Realme XT - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 11 Dec 2019 09:40:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/#respond Wed, 11 Dec 2019 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6034 काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 17 डिसेंबरला भारतीय बाजारात आपला नवीन डिवाईस Realme X2 लॉन्च करेल. हा स्मार्टफोन सप्टेंबर मध्ये लॉन्च झालेल्या Realme XT चा अपग्रेडेड वर्जन असेल ज्याची माहिती कंपनीने दोन महिन्यांपूर्वी दिली होती. तेव्हा कंपनीने या फोनचे नाव Realme XT 730G सांगितले होते जो आता Realme X2 नावाने टीज केला जात आहे. Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला पहिला रियलमी फोन होता जो 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. तसेच Realme X2 स्मार्टफोन पण 64MP कॅमेऱ्यासह येईल या दोन्ही स्मार्टफोनचा लुक हुबेहूब असेल, पण काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात. पुढे तुम्हाला समजेल कि का आणि किती वेळगेल आहेत हे दोन्ही स्मार्टफोन.

प्रोसेसर

Realme XT स्मार्टफोन कंपनीने भारतात एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला होता जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आणि सोबत गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पण आहे. पण Realme X2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल जो 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या प्रोसेसर वर चालेल.

बॅटरी

Realme XT कंपनीने 4,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. Realme XT 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Realme X2 मध्ये पण 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल पण हा फोन रियलमी 30वॉट VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च करेल. म्हणजे Realme X2 स्मार्टफोन Realme XT च्या तुलनेत जास्त वेगाने चार्ज होईल.

रॅम व स्टोरेज

Realme XT भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचबरोबर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर Realme X2 संबंधित जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रियलमी या स्मार्टफोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देईल. तर Realme XT 730G च्या इतर वेरिएंट्स मध्ये पण जास्त स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा सेग्मेंट

Realme X2 चा कॅमेरा सेग्मेंट Realme XT सारखा असेल. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशनची अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येते. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme X2 मध्ये पण हा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

17 डिसेंबरला Realme X2 स्मार्टफोन सोबत Realme एयरपॉड पण भारतीय बाजारात येतील. ये एयरपॉड ब्रँडचे पहिले ट्रू वायरलेस ईयरफोन असतील. तसेच Realme X2 बद्दल बोलायचे तर आशा आहे कि हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 17,000 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मिळू शकतो. Realme X2 बद्दल अशी अशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी वेरिएंट सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. Realme X2 च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा 17 डिसेंबरला होईल.

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/feed/ 0
Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/#respond Thu, 05 Dec 2019 15:05:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5985 Realme XT 730G बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह पण लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने भारतात ब्रँडचा पहिला 64MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च करताना म्हटले होते कि कंपनी डिसेंबर महिन्यात या फोनचा अपग्रेडेड वर्जन पण आणेल ज्यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल. कंपनीने अजून या स्मार्टफोनची लॉन्च डेट नाही सांगितली पण फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील हि माहिती आधीपासून ऑफिशियल आहे. आता Realme च्या घोषणेआधी 91 मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि Realme XT 730G स्मार्टफोन भारतात 20 डिसेंबर आधीच लॉन्च केला जाईल आणि या स्मार्टफोनची किंमत 17,000 रुपयांच्या असपास असेल.

91 मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Realme XT 730G स्मार्टफोन 20 डिसेंबरच्या आधी भारतीय बाजारात येईल. या फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार Realme XT 730G ची बेस किंमत 17,000 रुपयांच्या आसपास असेल. या मॉडेलची मुख्य यूएसपी फोन मधील क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल.

Realme XT 730G बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे Realme XT 730G स्मार्टफोन सोबत Realme कंपनी ‘एयरपॉड’ पण भारतात लॉन्च करेल. हे एयरपॉड ब्रँडचे पहिले ट्रू वायरलेस ईयरफोन असतील. तर बाजारात Realme एयरपॉड येलो ह्यू सह ब्लॅक आणि वाईट कलर मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात.

