Realme SmartTV 24 फेब्रुवारीला होऊ शकते लॉन्च, Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Realme ब्रँड थोड्याच काळात इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील ओळखीचे नाव बनला आहे. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येणाऱ्या या टेक कंपनीने देशातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड Xiaomi ला अनेक ठिकाणी टक्कर दिली आहे. मागे रियलमीने सांगितले होते कि कंपनी भारतात आपला स्मार्ट फिटनेस बँड पण लॉन्च करणार आहे. तर आता रियलमी संबंधित अजून एक मोठी बातमी समोर आली आहे कि कंपनी लवकरच आपली स्मार्ट टीव्ही पण घेऊन येणार आहे आणि हि Realme TV या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये टेक मंचा वर सादर करेल.

Realme TV संबंधित हि महत्वाची बातमी रियलमी इंडियाचे सीएमओ फ्रांसिस वँग यांनी दिली आहे. वँग यांनी सांगितले आहे कि या महिन्यात बार्सिलोना मध्ये आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC मध्ये कंपनी आपला पहिला स्मार्टटीव्ही सादर करेल. वँग यांनी हि माहिती ट्वीटर वर एक यूजरने केलेल्या कमेंटला रिप्लाई देताना दिली आहे. यूजरने विचारले होते कि, ‘रियलमी टीव्ही कधी लॉन्च होईल?’ तेव्हा यूजरला उत्तर देत वँग यांनी लिहिले कि, ‘एमडब्ल्यूसी मध्ये टीव्ही बद्द्दल मोठी बातमी तुम्हाला मिळेल.’

विशेष म्हणजे येत्या 24 फेब्रुवारीला रियलमी MWC 2020 मध्ये आपला ईवेंट करणार आहे आणि त्याच दिवशी Realme TV पहिल्यांदा जगासमोर सादर होऊ शकते. ट्वीटर वर आपल्या उत्तरासोबत वँग यांनी #realmeForEveryIndian चा वापर केला आहे. या हॅशटॅग वरून स्पष्ट झाले आहे कि Realme TV कंपनी द्वारे खास भारतीय यूजर्ससाठी बनवली जात आहे. त्यामुळे आशा आहे कि Realme SmartTV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्ससाठी टीव्ही मध्ये कंटेंट मिळेल.

Realme C3

कंपनी उद्या भारतात Realme C3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोन मध्ये 6.5-इंचाचा मिनी-ड्रॉप डिस्प्ले आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन वर असेल. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात मेन कॅमेरा 12-मेगापिक्सलचा असेल आणि दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. रियलमी सी3 च्या फ्रंट कॅमेऱ्याबद्दल रियलमीने कोणतीही माहिती दिली नाही. Realme C3 मध्ये MediaTek Helio G70 चिपसेट मिळेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. Realme C3 भारतात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

Realme मार्केट शेयर

अलीकडेच IDC च्या रिपोर्ट मध्ये समजले होते कि ऑगस्ट 2019 मध्ये Realme चा ऑनलाईन मार्केट शेयर 29.13 टक्के होता पण वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर मध्ये रियलमी ऑनलाईन बाजारात घसरली आणि 7.32 टक्क्यांवर आली. एकंदरीत मार्केट शेयर बद्दल बोलायचे तर Realme ब्रँडने सप्टेंबर मध्ये 16.74 टक्के मार्केट शेयर सह Samsung ला पण मागे टाकले होते आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला होता. पण फक्त दोन महिन्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये रियलमीला मोठा धक्का बसला होता 8.23 ओवरऑल मार्केट शेयर सह हि कंपनी दुसऱ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here