Realme C3 6 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, लो बजेट मध्ये Xiaomi शी होईल टक्कर

Realme सीईओ माधव सेठ यांनी काल आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून सांगितले होते कि कंपनीच्या ‘रियलमी सी सीरीज’ मध्ये आता पर्यंत ग्लोबली 10.2 मिलियन म्हणजे 102 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. तसेच आता कंपनीने हे यश अजून पुढे नेण्याच्या उद्देशाने आज सीरीजच्या आगामी स्मार्टफोनची घोषणा पण केली आहे. कंपनीने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे कि रियलमी येत्या 6 फेब्रुवारीला भारतात आपला आगामी स्मार्टफोन Realme C3 लॉन्च करणार आहे.

रियलमी इंडियाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून Realme C3 ची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 6 फेब्रुवारीला भारतात रियलमी सी सीरीजचा नवीन स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे Realme C3 जगात सर्वात आधी भारतात लॉन्च केला जात आहे जो आगामी काही दिवसांत इतर बाजारांत येईल. Realme C3 च्या लॉन्च डेट सोबतच कंपनीने स्पष्ट केले आहे कि हा डिवाईस सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून भारतीय बाजारात येईल ज्याचा लॉन्च कंपनी ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून करेल.

डिजाईनचा झाला खुलासा

Realme C3 च्या मीडिया इन्वाईट मध्ये कंपनीने फोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यात मोबाईलचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. फोनचा फोटो समोर आल्यामुळे फोन लॉन्चच्या आधीच याच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. Realme C3 बेजल लेस डिस्प्ले सह येईल तसेच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे.

रियलमी सी3 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये सेंसर डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. Realme C3 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो जो फोटो मध्ये दिसला नाही. तसेच बॅक पॅनल वर खालच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये Realme ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

5,000एमएएच ची असेल बॅटरी

कंपनीने जरी Realme C3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नसली तरी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा डिवाईस 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येईल. तसेच या डिवाईस मध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर दिला जाईल. विशेष म्हणजे Realme C सीरीज नेहमी लो बजेट सेग्मेंट मध्ये येते त्यामुळे आशा आहे कि Realme C3 स्मार्टफोन पण 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Realme C3 ची लॉन्च डेट घोषित करण्याआधी या सीरीजचे यश सांगताना कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर एक पोस्ट शेयर केली होती. आपल्या ट्वीट मध्ये कंपनीने सांगितले होते कि ग्लोबल मार्केट मध्ये या सीरीजचे 10.2 मिलियन म्हणजे 102 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. कंपनीने स्पष्टपणे सांगितले नाही कि भारतात Realme C1 आणि Realme C2 चा एकूण सेल झाला आहे आणि कोणता स्मार्टफोन लोकांना जास्त आवडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here