Realme C3s लवकरच होऊ शकतो लॉन्च, FCC वर झाला लिस्ट

Pic Credit : detik.com
Pic Credit : detik.com

काही दिवसांपूर्वी थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट NBTC वर Realme C3s स्मार्टफोन लिस्ट केला गेला होता. तर आता हा फोन FCC वर दिसला आहे. हि लिस्टिंग इशारा करत आहे कि कंपनी लवकरच हा फोन सादर करण्याची प्लानिंग करत आहे. अधिकृतपणे अजूनतरी या फोन बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

NBTC सर्टिफिकेशन वर Realme C3s RMX2020 मॉडेल नंबर सह दिसला आहे. यात हँडसेटची डिजाइन, सॉफ्टवेयर, वाई-फाई डिटेल्सची माहिती मिळाली आहे, ज्यांच्या बाबत आतापर्यंत कोणतेही लीक समोर आले नव्हते. Realme C3s चा बॅक पॅनल FCC वर दिसला आहे, ज्या वरून समजले आहे कि डिवाइसच्या टॉप राइट कॉर्नर वर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात सिंगल सेंसर दिला जाईल. सिंगल सेंसरसाठी मॉड्यूल खूप मोठा वाटत आहे त्यामुळे कदाचित कंपनी यात एक डेप्थ सेंसर आणि वाइड-अँगल लेंसला एलईडी फ्लॅश सह देऊ शकते.

त्याचबरोबर Realme C3s मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ColorOS 7 असेल जो एंडरॉयड 10 वर आधारित आहे. तसेच FCC डाटाबेस मध्ये पुढे माहिती मिळाली आहे कि फोन मध्ये फक्त सिंगल वाई-फाई बॅंड 2.4GHz फ्रिक्यूएंसी असेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Realme C3s ला थाईलँडच्या NBTC म्हणजे नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीक्म्यूनिकेशन्स कमीशन वर सर्टिफाइड केला गेला होता. एनबीटीसी वर रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन RMX2020 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. इंडियन वेबसाइट BIS वर पण याच मॉडेल नंबर सह एक स्मार्टफोन लिस्ट झाला आहे ज्याला लीक्स मध्ये Realme 6 नाव देण्यात आले आहे.

जुन्या लीक मध्ये रियलमी 6 सीरीज सह Realme C3 स्मार्टफोन लॉन्च केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे एनबीटीसी च्या लिस्टिंग वरून सध्या स्पष्टपणे असे म्हणता येईल कि रियलमी येत्या आठवड्यांत Realme C3 सीरीज टेक मंचावर सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here