ब्रँड थोड्याच काळात इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील ओळखीचे नाव बनला आहे. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येणाऱ्या या टेक कंपनीने देशातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड Xiaomi ला अनेक ठिकाणी टक्कर दिली आहे. मागे रियलमीने सांगितले होते कि कंपनी भारतात आपला स्मार्ट फिटनेस बँड पण लॉन्च करणार आहे. तर आता रियलमी संबंधित अजून एक मोठी बातमी समोर आली आहे कि कंपनी लवकरच आपली स्मार्ट टीव्ही पण घेऊन येणार आहे आणि हि Realme TV या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये टेक मंचा वर सादर करेल.

Realme TV संबंधित हि महत्वाची बातमी रियलमी इंडियाचे सीएमओ फ्रांसिस वँग यांनी दिली आहे. वँग यांनी सांगितले आहे कि या महिन्यात बार्सिलोना मध्ये आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC मध्ये कंपनी आपला पहिला स्मार्टटीव्ही सादर करेल. वँग यांनी हि माहिती ट्वीटर वर एक यूजरने केलेल्या कमेंटला रिप्लाई देताना दिली आहे. यूजरने विचारले होते कि, ‘रियलमी टीव्ही कधी लॉन्च होईल?’ तेव्हा यूजरला उत्तर देत वँग यांनी लिहिले कि, ‘एमडब्ल्यूसी मध्ये टीव्ही बद्द्दल मोठी बातमी तुम्हाला मिळेल.’

विशेष म्हणजे येत्या 24 फेब्रुवारीला रियलमी MWC 2020 मध्ये आपला ईवेंट करणार आहे आणि त्याच दिवशी Realme TV पहिल्यांदा जगासमोर सादर होऊ शकते. ट्वीटर वर आपल्या उत्तरासोबत वँग यांनी #realmeForEveryIndian चा वापर केला आहे. या हॅशटॅग वरून स्पष्ट झाले आहे कि Realme TV कंपनी द्वारे खास भारतीय यूजर्ससाठी बनवली जात आहे. त्यामुळे आशा आहे कि Realme SmartTV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्ससाठी टीव्ही मध्ये कंटेंट मिळेल.

Realme C3

कंपनी उद्या भारतात Realme C3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोन मध्ये 6.5-इंचाचा मिनी-ड्रॉप डिस्प्ले आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन वर असेल. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात मेन कॅमेरा 12-मेगापिक्सलचा असेल आणि दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. रियलमी सी3 च्या फ्रंट कॅमेऱ्याबद्दल रियलमीने कोणतीही माहिती दिली नाही. Realme C3 मध्ये MediaTek Helio G70 चिपसेट मिळेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. Realme C3 भारतात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

Realme मार्केट शेयर

अलीकडेच IDC च्या रिपोर्ट मध्ये समजले होते कि ऑगस्ट 2019 मध्ये Realme चा ऑनलाईन मार्केट शेयर 29.13 टक्के होता पण वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर मध्ये रियलमी ऑनलाईन बाजारात घसरली आणि 7.32 टक्क्यांवर आली. एकंदरीत मार्केट शेयर बद्दल बोलायचे तर Realme ब्रँडने सप्टेंबर मध्ये 16.74 टक्के मार्केट शेयर सह Samsung ला पण मागे टाकले होते आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला होता. पण फक्त दोन महिन्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये रियलमीला मोठा धक्का बसला होता 8.23 ओवरऑल मार्केट शेयर सह हि कंपनी दुसऱ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आली आहे.

The post Realme SmartTV 24 फेब्रुवारीला होऊ शकते लॉन्च, Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-smarttv-might-launch-on-24-february-in-mwc-2020-realme-india-cmo-francis-wang-tweet/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 12MP डुअल कॅमेऱ्यासह 6 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-specifications-teased-by-flipkart-phone-come-with-5000mah-battery-dual-camera-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-specifications-teased-by-flipkart-phone-come-with-5000mah-battery-dual-camera-and-more/#respond Thu, 30 Jan 2020 15:32:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6455 फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल जी 30 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम आणि 10.6 तास PUBG गेमिंग देईल.

The post 5,000mAh बॅटरी आणि 12MP डुअल कॅमेऱ्यासह 6 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme इंडियाने बुधवारी एक प्रेस इनवाइट जाहीर करून घोषणा केली होती कि Realme C3 गेल्या आठवड्यात 6 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल. रियलमी सी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती व लीक समोर येत होते. तसेच आता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर रियलमी सी3 जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला गेला आहे.

