Redmi Note 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Feb 2020 13:25:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/#respond Thu, 13 Feb 2020 13:25:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6588 कंपनी Redmi Note 8 च्या 1 फोन सोबत 5 असे जुने फोन्स घेण्याचा दबाव टाकत आहेत ज्यांना आता मागणी नाही.

The post मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशनमुळे शाओमी फोनची मागणी नेहमीच जास्त होती आहे पण कधी कधी हीच खासियत कंपनी वर भारी पडते. आणि अशीच बातमी आहे आमच्याकडे. गेल्या एक महिन्यापासून शाओमीचे रिटेल पार्टनर्स त्रस्त आहेत कारण त्यांना Redmi Note 8 4जीबी रॅम मॉडेलचा स्टॉक देण्यात आलेला नाही. याबाबत आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आम्ही अजून तपास केला आणि विचित्रच गोष्ट ऐकायला आली जी कदाचित रिटेलस बिजनेससाठी चांगली म्हणता येणार नाही. अनेक रिटेलर्सने तक्रार केली आहे कि एक तर रेडमी नोट 8 चा स्टॉक दिला जात नाही आणि जेव्हा दिला जातो तेव्हा त्या सोबत कंपनीच्य अटी ठेवत आहे. नवीन फोन सोबत जुने फोन्स विकण्यास भाग पाडण्यात येत आहे.

काय झाले आहे

काल कंपनीने Xiaomi Redmi Note 8 ची किंमत वाढवली होती. हि माहिती आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही रिटेलर्सशी संपर्क साधला आणि तिथून संपूर्ण बातमी मिळाली. सर्वात आधी तर दिल्ली करोलबाग मधील रिटेलर्सने आम्हाला सांगितले कि ‘हि सूचना तर आम्हाला मिळाली कि कंपनीने शाओमी रेडमी नोट 8 ची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. परंतु या बातमीचे काय करायचे जर आमच्याकडे स्टॉकच नसेल तर. गेल्या एक महिन्यापासून कंपनीने याचा स्टॉकच दिला नाही.”

आम्हाला हि बातमी मिळताच आम्ही दुसऱ्या ठिकाणाहून पण माहिती घेतली आणि तिथून पण काही नवीन गोष्टी समजल्या. याबाबत फरीदाबादच्या एका रिटेलरने आम्हाला माहिती दिली आहे कि ”हे सत्य आहे कि स्टॉक गेल्या एका महिन्यापेक्षा पण जास्त काळापासून दिला जात नाही. पण एकदा दिला जात होता तेव्हा 5 Redmi Note 8 सोबत 20 जुने फोन घेण्यासाठी भाग पाडले जात होते. तेव्हा आम्ही नकार दिला. कारण 20 जुने डिवाइस ते आहेत ज्यांना मागणीच नाही.”

याबाबत राजस्थानच्या रिटलेर्सने आम्हाला सांगितले कि ”कंपनी Redmi Note 8 च्या 1 फोन सोबत 5 असे जुने फोन्स घेण्याचा दबाव टाकत आहेत ज्यांना आता मागणी नाही. जर Xiaomi चे जुने फोन आम्ही घेतले तर आमचे पैसे अडकतील. कारण फोन विकले जाणार नाहीत आणि कंपनी पण जुना स्टॉक परत घेणार नाही. त्यामुळे फोन न घेण्यात आणि पैसे न अडकवण्यात आमचे भले आहे ”

कंपनी काय म्हणते

जेव्हा आम्हाला प्रकरण समजले तेव्हा म्ही कंपनीशी पण याबाबत संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला लिखित उत्तर दिले आहे. कंपनी म्हणते कि ”Redmi Note 8 4GB आमच्या लोकप्रिय डिवाईसेस पैकी एक आहे, आणि ऑफलाईन मागणी पाहता आम्ही आमच्या पद्धतीने हि मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. पण याआधी आम्ही सांगितले आहे रिटेल स्टोर्ससाठी नवीन फोन विकण्यासोबत जुनी डिवाइस इन्वेंट्री संपवणे महत्वाचे आहे. अशी कोणतीही यात आम्ही नवीन फोन वर ठेवली नाही. रिटेलर्ससाठी आमच्याकडून कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही ज्यामुळे रिटेलर्स जुन्या इन्वेंटरी मध्ये अडकतील.”