Realme XT कॅमेरा

Realme XT मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेल्या अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चार करता येतात. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वर 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme XT 730G मध्ये पण हा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग केली आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 सह आला आहे. ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Realme XT 730G मध्ये पावर बॅकअप साठी 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

The post Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/feed/ 0
Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/#respond Wed, 16 Oct 2019 13:40:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5541 पुढे आम्ही Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची तुलना केली आहे जी भारतीय यूजर्सना योग्य फोन निवडण्यास मदत करेल.

The post Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण टेक बाजारात हीच चर्चा होती आणि प्रश्न होता कि, कोणता ब्रँड असेल जो भारतात सर्वात आधी 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलला स्मार्टफोन घेऊन येईल. 64 MP कॅमेऱ्याच्या शर्यतीत Realme ने बाजी मारली आणि सप्टेंबरच्या सुरवातीला Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. आज जवळपास एका महिन्यानंतर Xiaomi ने पण भारतीय बाजारात आपला 64 MP क्वॉड रियर कॅमेरा असलेला फोन Redmi Note 8 Pro लॉन्च केला आहे. जे लोक दिवाळीच्या निमित्ताने नवीन फोन विकत घेऊ इच्छित आहेत आणि गोंधळात आहेत कि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला कोणता फोन घ्यावा, तर पुढे आम्ही Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची तुलना केली आहे जी भारतीय यूजर्सना योग्य फोन निवडण्यास मदत करेल.

लुक व डिजाईन

Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन सह येतात. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तसेच वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme XT चा रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे तर Redmi Note 8 Pro चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. Redmi Note 8 Pro च्या कॅमेरा सेटअप सह फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. दोन्ही फोन ग्लॉस बॅक सह प्रीमियम लुक देतात.

डिस्प्ले

सुरवात Realme XT पासून करू, हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.9 टक्के आहे. Realme XT कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे. फोनच्या सुरक्षेसाठी Realme XT च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे.

Redmi Note 8 Pro पण 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे जो 91.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Xiaomi ने आपल्या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही. तसेच फोनच्या सुरक्षेसाठी Redmi Note 8 Pro मध्ये पण फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत.

कॅमेरा सेग्मेंट

Redmi Note 8 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 ISOCELL सेंसर देण्यात आला आहे जो क्वॉड रियर कॅमेरा सेटअपचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर रेडमी नोट 8 प्रो मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे जो 120डिग्री वाइड अँगल वर काम करतो. त्याचबरोबर Redmi Note 8 Pro मध्ये 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Redmi Note 8 Pro मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme XT च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये पण 64 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL Bright GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरला सपोर्ट करतो. फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme XT एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग साठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी फोन गरम होऊ देत नाही.

Redmi Note 8 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा नवीन चिपसेट हेलीयो जी90टी देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूथ करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तसेच गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro गेम टर्बों 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो.

बॅटरी पावर

Realme XT मध्ये पावर बॅकअप साठी VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Redmi Note 8 Pro कंपनी द्वारा 18वॉट फास्ट चार्जिंग असेलल्या 4500एमएएच च्या दमदार बॅटरी सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे जी यूएसबी टाईप-सी सह चालते.

वेरिएंट व किंमत

Redmi Note 8 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. Redmi Note 8 Pro गामा ग्रीन, हॉलो वाईट आणि शॅडो ब्लॅक कलर मध्ये 21 ऑक्टोबर पासून अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल.

Realme XT पण भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये तथा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन पर्ल ब्लू आणि पर्ल वाईट कलर मध्ये फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

The post Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/feed/ 0
Redmi Note 8 Pro भारतात लॉन्च, 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम आणि 4500एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-launch-in-india-64-mp-camera-features-specifications-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-launch-in-india-64-mp-camera-features-specifications-price-sale-offer/#respond Wed, 16 Oct 2019 13:03:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5538 हे दोन्ही फोन येत्या 21 ऑक्टोबर पासून कंपनी वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post Redmi Note 8 Pro भारतात लॉन्च, 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने दीर्घ प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी नोट’ सीरीजचा विस्तार केला आहे. देशात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत शाओमीने Redmi Note 8 Pro इंडियन मार्केट मध्ये आणला आहे. हा फोन भारतात लॉन्च झालेला पहिला रेडमी फोन आहे जो 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. Redmi Note 8 Pro सोबत शाओमी ने Redmi Note 8 मॉडेल पण बाजारात आणला आहे तसेच हे दोन्ही फोन येत्या 21 ऑक्टोबर पासून कंपनी वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होतील.