फ्लिपकार्ट पेज वर Realme C3 च्या स्पेसिफिकेशन्स सोबत फोनच्या डिजाइनची माहिती पण समोर आली ई आहे. Realme C3 मध्ये 6.5-इंच वॉटरड्रॉप डिस्प्ले, डुअल कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सारखे दमदार स्पेसिफिकेशन्स असतील.

Realme C3 चे स्पेसिफिकेशन्स

Realme C3 बघून वाटत आहे कि हा Realme C2 चा अपग्रेडेड वर्जन असेल. डिजाइन बद्दल बोलायचे तर Realme C3 मध्ये मोठा 6.5-इंचाचा मिनी-ड्रॉप डिस्प्ले आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन वर असेल. तसेच फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. रियलमी सी3 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा मॉड्यूल मध्ये 12MP डुअल कॅमेरा असेल जो क्रोम कास्ट बूस्ट, स्लो-मो वीडियो, एचडीआर मोड आणि पॅनोरामा सेल्फी सारख्या फीचर्स सह येईल.

तसेच फ्लिपकार्ट पेज वर समोर आले आहे कि रियलमी सी3 मीडियटेक हीलियो G70 सह येईल. इतकेच नाही तर फोन दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. यात 3GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 64GB स्टोरेज असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल जी 30 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम आणि 10.6 तास PUBG गेमिंग देईल.

विशेष म्हणजे Realme C3 कंपनी भारतात सर्वात आधी लॉन्च करेल. Realme C3 च्या लॉन्च डेट सोबतच कंपनीने स्पष्ट केले आहे कि हा डिवाइस सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून भारतीय बाजारात येईल ज्याचा लॉन्च कंपनी ऑनलाइन लाईव स्ट्रीमिंग द्वारे करेल.

ग्लोबल मार्केट मध्ये आतापर्यंत C सीरीजचे 10.2 मिलियन म्हणजे 102 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. याची माहिती कंपनीने काही दिवसांपूर्वी दिली होती. कंपनीने स्पष्ट केले नाही कि भारतात Realme C1 आणि Realme C2 चा एकूण किती सेल झाला आहे.

The post 5,000mAh बॅटरी आणि 12MP डुअल कॅमेऱ्यासह 6 फेब्रुवारीला लॉन्च होईल Realme C3, फ्लिपकार्ट वर होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-specifications-teased-by-flipkart-phone-come-with-5000mah-battery-dual-camera-and-more/feed/ 0
Realme C3 6 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, लो बजेट मध्ये Xiaomi शी होईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launching-in-india-on-6-february-in-low-budget-segment-xiaomi-redmi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launching-in-india-on-6-february-in-low-budget-segment-xiaomi-redmi/#respond Wed, 29 Jan 2020 13:05:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6423 हा डिवाईस सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून भारतीय बाजारात येईल ज्याचा लॉन्च कंपनी ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून करेल.

The post Realme C3 6 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, लो बजेट मध्ये Xiaomi शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme सीईओ माधव सेठ यांनी काल आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून सांगितले होते कि कंपनीच्या ‘रियलमी सी सीरीज’ मध्ये आता पर्यंत ग्लोबली 10.2 मिलियन म्हणजे 102 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. तसेच आता कंपनीने हे यश अजून पुढे नेण्याच्या उद्देशाने आज सीरीजच्या आगामी स्मार्टफोनची घोषणा पण केली आहे. कंपनीने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे कि रियलमी येत्या 6 फेब्रुवारीला भारतात आपला आगामी स्मार्टफोन Realme C3 लॉन्च करणार आहे.

रियलमी इंडियाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून Realme C3 ची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 6 फेब्रुवारीला भारतात रियलमी सी सीरीजचा नवीन स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे Realme C3 जगात सर्वात आधी भारतात लॉन्च केला जात आहे जो आगामी काही दिवसांत इतर बाजारांत येईल. Realme C3 च्या लॉन्च डेट सोबतच कंपनीने स्पष्ट केले आहे कि हा डिवाईस सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून भारतीय बाजारात येईल ज्याचा लॉन्च कंपनी ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून करेल.

