Realme ने लो बजेट ‘सी’ सीरीजमध्ये Realme C20 आणि Realme C21 स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने आज पुन्हा स्वस्त स्मार्टफोनच्या बाजारात आपला नवीन फोन आणला आहे. कंपनीने टेक मार्केटमध्ये नवीन मोबाईल फोन Realme C20A लॉन्च केला आहे ज्याने लो बजेटमध्ये एंट्री घेतली आहे. रियलमी सी20ए एक एंट्री लेवल डिवायस आहे जो सध्या शेजारच्या बांग्लादेशात लॉन्च झाला आहे. Realme C20A ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहिल्यानंतर भारतातील रियलमी फॅन्स पण या फोनच्या भारतीय लॉन्चची वाट बघू लागतील. (Low budget smartphone Realme C20A launched price specs sale offer)
Realme C20A चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी20ए कंपनीने 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च केला आहे जो 400एम2 ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.5 टक्के आहे. Realme C20A कंपनीने अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च केला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 12एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी जीई8320 जीपीयू आहे.
Realme C20A फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची लेंस देण्यात आली आहे जी 4एक्स डिजीटल झूमला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : Realme-Redmi ला टक्कर देण्यासाठी आला 7 इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी असलेला भारतीय स्मार्टफोन, किंमत फक्त 7799 रुपये
रियलमी सी20ए डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी, या फोनमध्ये फेस अनलाॅक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी Realme C20A स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Realme C20A ची डिजाईन
रियलमीने आपला हा फोन ‘Geometric Art Design’ वर लॉन्च केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच रुंद चिन पण आहे. रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डावीकडे आहे ज्यात सिंगल लेंससह फ्लॅश लाईट पण आहे. रियर पॅनलवर वर्टिकल शेपमध्ये Realme ची ब्रँडिंग आहे. या फोनचे डामेंशन 165.2×76.4×8.9एमएम आणि वजन 190ग्राम आहे. रियलमी 20ए Iron Grey आणि Lake Blue कलरमध्ये लॉन्च केला गेला आहे.
Realme C20A ची किंमत
रियलमी सी20ए बांग्लादेशात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256जीबी पर्यंत वाढवता येते. बांग्लादेशात या फोनची किंमत BDT8,990 म्हणजे भारतीय करंसीनुसार 7,500 रुपये आहे.
