किंमत

Redmi Note 8 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. Redmi Note 8 Pro गामा ग्रीन, हॉलो वाईट आणि शॅडो ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Redmi Note 8 बद्दल बोलायचे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 8 स्पेस ब्लॅक, नेप्च्युन पर्पल, कॉस्मिक पर्पल आणि मूनलाईट वाईट कलर मध्ये विकत घेता येईल.

Redmi Note 8 Pro

डिजाईन व डिस्प्ले

Redmi Note 8 Pro वॉटरड्रॉप नॉच डिजाईन सह येतो ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.4 टक्के आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे. तीन कॅमेरा सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर एकाच रांगेत आहेत तसेच या सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आणि मॅक्रो सेंसर आहे. तसेच फोनच्या सुरक्षेसाठी Redmi Note 8 Pro चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत.

64 MP कॅमेरा

Redmi Note 8 Pro मध्ये 64-मेगापिक्सलचा Samsung चा GW1 सेंसर आहे. GW1 सेंसर ISOCELL टेक्नॉलजीचा वापर करून पिक्सल-टू-पिक्सल बॅरियर बनवतो जो पिक्सल्स मधील लाइट कमी करून कलर रिप्रॉडक्शन चांगले करतो. 64-मेगापिक्सलचा हा सेंसर (9248×6936) पिक्सल रेजोल्यूशन असलेले फोटोचे आउटपुट देतो. इतकेच नव्हे तर या सेंसरने 480-फ्रेम प्रति सेकंदाच्या स्पीडने स्लो-मोशन विडियो पण शूट केला जाऊ शकतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर सोबत एफ/2.2 अपर्चर असेलला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे जो 120डिग्री वाइड अँगल वर काम करतो. त्याचबरोबर Redmi Note 8 Pro मध्ये 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 10x डिजीटल जूमला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी Redmi Note 8 Pro मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

ओएस व प्रोसेसर

Redmi Note 8 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा नवीन चिपसेट हेलीयो जी90टी देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूथ करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तसेच गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro गेम टर्बों 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो.

64MP कॅमेर्‍यासह आला Xiaomi Redmi Note 8 Pro, करेल का Realme ची सुट्टी? #RedmiNote8pro #91mobilesMarathi

91mobiles मराठी यांनी वर पोस्ट केले बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

कनेक्टिविटी आणि बॅटरी

Redmi Note 8 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये आईआर ब्लास्टर, ब्लूटूथ, डुअल सिम, डुअल 4जी, वाईफाई आणि यूएसबी टाईप सी सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच Redmi Note 8 Pro ची मोठी खासियत फोन मधील Alexa सपोर्ट आहे ज्या द्वारे फोनवरूनच स्मार्ट डिवाईसेज कंट्रोल केले जाऊ शकतात. तसेच पावर बॅकअप साठी Redmi Note 8 Pro 18वॉट फास्ट चार्जिंग असेलल्या 4500एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi Note 8

Xiaomi ने Redmi Note 8 Pro सोबत Redmi Note 8 भारतात लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Redmi Note 8 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Redmi Note 8 मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी नोट 8 प्रो वीडियो

The post Redmi Note 8 Pro भारतात लॉन्च, 64 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम आणि 4500एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-launch-in-india-64-mp-camera-features-specifications-price-sale-offer/feed/ 0
Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/#respond Fri, 11 Oct 2019 15:18:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5510 Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस येताच टेक कंपन्या कामाला लागतात. सर्व ब्रॅण्ड्स आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी आणि स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आर्कषक ऑफर देत आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर हे स्मार्टफोन डिस्काउंट आणि आर्कषक ऑफर्स सह विकले जात आहेत. तसेच स्मार्टफोन ब्रँड पण आपल्या प्रोडक्ट्सची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती कमी करून ते डिस्काउंट सह विकत आहेत. खूप वेगाने प्रसिद्ध झालेली टेक कंपनी Realme ने पण आज आपल्या दिवाळी सेलची की घोषणा केली आहे.