रिटेलर्स कंपनी बद्दल काय म्हणतात

कंपनीशी बोलल्यानंतर आम्ही पुन्हा रिटलेर्सशी बोलणी केली आणि त्यांना माहिती दिली कंपनीने काय म्हटले आणि सर्व रिटलेर्सने हि बाब फेटाळून लावली. रिटेलर्स म्हणतात कि आमच्या स्टोर वर जुना स्टॉक काढण्यासाठी कंपनी का सांगेल. आमच्या स्टॉकमुळे त्यांना काय फरक पडतो. कारण शाओमी मध्ये नो रिटर्न पॉलिसी आहे. त्यामुळे आम्ही फोन विकले किंवा स्टोर वर ठेवले तरी त्यांना काही फरक पडत नाही. याबाबत लखनऊचे एक रिटेलर्स म्हणतात कि ”कंपनी इन्वेंटरी वाढवू नका असे सांगत आहे पण त्यांची जुनी इन्वेंटरी आम्हा रिटेलर्स वर टाकत आहे. यामुळे आम्हाला मोठे नुकसान होते.”

सुरवात जरी Xiaomi Redmi Note मुळे झाली असली तर हा वाद खूप आधीचा आहे जो वेळावेळी रिटेलर्सने उचलून धरला आहे पण आता ऑनलाइन रिटेल स्टोरच्या वाढत्या प्रभावामुळे रिटेलर्स मध्ये याचा राग पण आहे. काही दिवसांपूर्वी ऑफलाइन रिटेलर्सने सॅमसंग विरोधात निदर्शन केले आहे. त्यामुळे जर Xiaomi आताच सांभाळू शकली नाही तर पुढे जाऊन कंपनीला हे महाग पडू शकते कारण कंपनीचा आता मोठा यूजर बेस ऑफलाइन मध्ये पण बनला आहे.

The post मिळत नाही Redmi Note 8, रिटेलर्सचा आरोप कंपनी नोट 8 सोबत जुने फोन विकण्याचा टाकत आहे दबाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-price-hike-retailers-being-forced-to-sale-old-mi-phones-by-company/feed/ 0
कोरोना वायरसचा परिणाम, Xiaomi Redmi Note 8 झाला महाग https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-4gb-ram-variant-price-500-hike/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-4gb-ram-variant-price-500-hike/#respond Wed, 12 Feb 2020 12:58:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6577 Redmi Note 8 च्या 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे.

The post कोरोना वायरसचा परिणाम, Xiaomi Redmi Note 8 झाला महाग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एकीकडे दुसऱ्या कंपन्या गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या फोन्सच्या किंमती कमी करत आहेत. तर दुसरीकडे शाओमी आपल्या फोनची किंमत कमी करण्याऐवजी वाढवत आहे. कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Redmi Note 8 च्या 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. 91मोबाईल्सला याची माहिती ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळाली आहे.

फोनची किंमत वाढल्यामुळे रेडमी नोट 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑफलाइन 10,999 रुपये व ऑनलाइन 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसचा 4GB रॅम वेरिएंट कंपनीने गेल्यावर्षी 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

विशेष म्हणजे शाओमीच्या ऑफिशियल ऑनलाइन पार्टनर अमेझॉन इंडिया वर रेडमी नोट 8 आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे. अमेझॉन इंडिया वर Redmi Note 8 चा 6GB आणि 128GB वेरिएंट विकला जात आहे. तर मी.कॉम वर रेडमी नोट 8 चा 4GB रॅम वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकला जात आहे.

हँडसेटच्या 6GB + 128GB वेरिएंट अजूनही लॉन्च प्राइस 12,999 रुपये ऑनलाइन व 13,499 रुपयांमध्ये ऑफलाइन विकला जात आहे. रेडमी नोट 8 च्या बेस वेरिएंट किंमत वगळता कोणत्याही वेरिएंटची किंमत बदलेली नाही.

