हि चायनीज कंपनी घेऊन येत आहे 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन, टाकेल का Samsung ला मागे?

200MP Camera

स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्या एकमेकींना चांगलीच टक्कर देत आहेत. यामुळे कंपन्या आगामी स्मार्टफोन्स नव-नवीन टेक्नोलॉजी, फीचरसह सादर करत आहेत. नवीन रिपोर्ट्सनुसार शाओमी 200 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. चायनीज स्मार्टफोन मेकर शाओमीने अलीकडेच भारतात Mi 11X Pro स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 108-मेगापिक्सलचा Samsung HM2 प्रायमरी सेंसर आहे. बातम्यांनुसार आता कंपनी 200-मेगापिक्सल असलेला कॅमेरा सेंसर लॉन्च करून स्मार्टफोन मार्केटमध्ये धमाका करण्याची प्लानिंग करत आहे. तसेच काही टिपस्टरनुसार, Samsung पण कथितरित्या स्मार्टफोन्ससाठी 200 मेगापिक्सल ISOCELL कॅमेरा सेंसरवर काम करत आहे. (Xiaomi working on 200MP camera smartphone check details)

Digital Chat Station ने लेटेस्ट लीकमध्ये कंफर्म केले आहे कि स्मार्टफोन्स कंपन्या लवकरच 200 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरसह फोन लॉन्च करतील. या पोस्टमध्ये हे सांगण्यात आले नाही कि 200 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन शाओमी लॉन्च करेल. शाओमीच्या 200 मेगापिक्सल कॅमेराअसलेल्या स्मार्टफोनबद्दल दावा ITHome ने केला आहे. याआधी पॉपुलर टिप्सटर Ice Universe दावा केला आहे कि सॅमसंगने 200 मेगापिक्सल असलेला ISOCELL सेंसर डेवलप केला आहे. या सेंसरमध्ये 0.64-micron पिक्सल आहेत.

हे देखील वाचा : Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर

सॅमसंग बनवत 200MP चा कॅमेरा

सॅमसंगच्या 200 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरबद्दल कोणत्याही रिपोर्टमध्ये दावा करण्याची हि काही पहिली वेळ नाही. Ice Universe च्या आधी टिपस्टर WHYLAB पण सॅमसंगच्या अपकमिंग 200 मेगापिक्सल कॅमेरा सेंसरचा दावा केला आहे. WHYLAB नुसार Samsung कथित 200-मेगापिक्सल कॅमेरा सेंसरचा आकार 1/ 1.37 इंच आणि यात 1.28 micron पिक्सल देण्यात आले आहेत. दावा केला जात आहे कि यात 4-इन-1 सह 16-इन-1 पिक्सल बाइनिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी नॉइस कमी करून इमेज सुधारते. बातम्यांनुसार हा सेंसर 16K व्हिडीओ रेकॉर्डला सपोर्ट करतो.

WHYLAB नुसार सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर सर्वप्रथम ZTE Axon 30 Pro 5G स्मार्टफोनमध्ये दिला जाऊ शकतो. पण हा स्मार्टफोन सॅमसंगच्या 64-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. LetsGoDigital च्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 200-मेगापिक्सल कॅमेरा सेंसरसह सादर केला जाऊ शकतो. लेट्स गो डिजिटलने Technizo सह मिळून या स्मार्टफोनचा 3D प्रोडक्ट रेंडर पण रिलीज केले आहेत. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा Olympus कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण या स्मार्टफोनबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here