Realme ने गेल्यावर्षी भारतीय बाजारात एंट्री लेवल स्मार्टफोन आणण्याच्या उद्देशाने Realme C सीरीजची सुरवात केली होती. या सीरीज अंतर्गत Realme C1 आणि Realme C2 लॉन्च केले गेले आहेत जे मोबाईल यूजर्सने खूप आवडले होते. ‘रियलमी सी सीरीज’ चे यश पाहता आज Realme ने सांगितले आहे कि ग्लोबल मंचावर आतापर्यंत Realme C सीरीजचे 10.2 मिलियन म्हणजे 102 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. सीरीजच्या यशानंतर अशा व्यक्त केली जात आहे कि कंपनी लवकरच हीचा विस्तार करेल आणि सी सीरीजचा वेगळा स्मार्टफोन Realme C3 लवकरच टेक मंचावर येईल.
Realme C सीरीजचे यश सांगत कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर एक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि ग्लोबल मार्केट मध्ये या सीरीजचे 10.2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. कंपनीने स्पष्ट केले नाही कि भारतात Realme C1 आणि Realme C2 चा एकूण किती सेल झाला आहे आणि कोणता स्मार्टफोन लोकांना जास्त आवडला आहे. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात कि आता कंपनी लवकरच सीरीजचा नवीन फोन सादर करू शकते, जो Realme C3 नावाने भारतात लॉन्च होऊ शकतो.
A series that successfully made its mark in the entry-level segment!
Packed with a 13+2 MP Dual Rear Camera, 5 MP Front Camera and 2GB RAM, both smartphones in the realme C series deliver unmatched performance and have been chosen by 10.2 million global users. pic.twitter.com/cyXU0mVMmR— realme (@realmemobiles) January 28, 2020
Realme C3
काही दिवसांपूर्वी थाईलँड मध्ये एक स्मार्टफोन Realme C3s नावाने समोर आला होता जो भारतीय बाजारात Realme C3 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन RMX2020 मॉडेल नंबर सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये फोनचा रियर पॅनल पण दाखवण्यात आला होता ज्यावरून समजले होते कि डिवाइसच्या बॅक पॅनल वर टॉप राइट कॉर्नरला कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेंसर दिला जाईल. आशा आहे कि यात एक डेप्थ सेंसर आणि वाइड-अँगल लेंस एलईडी फ्लॅश सह दिली जाऊ शकते. लीकनुसार कथित Realme C3 एंडरॉयड 10 आधारित कलरओएस 7 वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये Realme UI पण मिळू शकते.
Realme 6
ब्रँडच्या रियलमी 6 स्मार्टफोन बद्दल पण लीक समोर आले आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस पंच होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन पंच होल डिस्प्ले अलीकडेच लॉन्च झालेल्या Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोन प्रमाणे स्क्रीनच्या मधोमध दिला जाईल. तसेच सांगण्यात येत आहे कि Realme 5 सीरीजच्या सर्व फोन्स मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला होता तर Realme 6 सीरीजचा स्मार्टफोन पेंटा कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 5 कॅमेरा सेंसर असतील. तसेच प्रोसेसिंगसाठी Realme 6 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.
Realme C3 आणि Realme 6 ची ठोस माहिती समोर आली नाही त्यामुळे कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.