Redmi Note 8 चे स्पेसिफिकेशन्स

या फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Redmi Note 8 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Redmi Note 8 मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी नोट 8 वीडियो

The post कोरोना वायरसचा परिणाम, Xiaomi Redmi Note 8 झाला महाग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-4gb-ram-variant-price-500-hike/feed/ 0
Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/#respond Fri, 10 Jan 2020 13:36:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6256 स्पष्ट करू इच्छितो कि Realme 5i साधारण लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

The post Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने काल भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Realme 5i लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने लो बजेट मध्ये एंट्री घेतली आहे जो 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन येत्या 15 जानेवारी पासून देशात सेलसाठी उपलब्ध होणार आहे. Realme 5i ची टक्कर या बजेट सेग्मेंट मधील Xiaomi च्या Redmi Note 8 स्मार्टफोनशी होणार आहे. Redmi Note 8 ने भारतात आपल्या सेलचे अनेक रेकॉर्ड आधीच बनवले आहेत आणि या फोनची लोकप्रियता पण जास्त आहे. स्मार्टफोन मार्केट मध्ये Realme ला Xiaomi चा मोठा प्रतिस्पर्धी म्हटले जाते त्यामुळे Realme 5i समोर मोठे आव्हान असेल. या सेग्मेंट मध्ये Xiaomi चा Redmi 8 स्मार्टफोन पण Realme 5i च्या अडचणी वाढवू शकतो पण या फोनची किंमत Realme 5i पेक्षा 1,000 रुपये कमी आहे. त्यामुळे आम्ही स्मार्टफोन यूजर्ससाठी बेस्ट च्वाइस निवडत Realme 5i ची तुलना Redmi Note 8 शी केली आहे. त्यामुळे 9,999 रुपयांचा Redmi Note 8 निवडावा कि लेटेस्ट डिवाईस Realme 5i विकत घ्यावा, हा एक मोठा प्रश्न आहे. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सची छोटीसी तुलना केली आहे, ज्यातून समजेल Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

डिजाईन

Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाले आहेत. फ्रंट पॅनल वर दोन्ही फोनचा लुक जवळपास एकसारखा आहे पण Realme 5i चा चिन पार्ट Redmi Note 8 पेक्षा थोडा जास्त मोठा आहे. तसेच Redmi Note 8 च्या चिन पार्ट वर Redmi ची ब्रँडिग आहे. Realme 5i आणि Redmi Note 8 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर उजवीकडे देण्यात आला आहे. दोन्ही फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट सह स्पीकर देण्यात आला आहे. दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इथे स्पष्ट करू इच्छितो कि Realme 5i साधारण लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

डिस्प्ले

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर बनलेले आहेत. Realme 5i 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्टेड आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी नोट 8 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. रेडमी नोट 8 ची पिक्सल डेन्सिटी 403ppi आहे तर रियलमी 5आई 269ppi च्या पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme 5i आणि Xiaomi Redmi Note 8 दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. रेडमी नोट 8 मध्ये मीयूआई 10 देण्यात आला आहे तर रियलमी 5आई मध्ये कलरओएस 6.0.1 आहे. Xiaomi Redmi Note 8 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे तर Realme 5i 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.

चिपसेट बद्दल बोलायचे तर Xiaomi Redmi Note 8 आणि Realme 5i दोन्ही फोन 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतात. ग्राफिक्ससाठी पण Realme 5i आणि Redmi Note 8 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

रॅम व स्टोरेज

Realme 5i भारतात एकाच वेरिएंट मध्ये आला आहे. हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Redmi Note 8 Xiaomi ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी

Realme 5i क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX386 सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी Realme 5i मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Note 8 बद्दल बोलायचे तर फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. Redmi Note 8 मध्ये सेल्फीसाठी एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सिक्योरिटी व बॅटरी

सिक्योरिटीसाठी दोन्ही फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. Realme 5i मध्ये पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर Xiaomi Redmi Note 8 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे शाओमी आपल्या डिवाईसच्या रिटेल बॉक्स मध्ये 18वॉट चा चार्जर देत आहे तर रियलमी 5आई मध्ये 10वॉटचा चार्जर मिळेल.

किंमत

Realme 5i 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. Xiaomi Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम मेमरी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीच्या वेबसाइट वर 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. रेडमी नोट 8 स्पेस ब्लू, नेप्च्यून ब्लू, मूनलाईट व्हाईट आणि कॉसमिक पर्पल कलर मध्ये विकत घेता येईल तर रियलमी 5आई ने ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये एंट्री घेतील आहे.

जर तुम्ही 1,000 रुपये जास्त देऊ शकत असाल तर Xiaomi Redmi Note 8 काल लॉन्च झालेल्या Realme 5i वर भारी पडतो. रियलमीला टक्कर देण्यासाठी शाओमी आपल्या या फोन वर अतिरिक्त ऑफर किंवा कॅशबॅक पण देऊ शकते.

