Oppo F17 Pro स्मार्टफोन झाला अजून स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि वैशिष्ट्ये

OPPO F17 Pro

Oppo ने आपल्या दमदार स्मार्टफोन Oppo F17 Pro ची किंमत पुन्हा एकदा कमी केली आहे. ओप्पोने हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये शानदार डिजाइन आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च केला होता. Oppo F17 Pro स्मार्टफोन कंपनीने ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मार्केटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीच्या कपातीची माहिती ऑफलाइन सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे. इथे आम्ही तुम्हाला Oppo F17 Pro च्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सांगत आहोत. (Oppo F17 Pro gets price cut in India check new price and specifications)

Oppo F17 Pro : नवीन किंमत

Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीने 1,500 रुपयांची कपात केली आहे. या कपातीपूर्वी Oppo F17 Pro स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. किंमतीत कपातीनंतर ओप्पोचा हा स्मार्टफोन 19,990 रुपयांमध्ये ऑफलाइन मार्केटमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये हि कपात ऑफलाइन मार्केटमध्ये झाली आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म Amazon वर जुन्या किंमतीत लिस्ट आहे. शक्यतो कंपनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पण लवकरच या स्मार्टफोनची किंमत करण्याची घोषणा करू शकते.

हे देखील वाचा : फक्त 14,999 रुपयांत लॉन्च झाला Realme 8 5G, Xiaomi आणि Samsung च्या अडचणी वाढल्या

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F17 Pro फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट सोबतच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. Oppo F17 Pro फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात 30 वॉट वूक फ्लॅश चार्ज 4.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

OPPO F17 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल मोनो लेंस आणि मोनो लेंस देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण देण्यात आला आहे.

ओपो एफ17 प्रो व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here