आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

Realme C30s
Highlights

  • Realme C30S च्या किंमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे
  • ही कपात कायमस्वरूपी करण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी मिळते

दिवसेंदिवस बजेट सेगमेंटमध्ये लोकप्रिय होत असलेल्या रियलमीनं सप्टेंबरमध्ये Realme C30S हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन असल्यामुळे कंपनीनं याची किंमत 7,500 रुपयांच्या बजेटमध्ये ठेवली होती. आता या 6.5-इंच HD+ डिस्प्ले, Octa Core प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत काप करण्यात आली आहे. Realme C30S च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कंपनीनं 500 रुपयांनी कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवीन किंमत.

Realme C30S New Price

Realme C30s स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे या हँडसेटचा 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट आता 7,499 रुपयांच्या ऐवजी 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसाठी आता ग्राहकांना 8,999 रुपयांच्या ऐवजी 8,499 रुपये मोजावे लागतील. हा फोन स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहे. हे देखील वाचा: 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर

Realme C30S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता रियलमी सी30एस मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये Octa Core प्रोसेसर आहे, जोडीला 2GB आणि 4GB RAM सोबतच 32GB आणि 64GB स्टोरेज मिळते. Realme C30s ची स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीनं मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी30एस फोनच्या मागे एकच 8MP चा AI कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला एलईडी फ्लॅश देखील आहे. तर फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा मिळतो. रियर कॅमेरा मधील फीचर्स पाहता Beauty, Filter, HDR, Panoramic View, Portrait, Timelapse, Expert, Super Night सारखे मोड्स देण्यात आले आहेत.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी सी30एस फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये डिवाइसमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: एकदम गोळीगत! 240W Fast Charging सह Realme GT Neo5 लाँच; नाव बदलून येणार भारतात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here