Realme V15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Jan 2021 13:58:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-realme-v15-launched-price-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-realme-v15-launched-price-sale-detail/#respond Thu, 07 Jan 2021 13:58:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9581 चीन मध्ये Realme V15 5G च्या बेस मॉडेल 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत CNY 1,499 (जवळपास 17,000 रुपये) पासून सुरु होते

The post दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वस्तातील 5G मोबाईल सादर करण्याच्या लाइन मध्ये रियलमी पण सामील झाली आहे. कंपनीने आज या सेगमेंट मध्ये जोरदार एंट्री करत दमदार फीचर्स असलेला Realme V15 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रियलमी वी15 5जी बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्ण विराम लावण्यात आला आहे. हा फोन कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्येच सादर केला आहे. पण आशा आहे कि येत्या काळात हा डिवाइस भारतात येऊ शकतो.

डिजाइन

Realme V15 एका होल-पंच डिस्प्ले सह येतो. डिवाइसच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल डावीकडे वर देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि एक एलईडी देण्यात आली आहे. सोबतच स्मार्टफोन आईपी प्रोटेक्शन सह येतो, त्यामुळे हा डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट बनतो.

हे देखील वाचा : देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स

किंमत

चीन मध्ये Realme V15 5G च्या बेस मॉडेल 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत CNY 1,499 (जवळपास 17,000 रुपये) पासून सुरु होते, पण हा वेरिएंट CNY 1,399 (जवळपास 15,800 रुपये) च्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. 8GB + 128GB ऑप्शनची किंमत CNY 1,999 (जवळपास Rs 22,600) आहे. स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये येतो – सिल्वर, ब्लू आणि ग्रेडियंट कलर फिनिश. Realme V15 5G 14 जानेवारी पासून चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 600 एनआयटी ब्राइटनेस, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. Realme V15 5G मीडियाटेक डाइमेंशन 800U चिपसेट वर चालतो जो 7nm प्रोसेस वर आधारित आहे आणि हा 5G मॉडेम सह येतो.

हे देखील वाचा : Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु

या नवीन Realme V15 स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यात 64MP प्राइमरी सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस मिळते. फोन मध्ये AI आणि स्मार्ट HDR फीचर्स सह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टम 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, युआयएस मॅक्स (अल्ट्रा इमेज स्टेबिलाइजेशन) आणि 1080p चा स्लो मोशन व्हिडीओला 120fps वर सपोर्ट करते.

हँडसेटचा आकार 8.1 मिमी आहे आणि याचे वजन 176 ग्राम आहे. हँडसेट एका 4,310mAh च्या बॅटरी सह येतो जी 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फोन फक्त 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो.

The post दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-realme-v15-launched-price-sale-detail/feed/ 0
7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15 https://www.91mobiles.com/marathi/realme-v15-to-launch-on-7-january-with-64mp-camera-dimensity-880u/ https://www.91mobiles.com/marathi/realme-v15-to-launch-on-7-january-with-64mp-camera-dimensity-880u/#respond Mon, 04 Jan 2021 12:18:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9519 7 जानेवारीला कंपनी Realme V15 स्मार्टफोन आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च करेल. Realme V15 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल आणि हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट वर चालेल तसेच फोन मध्ये 50वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

The post 7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बाबत गेल्या आठवड्यातच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘क्यू सीरीज’ चा विस्तार करू शकते. हि सीरीज ऑक्टोबर मध्ये चीन मध्ये सादर करण्यात आली होती ज्यात Realme Q2, Realme Q2 Pro आणि Realme Q2i लॉन्च झाले होते. यातील एक Realme Q2 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाला होता. आज रियलमी बद्दल अजून एक नवीन बातमी मिळत आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला आपला नवीन फोन Realme V15 लॉन्च करणार आहे.

Realme V15 संबंधित बातमी समोर आली आहे कि कंपनी 7 जानेवारीला हा फोन जगासमोर ठेवणार आहे. 7 जानेवारीला कंपनी रियलमी वी15 स्मार्टफोन आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च करेल. रियलमीने आतापर्यंत या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Realme V15 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल आणि हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट वर चालेल. फोन मध्ये 50वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

Realme Q2

भारतात लवकरच लॉन्च होणारा रियलमी क्यू2 स्मार्टफोन पाहता हा फोन 6.5-इंचाच्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. Realme Q2 Pro मध्ये 6.43-इंचाचा एफएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यासोबत 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो.

हे देखील वाचा : Redmi 9T झाला तयार, 6000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाॅन्च

रियलमीचे हे दोन्ही फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. Realme Q2 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme Q2 Pro स्मार्टफोन चीन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी क्यू2 मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे तर प्रो वर्जन 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme Q2i

Realme Q2 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस 119-डिग्री FoV आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Realme Q2 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP ची प्राइमरी लेंस, 8MP वाइड-अँगल लेंस 119-डिग्री FoV, 2MP B&W पोर्टेट लेंस आणि 2MP 4cm मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी यात पण 16MP चा लेंस देण्यात आली आहे.

The post 7 जानेवारीला लॉन्च होईल 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Realme V15 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-v15-to-launch-on-7-january-with-64mp-camera-dimensity-880u/feed/ 0