Realme C30s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 06:41:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-gets-a-price-cut-of-rs-500-check-out-new-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-gets-a-price-cut-of-rs-500-check-out-new-price/#respond Fri, 10 Feb 2023 04:13:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17692 दिवसेंदिवस बजेट सेगमेंटमध्ये लोकप्रिय होत असलेल्या रियलमीनं सप्टेंबरमध्ये Realme C30S हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन असल्यामुळे कंपनीनं याची किंमत 7,500 रुपयांच्या बजेटमध्ये ठेवली होती. आता या 6.5-इंच HD+ डिस्प्ले, Octa Core प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत काप करण्यात आली आहे. Realme C30S च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं […]

The post आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C30S च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे
  • ही कपात कायमस्वरूपी करण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी मिळते

दिवसेंदिवस बजेट सेगमेंटमध्ये लोकप्रिय होत असलेल्या रियलमीनं सप्टेंबरमध्ये Realme C30S हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन असल्यामुळे कंपनीनं याची किंमत 7,500 रुपयांच्या बजेटमध्ये ठेवली होती. आता या 6.5-इंच HD+ डिस्प्ले, Octa Core प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत काप करण्यात आली आहे. Realme C30S च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं 500 रुपयांनी कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवीन किंमत.

Realme C30S New Price

Realme C30s स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे या हँडसेटचा 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट आता 7,499 रुपयांच्या ऐवजी 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसाठी आता ग्राहकांना 8,999 रुपयांच्या ऐवजी 8,499 रुपये मोजावे लागतील. हा फोन स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहे. हे देखील वाचा: 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर

Realme C30S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता रियलमी सी30एस मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये Octa Core प्रोसेसर आहे, जोडीला 2GB आणि 4GB RAM सोबतच 32GB आणि 64GB स्टोरेज मिळते. Realme C30s ची स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीनं मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी30एस फोनच्या मागे एकच 8MP चा AI कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला एलईडी फ्लॅश देखील आहे. तर फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा मिळतो. रियर कॅमेरा मधील फीचर्स पाहता Beauty, Filter, HDR, Panoramic View, Portrait, Timelapse, Expert, Super Night सारखे मोड्स देण्यात आले आहेत.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी सी30एस फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये डिवाइसमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: एकदम गोळीगत! 240W Fast Charging सह Realme GT Neo5 लाँच; नाव बदलून येणार भारतात?

The post आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-gets-a-price-cut-of-rs-500-check-out-new-price/feed/ 0
भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/#respond Thu, 22 Sep 2022 09:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13355 Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला […]

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला भारतात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत.

Realme C30s, Realme Narzo 50i Prime, Realme 9i 5G आणि Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरला भारतीय बाजारात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत. हे चारही मोबाइल फोन वेगवेगळ्या बजेट सेग्मेंटमध्ये लाँच झाले आहेत जे कॅटेगरनुसार शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. पुढे या चारही नवीन रियलमी स्मार्टफोन्सच्या प्राइस व सेल डिटेल्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी रियलमीचा मोठा डाव; Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक

Realme C30s

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी सी30एस स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 7,499 आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4GB RAM + 64GB Storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी 100 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे. हा फोन Stripe Blue आणि Stripe Black कलरमध्ये उद्यापासून विकत घेता येईल.

Realme narzo 50i Prime

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी नारजो 50आय प्राइम स्मार्टफोन देखील उद्याच भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल. हा मोबाइल फोन देखील दोन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. यात 3GB RAM + 32GB Storage आणि 4GB RAM + 64GB Storage देण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे ,999 रुपये आणि 8,999 रुपये आहे. realme narzo 50i Prime को Dark Blue आणि Mint Green कलरमध्ये विकत घेता येईल तसेच या फोनवर रियलमी 100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

Realme 9i 5G

रियलमी 9आय 5जी फोनच्या 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंटची प्राइस 14,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB Storage ची किंमत 16,999 रुपये आहे. नवीन कलर मॉडेल Soulful Blue मध्ये हा फोन उद्या 23 सप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल कंपनी 250 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देत आहे. हा रियलमी मोबाइल Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये पण विकत घेता येईल. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Realme GT Neo 3T 5G

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB Storage सह 31,999 रुपये तसेच सर्वात मोठा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये खरेदी करता येईल.