डिजाईनचा झाला खुलासा

Realme C3 च्या मीडिया इन्वाईट मध्ये कंपनीने फोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यात मोबाईलचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. फोनचा फोटो समोर आल्यामुळे फोन लॉन्चच्या आधीच याच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. Realme C3 बेजल लेस डिस्प्ले सह येईल तसेच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे.

रियलमी सी3 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये सेंसर डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. Realme C3 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो जो फोटो मध्ये दिसला नाही. तसेच बॅक पॅनल वर खालच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये Realme ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

5,000एमएएच ची असेल बॅटरी

कंपनीने जरी Realme C3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नसली तरी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा डिवाईस 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येईल. तसेच या डिवाईस मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर दिला जाईल. विशेष म्हणजे Realme C सीरीज नेहमी लो बजेट सेग्मेंट मध्ये येते त्यामुळे आशा आहे कि Realme C3 स्मार्टफोन पण 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Realme C3 ची लॉन्च डेट घोषित करण्याआधी या सीरीजचे यश सांगताना कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर एक पोस्ट शेयर केली होती. आपल्या ट्वीट मध्ये कंपनीने सांगितले होते कि ग्लोबल मार्केट मध्ये या सीरीजचे 10.2 मिलियन म्हणजे 102 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. कंपनीने स्पष्टपणे सांगितले नाही कि भारतात Realme C1 आणि Realme C2 चा एकूण सेल झाला आहे आणि कोणता स्मार्टफोन लोकांना जास्त आवडला आहे.

The post Realme C3 6 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, लो बजेट मध्ये Xiaomi शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launching-in-india-on-6-february-in-low-budget-segment-xiaomi-redmi/feed/ 0
Realme C सीरीज मध्ये आतापर्यंत विकले गेले 102 लाख स्मार्टफोन, आता आहे Realme C3 ची तयारी https://www.91mobiles.com/marathi/realme-c-series-10-2-million-units-sold-out-globally-c3-might-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c-series-10-2-million-units-sold-out-globally-c3-might-launch-soon/#respond Tue, 28 Jan 2020 12:18:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6416 कंपनी लवकरच सीरीजचा नवीन फोन सादर करू शकते, जो Realme C3 नावाने भारतात लॉन्च होऊ शकतो.

The post Realme C सीरीज मध्ये आतापर्यंत विकले गेले 102 लाख स्मार्टफोन, आता आहे Realme C3 ची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्यावर्षी भारतीय बाजारात एंट्री लेवल स्मार्टफोन आणण्याच्या उद्देशाने Realme C सीरीजची सुरवात केली होती. या सीरीज अंतर्गत Realme C1 आणि Realme C2 लॉन्च केले गेले आहेत जे मोबाईल यूजर्सने खूप आवडले होते. ‘रियलमी सी सीरीज’ चे यश पाहता आज Realme ने सांगितले आहे कि ग्लोबल मंचावर आतापर्यंत Realme C सीरीजचे 10.2 मिलियन म्हणजे 102 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. सीरीजच्या यशानंतर अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी लवकरच हीचा विस्तार करेल आणि सी सीरीजचा वेगळा स्मार्टफोन Realme C3 लवकरच टेक मंचावर येईल.

Realme C सीरीजचे यश सांगत कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर एक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि ग्लोबल मार्केट मध्ये या सीरीजचे 10.2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. कंपनीने स्पष्ट केले नाही कि भारतात Realme C1 आणि Realme C2 चा एकूण किती सेल झाला आहे आणि कोणता स्मार्टफोन लोकांना जास्त आवडला आहे. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात कि आता कंपनी लवकरच सीरीजचा नवीन फोन सादर करू शकते, जो Realme C3 नावाने भारतात लॉन्च होऊ शकतो.

Realme C3

काही दिवसांपूर्वी थाईलँड मध्ये एक स्मार्टफोन Realme C3s नावाने समोर आला होता जो भारतीय बाजारात Realme C3 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन RMX2020 मॉडेल नंबर सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये फोनचा रियर पॅनल पण दाखवण्यात आला होता ज्यावरून समजले होते कि डिवाइसच्या बॅक पॅनल वर टॉप राइट कॉर्नरला कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेंसर दिला जाईल. आशा आहे कि यात एक डेप्थ सेंसर आणि वाइड-अँगल लेंस एलईडी फ्लॅश सह दिली जाऊ शकते. लीकनुसार कथित Realme C3 एंडरॉयड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये Realme UI पण मिळू शकते.

