Realme X7 5G स्मार्टफोन इंडिया वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या कधी होईल लॉन्च

Realme ने सप्टेंबर मध्ये आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये रियलमी एक्स7 सीरीज सादर केली होती, ज्यात दोन स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही फोन 5G कनेक्टिविटी सह येतात. चायना लॉन्च नंतर रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी असे सांगितले होते कि येत्या काळात रियलमी एक्स7 सीरीज भारतात पण लॉन्च होईल. तसेच आता या सीरीजचा बेस मॉडेल रियलमी एक्स7 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर पण लिस्ट झाला आहे.

Realme X7 इंडियन बीआईएस सर्टिफिकेशन्स साइट वर स्पॉट केला गेला आहे. वेबसाइट वर हा फोन Realme RMX2176 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. विशेष म्हणजे चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण याच मॉडेल नंबर सह रियलमी फोन सर्टिफाइड केला गेला होता जो नंतर रियलमी एक्स7 नावाने लॉन्च झाला होता. आता बीआईएस लिस्टिंगमुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करणार आहे तसेच भारतात पण Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन लॉन्च होतील.

असेल ब्रँडचा 5G फोन

रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी म्हटले आहे कि भारतात Realme X50 Pro 5जी सह येणारा पहिला स्मार्टफोन होता आणि आता एक्स7 सीरीजच्या माध्यमातून साल 2021 मध्ये 5G कनेक्टिविटी आणि डिवायस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. माधव सेठ यांनी आगामी रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही. पण हा 2021 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने रियलमी X50 Pro 5G सादर केला होता.

Realme X7

रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो.

Realme X7 Pro

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here