The post Realme 5i कि Xiaomi Redmi Note 8, तुलना वाचून सांगा कोणता फोन आहे पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-realme-5i-comparison-review-specification-price-feature-sale-india/feed/ 0
Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/#respond Thu, 26 Dec 2019 13:07:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6125 हे तिन्ही स्मार्टफोन भारतात ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

The post Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी Xiaomi कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले फोन आणते आणि याच कारणामुळे Xiaomi स्मार्टफोन्स दरवेळी विक्रीचे नवीन रेकॉर्ड करतात. फोनची मागणी जास्त असल्यामुले Xiaomi आपले स्मार्टफोन्स साधारणतः फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकते. पण आता नवीन वर्षाच्या आधी आपल्या यूजर्सना शानदार भेट देत Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनीचे तीन हिट स्मार्टफोन Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 आता कधी विकत घेता येतील. हे तिन्ही स्मार्टफोन भारतात ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

Xiaomi ने घोषणा केली आहे कि आज पासूनच Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर ओपन सेल अंतर्गत विकत घेता येतील. Redmi Note 8 Pro आणि Redmi Note 8 शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वर चोवीस तासात सेल साठी उपलब्ध होतील. तसेच Redmi 8 मी डॉट कॉम व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून पण कधीही विकत घेता येईल.

अशी असेल किंमत

प्राइस पाहता 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Redmi Note 8 Pro भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 8 इंडियन मार्केट मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विकला जातो तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने खास ऑफलाईन मार्केट साठी लॉन्च केला होता. ओपन सेल अंतर्गत Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi 8 बद्दल बोलायचे तर या फोनचा पण एक वेरिएंट फक्त ऑनलाईन मार्केट साठी लॉन्च केला गेला होता तर दुसरा वेरिएंट ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर आला होता. Redmi 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोेरेज वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व मी डॉट कॉम वरून 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर रेडमी 8 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

Xiaomi Redmi 9

जाताजाता सांगू इच्छितो कि शाओमी कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi 9 वर पण काम करत आहे आणि हा डिवाईस साल 2020 च्या सुरवातीला बाजारात येईल. Xiaomi Redmi 9 मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट मिळेल. तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार रेडमी 9 चा एक वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

The post Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/feed/ 0
Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-note-8-pro-sales-cross-1-million-units-in-a-month/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-note-8-pro-sales-cross-1-million-units-in-a-month/#respond Tue, 26 Nov 2019 12:35:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5870 फेस्टिव सीजन मध्ये फक्त एका महिन्यात भारतात 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी Xiaomi डिवाइस विकून नवीन रेकॉर्ड बनवला होता.

The post Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने माहिती दिली आहे कि कंपनीने फक्त एका महिन्यात Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro चे 1 मिलियन यूनिट विकले आहेत. क्वाड कॅमेरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येणाऱ्या या स्मार्टफोनच्या लोकप्रियतेचा अंदाज विकल्या गेलेल्या हँडसेटच्या यूनिट नंबर्स वरून लावता येईल.

विशेष म्हणजे Xiaomi चे हे आकडे फक्त एका महिन्याचे आहेत. शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने सांगितले होते कि त्यांनी फेस्टिव सीजन मध्ये फक्त एका महिन्यात भारतात 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी Xiaomi डिवाइस विकून नवीन रेकॉर्ड बनवला होता.

Redmi Note 8 चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi ने Redmi Note 8 Pro सोबत Redmi Note 8 भारतात लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Redmi Note 8 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Redmi Note 8 मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi Note 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.53-इंचाचा फुल-एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. सोबत फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. यात मीडियाटेकच्या नवीन गेमिंग प्रोसेसर हीलियो जी90टी दिला आहे. फोटोग्राफी साठी रेडमी नोट 8 प्रो मध्ये चार रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. हा कंपनीचा पहिला 64-मेगापिक्सल कॅमेरा फोन आहे. या सेंसर सह कंपनीने 8-मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेंसर आणि दोन 2-मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. फोन मध्ये फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 8 Pro ची बॅटरी 4,500 एमएएच ची आहे. हा 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. रेडमी नोट 8 प्रो पण एंड्रॉयड 9 पाई वर आधारित मीयूआई 10 वर चालतो.

