Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती?

जवळपास दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण टेक बाजारात हीच चर्चा होती आणि प्रश्न होता कि, कोणता ब्रँड असेल जो भारतात सर्वात आधी 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलला स्मार्टफोन घेऊन येईल. 64 MP कॅमेऱ्याच्या शर्यतीत Realme ने बाजी मारली आणि सप्टेंबरच्या सुरवातीला Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. आज जवळपास एका महिन्यानंतर Xiaomi ने पण भारतीय बाजारात आपला 64 MP क्वॉड रियर कॅमेरा असलेला फोन Redmi Note 8 Pro लॉन्च केला आहे. जे लोक दिवाळीच्या निमित्ताने नवीन फोन विकत घेऊ इच्छित आहेत आणि गोंधळात आहेत कि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला कोणता फोन घ्यावा, तर पुढे आम्ही Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची तुलना केली आहे जी भारतीय यूजर्सना योग्य फोन निवडण्यास मदत करेल.

लुक व डिजाईन

Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन सह येतात. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तसेच वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme XT चा रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे तर Redmi Note 8 Pro चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. Redmi Note 8 Pro च्या कॅमेरा सेटअप सह फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. दोन्ही फोन ग्लॉस बॅक सह प्रीमियम लुक देतात.

डिस्प्ले

सुरवात Realme XT पासून करू, हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.9 टक्के आहे. Realme XT कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे. फोनच्या सुरक्षेसाठी Realme XT च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे.

Redmi Note 8 Pro पण 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे जो 91.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Xiaomi ने आपल्या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही. तसेच फोनच्या सुरक्षेसाठी Redmi Note 8 Pro मध्ये पण फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत.

कॅमेरा सेग्मेंट

Redmi Note 8 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 ISOCELL सेंसर देण्यात आला आहे जो क्वॉड रियर कॅमेरा सेटअपचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर रेडमी नोट 8 प्रो मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे जो 120डिग्री वाइड अँगल वर काम करतो. त्याचबरोबर Redmi Note 8 Pro मध्ये 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Redmi Note 8 Pro मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme XT च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये पण 64 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL Bright GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरला सपोर्ट करतो. फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme XT एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग साठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी फोन गरम होऊ देत नाही.

Redmi Note 8 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा नवीन चिपसेट हेलीयो जी90टी देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूथ करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तसेच गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro गेम टर्बों 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो.

बॅटरी पावर

Realme XT मध्ये पावर बॅकअप साठी VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Redmi Note 8 Pro कंपनी द्वारा 18वॉट फास्ट चार्जिंग असेलल्या 4500एमएएच च्या दमदार बॅटरी सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे जी यूएसबी टाईप-सी सह चालते.

वेरिएंट व किंमत

Redmi Note 8 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. Redmi Note 8 Pro गामा ग्रीन, हॉलो वाईट आणि शॅडो ब्लॅक कलर मध्ये 21 ऑक्टोबर पासून अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल.

Realme XT पण भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये तथा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन पर्ल ब्लू आणि पर्ल वाईट कलर मध्ये फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here