Realme ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे कि 12 ऑक्टोबर पासून कंपनी भारतात दिवाळी सेलची सुरवात करत आहे. Realme चा हा सेल रात्री 12 वाजता सुरु होऊन 16 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत चालेल. Realme ने आपला सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु केला आहे. या सेल मध्ये Realme फोन भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील.

अश्या आहेत ऑफर

Realme C2 चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 5,999 रुपये आणि फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Realme 3 स्मार्टफोन वर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाईस 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दिवाळी ऑफर मध्ये Realme 3 Pro पण 1,000 रुपये स्वस्त मिळेल, फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 पाहता, ब्रँड या फोन वर पण 1,000 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर Realme X, Realme 3i आणि Realme 5 Pro सोबत Realme XT कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून एचडीएफसी कार्डने विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच हे फोन फ्लिपकार्ट वरून विकत घेतल्यास एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी निवडक स्मार्टफोन्स वर नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/feed/ 0
8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/#respond Tue, 24 Sep 2019 13:51:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5403 Realme X2 डिसेंबर मध्ये भारतात येईल आणि भारतीय बाजारात हा फोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने या महिन्यात भारतात ब्रँडचा पहिला 64 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च केला होता. फोन भारतीय बाजारात लॉन्च करताना Realme ने सांगितले होते कि कंपनी डिसेंबर मध्ये या फोनचा अजून एक मॉडेल देशात लॉन्च करेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह येईल. आज Realme ने हा आगामी स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. Realme ने हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जिथे हा Realme X2 नावाने सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 स्पेसिफिकेशन्स

रियलमीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 91.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होतो. फोनच्या डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Realme X2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme X2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 730जी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू आहे. चीनी बाजारात Realme X2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme X2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. Realme X2 मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme X2 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme X2 डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 30W VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. विशेष म्हणजे हि चार्जिंग टेक्नॉलॉजी फक्त 30 मिनिटांत फोन 67 टक्के चार्ज करू शकते.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये होईल भारतात लॉन्च, किंमत होईल 10,990 रुपयांपासून सुरु

किंमत

Realme X2 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 1599 युआन (जवळपास 15,900 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 1899 युआन (जवळपास 18,900 रुपये) आहे. Realme X2 चीन मध्ये पर्ल व्हाइट आणि पर्ल ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Realme X2 डिसेंबर मध्ये भारतात येईल आणि भारतीय बाजारात हा फोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/feed/ 0
64 Megapixel कॅमेरा असेलला Realme XT भारतात झाला लॉन्च, Xiaomi ला दिला मोठा झटका https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-launched-in-india-price-features-specifications-sale-offer-64-mp-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-launched-in-india-price-features-specifications-sale-offer-64-mp-quad-rear-camera/#respond Fri, 13 Sep 2019 12:31:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5303 कंपनीने Realme XT 15,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे

The post 64 Megapixel कॅमेरा असेलला Realme XT भारतात झाला लॉन्च, Xiaomi ला दिला मोठा झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हापासून अशी चर्चा सुरु आहे कि आता स्मार्टफोन्स मध्ये 64 Megapixel चा कॅमेरा पण मिळेल तेव्हापासून मोबाईल यूजर्स खूप उत्साहित आणि हि नवीन व अनोखी टेक्नॉलॉजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. जसे जसे स्मार्टफोन ब्रँड्सनी टीज करायला सुरवात केली कि ते 64 Megapixel कॅमेरा असलेला स्मार्टफोन अनंत आहेत तेव्हापासून चर्चा होत आहे कि कोणती कंपनी सर्वात आधी 64 Megapixel कॅमेरा असलेला फोन लॉन्च करेल. या शर्यतीत सर्वात पुढे Xiaomi आणि Realme ब्रँड होते. या दोन्ही दिग्गज ब्रँडने आपला 64 MP कॅमेरा असलेले फोन सादर केले आहेत, पण आज Realme ने बाजी मारत भारतातील पहिला 64 Megapixel कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च केला आहे.

