Realme X7 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/#respond Thu, 22 Apr 2021 13:47:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10683 तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तसे पाहता भारतात अजून 5G नेटवर्कची सुरुवात झाली नाही, पण मोबाईल निर्माता कंपन्यांनी आतापासून कंबर बांधली आहे. 5G नेटवर्कच्या सुरुवातीविना मोबाईल कंपन्या गेल्यावर्षीपासून भारतात 5G स्मार्टफोन सादर करत आहेत. आता एक पाऊल पुढे टाकत कंपन्या 5G फोन ग्राहकांच्या खिशाच्या विचार करून सादर करत आहेत. आज रियलमीने पण आपला नवीन फोन Realme 8 5G सादर केला आहे, ज्याची किंमत ग्राहकांच्या खिशाचा विचार करून खूप कमी ठेवण्यात आली आहे. ते पाहता आज आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बाबत जाणून घेऊया, जे शानदार लुकसह पावरफुल स्पेसिफिकेशनसोबत येतात. जर तुम्ही पण एक नवीन 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे फोन्स विकत घेता येतील. (Best 5G phone under RS 20000)

Realme 8G 5G

सर्वप्रथम बोलूया 20,000 रुपयांमध्ये आज सादर करण्यात आलेल्या Realme 8G 5G बाबत. 5G फोनची वाढती मागणी पाहून रियलमीने आपला नवीन आणि स्वस्त 5जी फोन भारतीय बाजारात आणला आहे. हा फोन भारतातील सर्वात कमी किंमत असलेला 5G फोन आहे. कंपनीने हा फोन 14,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. तर, 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा परफॉर्मन्सच्या बाबतीत थोडा कमजोर आहे. पण, पण या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब अशी आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तसेच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. हा फोन Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येते. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode कोला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही साइड कॅमेऱ्यात 30fps च्या रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

OPPO A74 5G

हा फोन OPPO का आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय मोबाईल फॅन्सना भेट देत OPPO A74 5G सादर केला होता. शानदार फीचर्स आणि आकर्षक लुक असलेला हा 5जी फोन ओपोने फक्त 17,990 रुपयांमध्ये सादर केला होता. OPPO A74 5G मध्ये 6.5 इंचाच्या फुल एचडी+ पंच-होल डिस्प्ले सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

OPPO A74 5G

फोटोग्राफीसाठी फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.7 लेंससह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Realme Narzo 30 Pro 5G

स्वस्त 5G फोनच्या या लिस्टमध्ये अजून एक फोन Realme चा आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Realme Narzo 30 Pro 5G सादर केला होता. या फोनची किंमत पाहता, फक्त 16,999 रुपयांमध्ये याचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंट विकत घेता येईल. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे फोनची खासियत पाहता, या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 5000 एमएएचची बॅटरी, हाई रेंज ऑडियो, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट आहे.

realme narzo 30 pro

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एआय आधारित ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. हा f/1.8 अपर्चर, 6P लेंस आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तर, दुसरी 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आहे. हा f/2.3 अपर्चर, FOV 119 डिग्री आणि PDAF सारख्या फीचर्ससह येतो. तिसरी 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस अपर्चर f/2.4 सह आहे. तसेच, फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी सेंसर देण्यात आला आहे. तसेच अपर्चर f/2.1 आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G+5G ड्यूल सिम डुअल स्टॅन्डबाय, ब्लूटूथ 5.1, GPS/AGPS/GLONASS/BEIDOU/GALILEO सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G 5G

या लिस्टमध्ये Motorola चा हा एकमेव फोन आहे जो ज्याची किंमत 20,000 मध्ये नाही. पण, या लिस्टमध्ये आम्ही हा फोन यासाठी समाविष्ट केला आहे कारण याची किंमत इतकी जास्त नाही. Moto G 5G एक कमी किंमत असलेला शानदार 5G फोन आहे जो 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 5,000mAh ची बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येईल. फोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 750G चिपसेटसह येईल. इतकेच नव्हे तर तुम्ही इतर फोन्स काही पैसे जास्त देऊन हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल.

MotoG 5G

तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मोटो जी 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मागे अपर्चर एफ/1.7 सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सल वाइड-अँगल आणि अपर्चर एफ/2.4 सह मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये पुढे अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पण आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी मोटो या फोनमध्ये 5जी, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 एसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि इतर फीचर्स आहेत.

