दमदार फीचर्ससह लॉन्च झाला Realme V15 5G, किंमत 20 हजारांपेक्षा पण कमी

स्वस्तातील 5G मोबाईल सादर करण्याच्या लाइन मध्ये रियलमी पण सामील झाली आहे. कंपनीने आज या सेगमेंट मध्ये जोरदार एंट्री करत दमदार फीचर्स असलेला Realme V15 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रियलमी वी15 5जी बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्ण विराम लावण्यात आला आहे. हा फोन कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्येच सादर केला आहे. पण आशा आहे कि येत्या काळात हा डिवाइस भारतात येऊ शकतो.

डिजाइन

Realme V15 एका होल-पंच डिस्प्ले सह येतो. डिवाइसच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल डावीकडे वर देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि एक एलईडी देण्यात आली आहे. सोबतच स्मार्टफोन आईपी प्रोटेक्शन सह येतो, त्यामुळे हा डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट बनतो.

हे देखील वाचा : देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स

किंमत

चीन मध्ये Realme V15 5G च्या बेस मॉडेल 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत CNY 1,499 (जवळपास 17,000 रुपये) पासून सुरु होते, पण हा वेरिएंट CNY 1,399 (जवळपास 15,800 रुपये) च्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. 8GB + 128GB ऑप्शनची किंमत CNY 1,999 (जवळपास Rs 22,600) आहे. स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन मध्ये येतो – सिल्वर, ब्लू आणि ग्रेडियंट कलर फिनिश. Realme V15 5G 14 जानेवारी पासून चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 600 एनआयटी ब्राइटनेस, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. Realme V15 5G मीडियाटेक डाइमेंशन 800U चिपसेट वर चालतो जो 7nm प्रोसेस वर आधारित आहे आणि हा 5G मॉडेम सह येतो.

हे देखील वाचा : Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु

या नवीन Realme V15 स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे ज्यात 64MP प्राइमरी सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस मिळते. फोन मध्ये AI आणि स्मार्ट HDR फीचर्स सह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टम 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, युआयएस मॅक्स (अल्ट्रा इमेज स्टेबिलाइजेशन) आणि 1080p चा स्लो मोशन व्हिडीओला 120fps वर सपोर्ट करते.

हँडसेटचा आकार 8.1 मिमी आहे आणि याचे वजन 176 ग्राम आहे. हँडसेट एका 4,310mAh च्या बॅटरी सह येतो जी 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फोन फक्त 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here