शाओमी रेडमी नोट 8 प्रो वीडियो

The post Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-note-8-pro-sales-cross-1-million-units-in-a-month/feed/ 0
9999 रुपयांमध्ये कोणता फोन आहे बेस्ट, Realme 5s कि Redmi Note 8? बघा थोडक्यात तुलना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-vs-realme-5s-smartphone-comparison-price-9999-specs-features-battery-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-vs-realme-5s-smartphone-comparison-price-9999-specs-features-battery-camera/#respond Thu, 21 Nov 2019 14:36:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5846 आम्ही दोन्ही स्मार्टफोनची छोटीशी तुलना केली आहे, ज्यात कळेल कि Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

The post 9999 रुपयांमध्ये कोणता फोन आहे बेस्ट, Realme 5s कि Redmi Note 8? बघा थोडक्यात तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने कालच भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन आणले आहेत. कंपनीने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये Realme X2 Pro स्मार्टफोन सादर केला गेला आहे तर सोबतच लो बजेट सेग्मेंट मध्ये Realme 5s लॉन्च केला आहे. Realme 5s चे दोन वेरिएंट भारतात लॉन्च झाले आहेत ज्यात 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. Realme 5s ची टक्कर या बजेट सेग्मेंट मध्ये Xiaomi च्या Redmi Note 8 स्मार्टफोनशी होईल. Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम वेरिएंट पण 9,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहे. सध्या भारतात Realme आणि Xiaomi एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे 9,999 रुपयांमध्ये Realme 5s निवडावा कि Redmi Note 8, हा एक मोठा प्रश्न आहे. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोनची छोटीशी तुलना केली आहे, ज्यात कळेल कि Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

लुक व डिजाईन

एखाद्या फोनची पहिली झलक तो आवडला कि नाही हे ठरवण्यास महत्वपूर्ण असते. लुक व डिजाईन पाहता Xiaomi Redmi Note 8 कंपनीने ग्लॉस बॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. तर Realme 5s कंपनीने डायमंड कट डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा फ्रंट पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे तर या फोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा आहे. Realme 5s सामान्य लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

डिस्प्ले

Redmi Note 8 कंपनीने 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे तसेच हा स्मार्टफोन 90 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Realme 5s 89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे तसेच हा डिवाईस 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi Note 8 ची पिक्सल डेनसिटी 403 PPI आहे तर Realme 5s 269 PPI म्हणजे पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 चा कॉन्ट्रास्ट रेशियो 1500:1 आहे तर Realme 5s मध्ये 1200:1 चा कॉन्ट्रास्ट रेशियो मिळतो.

कॅमेरा

हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. Realme 5s मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा जीएम1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फी साठी Realme 5s मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Note 8 पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. Redmi Note 8 मध्ये सेल्फी साठी एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर

प्रोसेसर आणि चिपसेटच्या बाबतीत पण Xiaomi आणि Realme चे दोन्ही स्मार्टफोन एकसारखे आहेत. Realme 5s एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे तर हा फोन 2गीगाहर्टज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर केला गेला आहे तसेच हा स्मार्टफोन पण आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

रॅम व स्टोरेज

सिर्फ 9,999 रुपयांच्या वेरिएंट बद्दल बोलायचे तर या किंमतीत Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट सेल साठी उपलब्ध आहे. तर Realme 5s चा पण 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो. विशेष म्हणजे Redmi Note 8 ची एक्सपांडेबल स्टोरेज 512 जीबी आहे तर Realme 5s मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंतच वाढवता येते.

बॅटरी

Xiaomi Redmi Note 8 कंपनीने 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे तसेच हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तर Realme 5s स्मार्टफोन 5000एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे तसेच हा डिवाईस मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 मध्ये तुम्हाला यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल तर Realme 5s माइक्रो यूएसबी सह लॉन्च केला गेला आहे.

