Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर

ZTE ने चीनमध्ये ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ZTE चा हा स्मार्टफोनमध्ये अफोर्डेबल किंमतीत 5G कनेक्टिविटीसह सादर केला गेला आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन हाई रिफ्रेश रेट स्क्रीन, जास्त स्टोरोज, 16 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला गेला आहे. ZTE चा हा 5G स्मार्टफोन मीडियाटेक लेटेस्ट Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे. याआधी या चिपसेटसह Realme 8 5G स्मार्टफोन लॉन्च केला गेला होता. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या इंग्लिश नावाबद्दल सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. म्हणजे या स्मार्टफोनच्या ग्लोबल लॉन्चबद्दल कंपनीने कोणतीही माहिती शेयर केली नाही. (ZTE Yuanhang 10 launched check specification price)

ZTE Yuanhang 10 स्पेसिफिकेशन्स

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा HD+ रिजोल्यूशन असलेला IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz सह टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनची जाडी 8.2mm आहे.

हे देखील वाचा : भारतीयांना आवडतात चायनीज फोन हे पुन्हा सिद्ध झाले, या कंपनीने मिळवला प्रथम क्रमांक

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 4 GB रॅम वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या स्टोरेजमधील 2GB चा वर्चुअल रॅम म्हणून वापर केला गेला आहे. म्हणजे या फोनमध्ये एकूण 6 GB रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा HDR, पोर्टेड मोड आणि व्हिडीओ ब्लॉगिंग सारखे फीचर ऑफर करतो. तसेच ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक डेप्थ ऑफ फील्ड लेंस देण्यात आली आहे. या फोनमध्ये अँटी शेक व्हिडीओ, स्मार्ट ब्लॉगिंग, AI वॉइस सबटाइटल्स सारखे फोटोग्राफी फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन Android OS वर आधारित MyOS 11 वर चालतो. ZTE च्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या डावीकडे पावर बटण देण्यात आला आहे, ज्यात कंपनीने फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

ZTE Yuanhang 10 किंमत आणि उपलब्धता

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन सध्या चीनमध्ये 6GB रॅम 128GB स्टोरेजसह 1,298 युआन (जवळपास 14,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन रॉक रिग्ड ग्रे, ब्लू वेव आणि आइरिश ग्रीन कलरमध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here