Realme 6

ब्रँडच्या रियलमी 6 स्मार्टफोन बद्दल पण लीक समोर आले आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस पंच होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन पंच होल डिस्प्ले अलीकडेच लॉन्च झालेल्या Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोन प्रमाणे स्क्रीनच्या मधोमध दिला जाईल. तसेच सांगण्यात येत आहे कि Realme 5 सीरीजच्या सर्व फोन्स मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला होता तर Realme 6 सीरीजचा स्मार्टफोन पेंटा कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर असतील. तसेच प्रोसेसिंगसाठी Realme 6 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme C3 आणि Realme 6 ची ठोस माहिती समोर आली नाही त्यामुळे कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Realme C सीरीज मध्ये आतापर्यंत विकले गेले 102 लाख स्मार्टफोन, आता आहे Realme C3 ची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c-series-10-2-million-units-sold-out-globally-c3-might-launch-soon/feed/ 0
Realme C3s लवकरच होऊ शकतो लॉन्च, FCC वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-c3s-could-launch-with-rear-mounted-fingerprint-sensor-and-coloros-7-fcc-listing/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3s-could-launch-with-rear-mounted-fingerprint-sensor-and-coloros-7-fcc-listing/#respond Fri, 24 Jan 2020 12:09:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6376 सिंगल सेंसरसाठी मॉड्यूल खूप मोठा वाटत आहे त्यामुळे कदाचित कंपनी यात एक डेप्थ सेंसर आणि वाइड-अँगल लेंसला एलईडी फ्लॅश सह देऊ शकते.

The post Realme C3s लवकरच होऊ शकतो लॉन्च, FCC वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट NBTC वर Realme C3s स्मार्टफोन लिस्ट केला गेला होता. तर आता हा फोन FCC वर दिसला आहे. हि लिस्टिंग इशारा करत आहे कि कंपनी लवकरच हा फोन सादर करण्याची प्लानिंग करत आहे. अधिकृतपणे अजूनतरी या फोन बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

NBTC सर्टिफिकेशन वर Realme C3s RMX2020 मॉडेल नंबर सह दिसला आहे. यात हँडसेटची डिजाइन, सॉफ्टवेयर, वाई-फाई डिटेल्सची माहिती मिळाली आहे, ज्यांच्या बाबत आतापर्यंत कोणतेही लीक समोर आले नव्हते. Realme C3s चा बॅक पॅनल FCC वर दिसला आहे, ज्या वरून समजले आहे कि डिवाइसच्या टॉप राइट कॉर्नर वर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात सिंगल सेंसर दिला जाईल. सिंगल सेंसरसाठी मॉड्यूल खूप मोठा वाटत आहे त्यामुळे कदाचित कंपनी यात एक डेप्थ सेंसर आणि वाइड-अँगल लेंसला एलईडी फ्लॅश सह देऊ शकते.

त्याचबरोबर Realme C3s मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ColorOS 7 असेल जो एंडरॉयड 10 वर आधारित आहे. तसेच FCC डाटाबेस मध्ये पुढे माहिती मिळाली आहे कि फोन मध्ये फक्त सिंगल वाई-फाई बॅंड 2.4GHz फ्रिक्यूएंसी असेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Realme C3s ला थाईलँडच्या NBTC म्हणजे नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीक्म्यूनिकेशन्स कमीशन वर सर्टिफाइड केला गेला होता. एनबीटीसी वर रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन RMX2020 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. इंडियन वेबसाइट BIS वर पण याच मॉडेल नंबर सह एक स्मार्टफोन लिस्ट झाला आहे ज्याला लीक्स मध्ये Realme 6 नाव देण्यात आले आहे.

जुन्या लीक मध्ये रियलमी 6 सीरीज सह Realme C3 स्मार्टफोन लॉन्च केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे एनबीटीसी च्या लिस्टिंग वरून सध्या स्पष्टपणे असे म्हणता येईल कि रियलमी येत्या आठवड्यांत Realme C3 सीरीज टेक मंचावर सादर करू शकते.

The post Realme C3s लवकरच होऊ शकतो लॉन्च, FCC वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3s-could-launch-with-rear-mounted-fingerprint-sensor-and-coloros-7-fcc-listing/feed/ 0