Realme X7 5G

20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतीय बाजारात सध्या रियलमीकडे एक दोन नव्हे तर तीन फोन आहेत. या लिस्टमध्ये रियलमीचा तिसरा फोन Realme X7 5G आहे. रियलमी एक्स7 5जी च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर फोनची खासियत पाहता यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर आणि फोनमध्ये जीव ओतण्यासाठी 4310 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50 वॉट सुपरडार्ट चार्ज आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Realme X7

तसेच फोनमध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-5g-phone-under-rs-20000/feed/ 0
Realme X7 आणि X7 Pro लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, खरेदीसाठी बघावी लागेल इतकी प्रतीक्षा https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-realme-x7-pro-flipkart-availability-confirmed-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-realme-x7-pro-flipkart-availability-confirmed-india-launch-soon/#respond Mon, 25 Jan 2021 13:17:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9770 भारतात येण्याआधी हि सीरीज चीनी बाजारात आली आहे, ज्यात Realme X7 आणि Realme X7 Pro चा समावेश होता.

The post Realme X7 आणि X7 Pro लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, खरेदीसाठी बघावी लागेल इतकी प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि टेक कंपनी रियलमी भारतीय बाजारात लवकरच आपली ‘एक्स 7 सीरीज’ लाॅन्च करणार आहे. आता कन्फर्म झाले आहे कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये 5G फोन Realme X7 आणि X7 Pro सादर केले जातील. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर रियलमी एक्स7 5G सीरीज कंपनीने टीज केली आहे. पण अजूनही फोनच्या लॉन्च डेट बद्दल माहिती दिली नाही. फ्लिपकार्ट टीजर व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स शेयर केला होता.

तुम्हाला तर माहित आहे भारतात येण्याआधी हि सीरीज चीनी बाजारात आली आहे, ज्यात Realme X7 आणि Realme X7 Pro चा समावेश होता. तसेच काही दिवसांपूर्वी यातील एक रियलमी एक्स7 प्रो स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट बीआयएस वर दिसला होता. फोन्स लॉन्च होण्याआधीपासून या दोन्ही डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी

Realme X7 आणि X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 60Hz का रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी मीडियाटेक डाइमेंशन 800U चिपसेट असेल जो 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. स्मार्टफोन 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आणि 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. हँडसेट मध्ये 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

दुसरीकडे, Realme X7 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.5-इंच FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंशन 1000+ चिपसेट वर चालतो जो 8GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सह येतो. Realme X7 प्रमाणेच X7 Pro पण 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे. स्मार्टफोन मध्ये थोडी मोठी 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

किंमत

भारतात Realme X7 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 1,799 (जवळपास 19,000 रुपये) आहे. Realme X7 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 2,199 (जवळपास 23,400 रुपये) आहे.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

The post Realme X7 आणि X7 Pro लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, खरेदीसाठी बघावी लागेल इतकी प्रतीक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-realme-x7-pro-flipkart-availability-confirmed-india-launch-soon/feed/ 0
Realme X7 5G स्मार्टफोन इंडिया वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या कधी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-5g-smartphone-listed-in-india-bis/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-5g-smartphone-listed-in-india-bis/#respond Mon, 23 Nov 2020 12:56:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9041 Realme X7 इंडियन बीआईएस सर्टिफिकेशन्स साइट वर स्पॉट केला गेला आहे. वेबसाइट वर हा फोन Realme RMX2176 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

The post Realme X7 5G स्मार्टफोन इंडिया वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर मध्ये आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये रियलमी एक्स7 सीरीज सादर केली होती, ज्यात दोन स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही फोन 5G कनेक्टिविटी सह येतात. चायना लॉन्च नंतर रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी असे सांगितले होते कि येत्या काळात रियलमी एक्स7 सीरीज भारतात पण लॉन्च होईल. तसेच आता या सीरीजचा बेस मॉडेल रियलमी एक्स7 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर पण लिस्ट झाला आहे.

Realme X7 इंडियन बीआईएस सर्टिफिकेशन्स साइट वर स्पॉट केला गेला आहे. वेबसाइट वर हा फोन Realme RMX2176 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. विशेष म्हणजे चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण याच मॉडेल नंबर सह रियलमी फोन सर्टिफाइड केला गेला होता जो नंतर रियलमी एक्स7 नावाने लॉन्च झाला होता. आता बीआईएस लिस्टिंगमुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करणार आहे तसेच भारतात पण Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन लॉन्च होतील.

असेल ब्रँडचा 5G फोन

रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी म्हटले आहे कि भारतात Realme X50 Pro 5जी सह येणारा पहिला स्मार्टफोन होता आणि आता एक्स7 सीरीजच्या माध्यमातून साल 2021 मध्ये 5G कनेक्टिविटी आणि डिवायस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. माधव सेठ यांनी आगामी रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही. पण हा 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने रियलमी X50 Pro 5G सादर केला होता.

Realme X7

रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो.

Realme X7 Pro

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Realme X7 5G स्मार्टफोन इंडिया वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या कधी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-5g-smartphone-listed-in-india-bis/feed/ 0