अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात

realme C30s launching on 14 September 2022 in india with 5000mah battery

Realme C30s India Launch: रियलमीनं दोन दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीज अंतगर्त Realme C33 स्मार्टफोन लाँच केला होता ज्याची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होते. हा Cheap Realme Smartphone रियलमी सी33 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. तसेच पुढील आठवड्यात या सीरीज मधील Realme C30s स्मार्टफोन देखील भारतात लाँच होणार आहे. रियलमी सी30एस 14 सप्टेंबरला भारतात लाँच होईल.

Realme C30s India Launch

रियलमी सी30एस स्मार्टफोन येत्या 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. कंपनीनं फोन लाँचची माहिती देण्यासोबतच फोटो व अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील शेयर केले आहेत. Realme C30s Low Budget Mobile Phone असेल ज्याची किंमत 6,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. जर या किंमतीत हा स्मार्टफोन आला तर नुकत्याच लाँच झालेल्या Redmi A1 हा चांगलीच टक्कर देऊ शकतो. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरही रियलमी सी30एसचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे. ही बातमी लिहिस्तोवर अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर फोनची मायक्रो साइट समोर आली नाही. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

Realme C30s Specifications

रियलमी इंडियानं खुलासा केला आहे Realme C30s स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होईल. परंतु यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कोणती असेल ते समजलं नाही. टाइप-सी चार्जिंग पोर्ट असणं अपेक्षित आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc चिपसेट दिला जाऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

realme C30s launching on 14 September 2022 in india with 5000mah battery

रियलमी सी30एस वॉटरड्रॉप नॉच स्टाईल वाली 6.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्यात रुंद चिन पार्ट असेल. हा लो बजेट स्मार्टफोन असल्यामुळे यात एचडी+ डिस्प्ले 60hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के असेल असं सांगण्यात आलं आहे तसेच फोन डिस्प्ले 16.7एम कलरला सपोर्ट करेल. Realme C30s सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्याची सेन्सर कपॅसिटी अजूनतरी समोर आली नाही. परंतु कॅमेरा मोड्यूलमध्ये एक एलईडी लाइट दिसत आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here