Realme XT कंपनीने आधीच सादर केला होता, आता हा दमदार स्मार्टफोन बाजारात आला आहे. कंपनीने Realme XT 15,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे जो 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. Realme XT चा दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 16,999 रुपये आहे. फोनचा सर्वात मोठा 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Realme XT पर्ल ब्लू आणि पर्ल वाईट कलर मध्ये 16 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme XT कॅमेरा

Realme XT भारतातील पहिला 64-Megapixel कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून ओळखला जाईल. या फोनची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी ची वापरली जाईल. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा कॅमेरा नाइटस्केप मोड आणि क्रोमकॉस्ट सारख्या फीचर्स सह येतो जो चांगले फोटो कॅप्चर करतो.

Realme XT लुक व डिजाईन

सर्वात आधी बहुप्रतीक्षित स्मार्टफोनच्या लुक बद्दल बोलायचे तर कंपनीने आपला फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme ने याला ‘ड्यूड्रॉप नॉच’ चे नाव दिले आहे. Realme XT कंपनीने ग्लॉस बॅक पॅनल वर सादर केला जो दिसायला प्रीमियम वाटतो.

Realme XT क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चारही सेंसर एकाच रिंग मध्ये आहेत तसेच सर्वात वर देण्यात आले कॅमेरा सेंसरच्या चारही बाजूला पिवळ्या रंगाची आउट लाईन आहे. या सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खाली Realme ची ब्रँडिंग आहे. Realme XT च्या साईड पॅनल वर पावर बटण व वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे.

Realme ने भारतात Realme XT स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याचप्रमाणे Realme XT चा सर्वात मोठा वेरिएंट कंपनीने 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी हा स्मार्टफोन 20वॉट चार्जिंगला सपोर्ट आणि VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

The post 64 Megapixel कॅमेरा असेलला Realme XT भारतात झाला लॉन्च, Xiaomi ला दिला मोठा झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-launched-in-india-price-features-specifications-sale-offer-64-mp-quad-rear-camera/feed/ 0
कसा चालतो Realme XT आणि Redmi Note 8 Pro चा 64-Megapixel कॅमेरा, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-xiaomi-redmi-note-8-pro-64-megapixel-samsung-isocell-bright-gw1/ https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-xiaomi-redmi-note-8-pro-64-megapixel-samsung-isocell-bright-gw1/#respond Sat, 31 Aug 2019 10:48:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5190 Realme आणि Xiaomi चे हे स्मार्टफोन्स Samsung च्या ISOCELL Bright GW1 कॅमेरा टेक्नॉलॉजी वर बनले आहेत

The post कसा चालतो Realme XT आणि Redmi Note 8 Pro चा 64-Megapixel कॅमेरा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही महिन्यांपासून टेक विश्वात 64-Megapixel कॅमेऱ्याची चर्चा होती. स्पर्धा सुरु होती कि कोणता ब्रँड सर्वात आधी 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला घेऊन येईल. Realme आणि Xiaomi दोन्ही टॉप ब्रँड्सने आपले आपले डिवाईसेज सादर केले होते जो 64-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजी वर चालतो. तसेच याच आठवड्यात या दोन्ही ब्रँड्सने आपले डिवाईसेज सादर केले आहेत. रियलमी ने Realme XT सादर केला आहे तर Xiaomi ने Redmi Note 8 Pro अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 64-Megapixel कॅमेरा सेंसर सह येतात.

Realme XT आणि Xiaomi Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्स 64-मेगापिक्सल सेंसर असलेल्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केले गेले आहेत. दोन्ही ब्रँड्सचे फॅन्स आपल्या आवडत्या कंपनीला सपोर्ट करत आहेत. विशेष म्हणजे Realme आणि Xiaomi चे हे स्मार्टफोन्स Samsung च्या ISOCELL Bright GW1 कॅमेरा टेक्नॉलॉजी वर बनले आहेत आणि हि टेक्नॉलॉजी 64-मेगापिक्सल कॅमेरा सेंसरला सपोर्ट करते. Realme XT असो किंवा Xiaomi Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन एक सारख्या टेक्नोलॉजीचा वापर करून 64-मेगापिक्सल कॅमेऱ्याचा रिजल्ट देतात. चाल तर मग बघूया काय आहे Samsung ची हि टेक्नॉलॉजी.

