Realme-Redmi ला टक्कर देण्यासाठी आला 7 इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी असलेला भारतीय स्मार्टफोन, किंमत फक्त 7799 रुपये

LAVA Z2 MAX

Lava International, भारतीय मोबाईल निर्माता कंपनीने आज देशात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन डिवायस सादर केला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन Lava Z2 Max भारतीय बाजारात लॉन्च केला आहे जो आर्कषक लुकसोबतच शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. लावा झेड2 मॅक्स कंपनीने लो बजेट सेग्मेंटमध्ये आणला आहे ज्याने फक्त 7,799 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. लावाचा हा स्वस्त मोबाईल फोन Lava Z2 Max ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल. (Lava Z2 Max launch in India with 6000mah battery 7 inch display price Rs. 7799 specs sale offer)

Lava Z2 Max चे स्पेसिफिकेशन आणि किंमत

लावा झेड2 मॅक्स कंपनीने 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 7 इंचाच्या मोठ्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. Lava Z2 Max अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ वर्जनवर सादर केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो चिपसेटवर चालतो. कंपनीने अजूनतरी या चिपसेटचा खुलासा केला नाही.

LAVA Z2 MAX

फोटोग्राफीसाठी लावा झेड2 मॅक्समध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Lava Z2 Max डुअल सिम आणि 4जी एलटीईला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला स्वस्त Infinix HOT 10T स्मार्टफोन

Lava Z2 Max चा लुक आणि डिजाईन

लावा झेड2 मॅक्स कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर बेजललेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनलवर चौरसाकृती रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात दोन सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर इतर कोणताही सेंसर नाही. या फोनचे डायमेंशन 174.7×78.6×9.05एमएम आणि वजन 216 ग्राम आहे तसेच हा Green आणि Gray कलरमध्ये विकत घेता येईल.

Lava Z2 Max ची किंमत आणि विक्री

लावा कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे जो 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत फक्त 7,799 रुपये ठेवण्यात आली आहे. Lava Z2 Max स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व अमेझॉन इंडिया सोबतच देशातील रिटेल स्टोर्स व नजीकच्या मोबाईल शॉप्सवर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लावा झेड2 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here