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/feed/ 0
फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launch-india-image-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launch-india-image-price-sale-specification/#respond Wed, 14 Sep 2022 10:14:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13092 खूप कमी कालावधीत रियलमीनं खूप जास्त लोकप्रियता कमावली आहे. तरुणाईमध्ये कंपनीचे स्मार्टफोन खूप लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे रियलमी कमी किंमतीती शानदार स्मार्टफोन सादर करते. आता पुन्हा एकदा Realme नं आपल्या लो बजेट फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल लाँच केला आहे. कंपनीच्या सी सीरिजमध्ये नवीन Realme C30s ची एंट्री झाली आहे. या रियलमी स्मार्टफोनची खासियत […]

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खूप कमी कालावधीत रियलमीनं खूप जास्त लोकप्रियता कमावली आहे. तरुणाईमध्ये कंपनीचे स्मार्टफोन खूप लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे रियलमी कमी किंमतीती शानदार स्मार्टफोन सादर करते. आता पुन्हा एकदा Realme नं आपल्या लो बजेट फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल लाँच केला आहे. कंपनीच्या सी सीरिजमध्ये नवीन Realme C30s ची एंट्री झाली आहे. या रियलमी स्मार्टफोनची खासियत पाहता यात 6.5-इंच HD+ डिस्प्लेसह Octa Core प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी आहे. चला या लेखातून Realme C30S च्या किंमत, सेल डेट आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊया.

Realme C30S Price आणि Sale

Realme C30s स्मार्टफोनचे कंपनीनं दोन रॅम व स्टोरेज मॉडेल भारतात सादर केले आहेत. या हँडसेटच्या 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येणार मोठा व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध होईल. बजेट फ्रेंडली Realme C30s स्मार्टफोनची विक्री 23 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून सुरु केली जाईल. फोनमध्ये स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

Realme C30s

Realme C30S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता रियलमी सी30एस मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये Octa Core प्रोसेसर आहे, जोडीला 2GB आणि 4GB RAM सोबतच 32GB आणि 64GB स्टोरेज मिळते. Realme C30s ची स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीनं मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

Realme C30s

फोटोग्राफीसाठी रियलमी सी30एस फोनच्या मागे एकच 8MP चा AI कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला एलईडी फ्लॅश देखील आहे. तर फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा मिळतो. रियर कॅमेरा मधील फीचर्स पाहता Beauty, Filter, HDR, Panoramic View, Portrait, Timelapse, Expert, Super Night सारखे मोड्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Realme C30s

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी सी30एस फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये डिवाइसमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

The post फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launch-india-image-price-sale-specification/feed/ 0
अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launching-on-14-september-2022-in-india-with-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launching-on-14-september-2022-in-india-with-5000mah-battery/#respond Thu, 08 Sep 2022 06:15:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12932 Realme C30s India Launch: रियलमीनं दोन दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होते. हा Cheap Realme Smartphone रियलमी सी33 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. तसेच पुढील आठवड्यात या सीरीज मधील Realme C30s स्मार्टफोन देखील भारतात लाँच होणार आहे. रियलमी […]

The post अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme C30s India Launch: रियलमीनं दोन दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होते. हा Cheap Realme Smartphone रियलमी सी33 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. तसेच पुढील आठवड्यात या सीरीज मधील Realme C30s स्मार्टफोन देखील भारतात लाँच होणार आहे. रियलमी सी30एस 14 सप्टेंबरला भारतात लाँच होईल.

Realme C30s India Launch

रियलमी सी30एस स्मार्टफोन येत्या 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. कंपनीनं फोन लाँचची माहिती देण्यासोबतच फोटो व अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील शेयर केले आहेत. Realme C30s Low Budget Mobile Phone असेल ज्याची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. जर या किंमतीत हा स्मार्टफोन आला तर नुकत्याच लाँच झालेल्या Redmi A1 हा चांगलीच टक्कर देऊ शकतो. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरही रियलमी सी30एसचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे. ही बातमी लिहिस्तोवर अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर फोनची मायक्रो साइट समोर आली नाही. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Realme C30s Specifications

रियलमी इंडियानं खुलासा केला आहे Realme C30s स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होईल. परंतु यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कोणती असेल ते समजलं नाही. टाइप-सी चार्जिंग पोर्ट असणं अपेक्षित आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc चिपसेट दिला जाऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

realme C30s launching on 14 September 2022 in india with 5000mah battery

रियलमी सी30एस वॉटरड्रॉप नॉच स्टाईल वाली 6.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्यात रुंद चिन पार्ट असेल. हा लो बजेट स्मार्टफोन असल्यामुळे यात एचडी+ डिस्प्ले 60hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के असेल असं सांगण्यात आलं आहे तसेच फोन डिस्प्ले 16.7एम कलरला सपोर्ट करेल. Realme C30s सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्याची सेन्सर कपॅसिटी अजूनतरी समोर आली नाही. परंतु कॅमेरा मोड्यूलमध्ये एक एलईडी लाइट दिसत आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.

The post अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c30s-launching-on-14-september-2022-in-india-with-5000mah-battery/feed/ 0