64-एमपी कॅमेरा असा चालतो

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो. सॅमसंगच हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये पण प्रोग्राम फॉलो करतो आणि 64-मेगापिक्सलचा फोटो क्लिक करतो.

Realme XT आणि Xiaomi Redmi Note 8 Pro मधील ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

असे असतील खास फीचर्स

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल. हे स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करतात.

Redmi Note 8 Pro कॅमेरा सेग्मेंट

Xiaomi च्या या नवीन स्मार्टफोन मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअप एफ/1.7 अपर्चर आणि 0.8-माइक्रोमीटर पिक्सल वाल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 120डिग्रीची क्षमतेची 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 25x झूम सह 960fps वर 8K रेज्ल्यूशनचा वीडियो रेकॉर्ड करू शकतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Redmi Note 8 Pro मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme XT

रियलमीने हा फोन अजूनही बाजारात आणला नाही पण कॅमेरा सेग्मेंट पाहता Realme XT एफ/1.8 अपर्चर वाल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT मध्ये 16-मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट सेंसर देण्यात आला आहे. समोर आलेल्या डिटेल्स नुसार Realme XT चा रियर कॅमेरा EIS सपोर्ट सह 4K रेज्ल्यूशन वाले फोटो घेऊ शकेल.

The post कसा चालतो Realme XT आणि Redmi Note 8 Pro चा 64-Megapixel कॅमेरा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-xiaomi-redmi-note-8-pro-64-megapixel-samsung-isocell-bright-gw1/feed/ 0
64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/#respond Thu, 29 Aug 2019 12:22:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5161 कंपनीने Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

The post 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आज आपल्या सब ब्रँड Redmi मध्ये Redmi Note 7 सीरीजची अपग्रेडेड सीरीज Redmi Note 8 सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. Redmi Note 8 व Note 8 Pro च्या लॉन्चच्या आधी फोन्स संबंधित अनेक स्पेसिफिकेशन्स व लीक बातम्या समोर आल्या होत्या, त्यांच्यावर पूर्णविराम देत कंपनीने हे अधिकृतपणे लॉन्च केले आहेत.

डिजाइन

Redmi Note 8 ची डिजाइन पाहता हि अगदी Redmi Note 7 प्रो च्या डिजाइनच्या आधारवर सादर केली गेली आहे. फोन मध्ये वर्टिकल रियर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच फोन मध्ये फ्रंटला डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या नॉच मध्ये फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 8 Pro ची डिजाइन पाहता यात पण Redmi Note 8 प्रमाणे रियर क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. फक्त कॅमेरा पोजिशन वेगळी आहे. Redmi Note 8 Pro मध्ये मधोमध तीन कॅमेऱ्यांसह फिंगरप्रिंट सेंसर आहे. तर उजवीकडे फ्लॅश सह एक कॅमेरा सेंसर आहे. मागे खालच्या बाजूला वर्टिकली Redmi ची ब्रँडिंग आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. Redmi Note 8 Pro मध्ये खाली 3.5एमएम हेडफोन जॅक व स्पीकर ग्रिल आहे.

Redmi Note 8 चा कॅमेरा सेटअप

कॅमेरा सेगमेंट बद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 8 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. इतर 3 कॅमेरे पाहता फोन मध्ये दुसरा रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे जी वाइडस एंगल लेंस आहे. तिसरा 2-मेगापिक्सलचा आहे जी मॅक्रो लेंस आहे. तर चौथा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 8 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 8 मध्ये डॉट नॉच वाला 6.3-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340X1080 पिक्सल रिजोल्यूशन सह येतो. यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे Redmi Note 8 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई बेस्ड MIUI 10 वर चालतो.

तसेच फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB + 64GB स्टोरेज वेरिएंट आणि 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. पावर बॅकअप साठी Note 8 मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Note 8 Pro मध्ये 6.53-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो डॉट नॉच सह येतो. तसेच Redmi Note 8 Pro मीडियाटेक हीलियो G90T चिपसेट आहे. हा पहिला फोन आहे ज्यात हा नवीन चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे जी अल्ट्रावाइड लेंस आहे. तिसरा 2-मेगापिक्सलचा आहे जी मॅक्रो लेंस आहे. तर चौथा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा आहे.

