Realme X7 आणि X7 Pro लॉन्चच्या आधी फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, खरेदीसाठी बघावी लागेल इतकी प्रतीक्षा

अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि टेक कंपनी रियलमी भारतीय बाजारात लवकरच आपली ‘एक्स 7 सीरीज’ लाॅन्च करणार आहे. आता कन्फर्म झाले आहे कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये 5G फोन Realme X7 आणि X7 Pro सादर केले जातील. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर रियलमी एक्स7 5G सीरीज कंपनीने टीज केली आहे. पण अजूनही फोनच्या लॉन्च डेट बद्दल माहिती दिली नाही. फ्लिपकार्ट टीजर व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स शेयर केला होता.

तुम्हाला तर माहित आहे भारतात येण्याआधी हि सीरीज चीनी बाजारात आली आहे, ज्यात Realme X7 आणि Realme X7 Pro चा समावेश होता. तसेच काही दिवसांपूर्वी यातील एक रियलमी एक्स7 प्रो स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट बीआयएस वर दिसला होता. फोन्स लॉन्च होण्याआधीपासून या दोन्ही डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Nokia एक-दोन नाही तर घेऊन येत आहे 3 नवीन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला आव्हान देण्याची आहे तयारी

Realme X7 आणि X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 60Hz का रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी मीडियाटेक डाइमेंशन 800U चिपसेट असेल जो 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. स्मार्टफोन 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आणि 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. हँडसेट मध्ये 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

दुसरीकडे, Realme X7 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.5-इंच FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंशन 1000+ चिपसेट वर चालतो जो 8GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सह येतो. Realme X7 प्रमाणेच X7 Pro पण 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे. स्मार्टफोन मध्ये थोडी मोठी 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

किंमत

भारतात Realme X7 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 1,799 (जवळपास 19,000 रुपये) आहे. Realme X7 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 2,199 (जवळपास 23,400 रुपये) आहे.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here