Redmi K40 Game Enhanced Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 May 2021 13:22:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-gaming-enhanced-edition-gets-bis-certification-in-india-may-launch-soon-with-poco-branding/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-gaming-enhanced-edition-gets-bis-certification-in-india-may-launch-soon-with-poco-branding/#respond Tue, 11 May 2021 13:22:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10891 Xiaomi ने याआधी पण अनेक रेडमी ब्रँडचे स्मार्टफोन भारतीय बाजारात POCO ब्रँडसह सादर केले आहेत. आता कंपनी चीनमध्ये लॉन्च झालेला Redmi K40 Gaming Enhanced Edition स्मार्टफोन भारतात पोको ब्रँडिंगसह सादर करू शकते.

The post Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या महिन्यात चीनमध्ये Redmi K40 Gaming Enhanced Edition स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा कंपनीचा पहिला गेमिंग स्मार्टफोन आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनबाबत समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि हा फोन भारतात POCO ब्रँडिंगसह सादर केला जाऊ शकतो. प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानुसार शाओमीचा या स्मार्टफोनला Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये असा दावा केला आहे कि शाओमीचा हा गेमिंग स्मार्टफोन POCO च्या ब्रँडिंगसह सादर केला जाऊ शकतो. (Xiaomi Redmi K40 Gaming Enhanced Edition gets BIS certification in India may launch soon with Poco branding)

Xiaomi ने याआधी पण अनेक रेडमी ब्रँडचे स्मार्टफोन भारतीय बाजारात POCO ब्रँडसह सादर केले आहेत. आता कंपनी चीनमध्ये लॉन्च झालेला Redmi K40 Gaming Enhanced Edition स्मार्टफोन भारतात पोको ब्रँडिंगसह सादर करू शकते. सध्या कंपनीने या स्मार्टफोनच्या इंडियन स्मार्टफोन मार्केटमधील लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : Realme-Redmi ला टक्कर देण्यासाठी आला 7 इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी असलेला भारतीय स्मार्टफोन, किंमत फक्त 7799 रुपये

Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंपिलिंग रेट 480Hz आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह सादर केला गेला आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह लॉन्च केला गेला आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी ऑफर करण्यात आली आहे.

redmi k40 game enhanced edition

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये आला Realme C20A, 5000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त फोनची किंमत आहे 7,000 रुपयांच्या आसपास

कॅमेरा डिपार्टमेंट पाहता Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP चा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर चालतो. या फोनमध्ये युजर्स जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस मिळण्यासाठी Game Mode देण्यात आला आहे.

The post Redmi K40 Gaming Enhanced Edition ला भारतात मिळाले BIS सर्टिफिकेशन, Poco ब्रँडिंगसह लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-gaming-enhanced-edition-gets-bis-certification-in-india-may-launch-soon-with-poco-branding/feed/ 0
Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-enhanced-edition-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-enhanced-edition-launched-check-price-and-specifications/#respond Wed, 28 Apr 2021 11:47:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10732 Redmi K40 स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. Redmi च्या गेमिंग फोनमध्ये 5,065mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करते.

The post Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने आपला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रेडमीचा हा फोन कंपनीच्या Redmi K40 सीरीजचा सदस्य आहे. हा गेमिंग फोन Redmi K40 Game Enhanced Edition या नावाने सादर केला गेला आहे. रेडमी ब्रँडचा हा पहिला गेमिंग स्मार्टफोन आहे, जो कंपनीने गेमिंग ट्रिगर बटणसह सादर केला आहे. रेडमीच्या या गेमिंग स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूंनी अ‍ॅबिएंट लाइट देण्यात आली आहे, जी वेगवेगळे रंग बदलते. हि लाइटिंग कॉल, मेसेज आणि चार्जिंग दरम्यान LED नोटिफिकेशन म्हणून काम करते. Redmi K40 Game Enhanced Edition मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले पंचहोल कटआउट देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला या फोनबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Xiaomi Redmi K40 enhanced edition launched check price and specifications)

Redmi K40 Game Enhanced Edition : किंमत

Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोनची किंमत पाहता या फोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1,999 RMB (जवळपास 23,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनचा दुसरा वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 2,199 RMB (जवळपास 25,300 रुपये), तिसरा वेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 2,399RMB आणि चौथा वेरिएंट 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 2,399 RMB (जवळपास 27,600 रुपये) आणि टॉप अँड हायएन्ड वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 2,699 RMB (जवळपास 31,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर

Redmi K40 Game Edition

Redmi K40 Game Enhanced Edition : स्पेसिफिकेशन्स

Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅप्लिंग रेट 480Hz आहे. हा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येतो. तसेच डिस्प्लेच्या तिन्ही बाजूंना 1.8mm चा बेजल देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आली आहे. रेडमीच्या या गेमिंग स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. या फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Redmi K40 स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. Redmi च्या गेमिंग फोनमध्ये 5,065mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : हि चायनीज कंपनी घेऊन येत आहे 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन, टाकेल का Samsung ला मागे?

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi K40 Game Enhanced Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP वाइड अँगल लेंस आणि 2MP ची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C देण्यात आला आहे.

The post Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k40-enhanced-edition-launched-check-price-and-specifications/feed/ 0