Redmi Note 8 Pro 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

64MP चा कॅमेरा आहे खास

Redmi Note 8 मध्ये कंपनीने 64-मेगापिक्सल वाला Samsung चा GW1 सेंसर दिला आहे. GW1 सेंसर ISOCELL टेक्नॉलजीचा वापर करून पिक्सल-टू-पिक्सल बॅरियर बनवतो ज्यामुळे पिक्सल्स मधील प्रकाश कमी होऊन कलर रिप्रॉडक्शन चांगले होते. 64-मेगापिक्सलचा हा सेंसर (9248×6936) पिक्सल रेजोल्यूशनचा फोटो आउटपुट देतो. इतकेच नव्हे तर या सेंसर मधून 480-फ्रेम प्रति सेकंद स्पीड वर स्लो-मोशन विडियो पण शूट करता येतो.

किंमत

Redmi Note 8

4जीबी + 64जीबी- 999 Yuan (जवळपास 10,000 रुपये)

6जीबी + 64जीबी- 1199 Yuan (जवळपास 12,000 रुपये)

8जीबी + 128जीबी- 1399 Yuan (जवळपास 14,000 रुपये)

Redmi Note 8 Pro

6जीबी + 64जीबी- 1399 Yuan (जवळपास 14,000 रुपये)

6जीबी + 128जीबी- 1599 Yuan (जवळपास 16,000 रुपये)

8जीबी + 128जीबी- 1799 Yuan (जवळपास 18,000 रुपये)

The post 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/feed/ 0
Realme Q सीरीज मध्ये लॉन्च होतील नवीन स्मार्टफोन, 5 सप्टेंबरला येईल समोर https://www.91mobiles.com/marathi/realme-q-series-of-smartphones-confirmed-smartphone-to-launch-on-september-5/ https://www.91mobiles.com/marathi/realme-q-series-of-smartphones-confirmed-smartphone-to-launch-on-september-5/#respond Wed, 28 Aug 2019 14:13:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5159 या स्मार्टफोन मध्ये F/2.2 अर्परचर सह 119 डिग्री FoV सुपर-वाइड-अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post Realme Q सीरीज मध्ये लॉन्च होतील नवीन स्मार्टफोन, 5 सप्टेंबरला येईल समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी रियलमीने आज भारतात जगातील पहिला 64-मेगापिक्सल क्वाड कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT सादर केला आहे. तसेच आता बातमी समोर आली आहे कि Realme 5 सप्टेंबरला आपल्या नवीन Q सीरीज मध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

रियलमीने काही दिवसांपूर्वी एक टीजर सादर केला होता, ज्यात एका अंड्यात डायनासोर दिसत होता. अलीकडे Weibo अकाउंट मध्ये एक दुसरा टीजर सादर केला गेला, ज्यात ‘क्वीन’ प्लेइंग कार्ड दाखवण्यात आला होता. यात क्वीनचा Q दिसत होता. तर आता कंपनीने अजून एक टीजर प्रसिद्ध करून स्पष्ट केले आहे कि कंपनी आपले नवीन फोन्स Q सीरीज मध्ये सादर करेल.

टीजर इमेज मध्ये 5 सप्टेंबरच्या रिलीज डेटचा पण खुलासा झाला आहे. म्हणजे Q सीरीजचे स्मार्टफोन्स 5 सप्टेंबरला लॉन्च केले जातील. टीजर मध्ये फोनची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण ‘क्वीन’ प्लेइंग कार्डच्या टीजर पोस्टर मध्ये 119 नंबर देण्यात आला होता. यावरून समजते कि या स्मार्टफोन मध्ये F/2.2 अर्परचर सह 119 डिग्री FoV सुपर-वाइड-अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे.

Realme ने भारतात Realme XT स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याचप्रमाणे Realme XT चा सर्वात मोठा वेरिएंट कंपनीने 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी हा स्मार्टफोन 20वॉट चार्जिंगला सपोर्ट आणि VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

सोर्स

The post Realme Q सीरीज मध्ये लॉन्च होतील नवीन स्मार्टफोन, 5 सप्टेंबरला येईल समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-q-series-of-smartphones-confirmed-smartphone-to-launch-on-september-5/feed/ 0