The post 9999 रुपयांमध्ये कोणता फोन आहे बेस्ट, Realme 5s कि Redmi Note 8? बघा थोडक्यात तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-vs-realme-5s-smartphone-comparison-price-9999-specs-features-battery-camera/feed/ 0
Exclusive: Redmi Note 8 चा 3GB + 32GB वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 9,799 रुपये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-3gb-32gb-variant-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-3gb-32gb-variant-launched-in-india/#respond Tue, 19 Nov 2019 12:23:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5811 म आणि स्टोरेज व्यतिरिक्त फोनचे स्पेसिफिकेशन्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

The post Exclusive: Redmi Note 8 चा 3GB + 32GB वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 9,799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 8 यावर्षी ऑक्टोबर मध्ये Redmi Note 8 Pro सह लॉन्च केला गेला होता. लॉन्चिंगच्या वेळी कंपनीने हा डिवाइस 4GB + 64GB आणि 6GB + 128GB वेरिएंट मध्ये आणला होता जो अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम वर फ्लॅश सेलच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता. आता 91mobiles ला रिटेल सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि शाओमी ने Redmi Note 8 नवीन 3GB + 32GB वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

हा वेरिएंट कंपनीने एक्सक्लूसिव ऑफलाइन मार्केट साठी सादर केला आहे जो ऑनलाइन विकला जाणार नाही. येत्या काळात डिवाइस ऑनलाइन पण सेल केला जाऊ शकतो. शाओमीने नवीन Redmi Note 8 वेरिएंट 9,799 रुपयांमध्ये सादर केला आहे. रॅम आणि स्टोरेज व्यतिरिक्त फोनचे स्पेसिफिकेशन्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi ने Redmi Note 8 Pro सोबत Redmi Note 8 भारतात लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Redmi Note 8 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Redmi Note 8 मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी नोट 8 वीडियो

The post Exclusive: Redmi Note 8 चा 3GB + 32GB वेरिएंट झाला लॉन्च, किंमत 9,799 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-3gb-32gb-variant-launched-in-india/feed/ 0
Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/#respond Wed, 16 Oct 2019 13:40:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5541 पुढे आम्ही Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची तुलना केली आहे जी भारतीय यूजर्सना योग्य फोन निवडण्यास मदत करेल.

The post Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण टेक बाजारात हीच चर्चा होती आणि प्रश्न होता कि, कोणता ब्रँड असेल जो भारतात सर्वात आधी 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलला स्मार्टफोन घेऊन येईल. 64 MP कॅमेऱ्याच्या शर्यतीत Realme ने बाजी मारली आणि सप्टेंबरच्या सुरवातीला Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. आज जवळपास एका महिन्यानंतर Xiaomi ने पण भारतीय बाजारात आपला 64 MP क्वॉड रियर कॅमेरा असलेला फोन Redmi Note 8 Pro लॉन्च केला आहे. जे लोक दिवाळीच्या निमित्ताने नवीन फोन विकत घेऊ इच्छित आहेत आणि गोंधळात आहेत कि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला कोणता फोन घ्यावा, तर पुढे आम्ही Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची तुलना केली आहे जी भारतीय यूजर्सना योग्य फोन निवडण्यास मदत करेल.

लुक व डिजाईन

Realme XT आणि Redmi Note 8 Pro दोन्ही फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन सह येतात. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तसेच वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme XT चा रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे तर Redmi Note 8 Pro चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. Redmi Note 8 Pro च्या कॅमेरा सेटअप सह फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. दोन्ही फोन ग्लॉस बॅक सह प्रीमियम लुक देतात.

डिस्प्ले

सुरवात Realme XT पासून करू, हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.9 टक्के आहे. Realme XT कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे. फोनच्या सुरक्षेसाठी Realme XT च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे.

Redmi Note 8 Pro पण 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे जो 91.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Xiaomi ने आपल्या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही. तसेच फोनच्या सुरक्षेसाठी Redmi Note 8 Pro मध्ये पण फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत.

कॅमेरा सेग्मेंट

Redmi Note 8 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 ISOCELL सेंसर देण्यात आला आहे जो क्वॉड रियर कॅमेरा सेटअपचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर रेडमी नोट 8 प्रो मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे जो 120डिग्री वाइड अँगल वर काम करतो. त्याचबरोबर Redmi Note 8 Pro मध्ये 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Redmi Note 8 Pro मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme XT च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये पण 64 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL Bright GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरला सपोर्ट करतो. फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Realme XT एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग साठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी फोन गरम होऊ देत नाही.

Redmi Note 8 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा नवीन चिपसेट हेलीयो जी90टी देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूथ करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तसेच गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro गेम टर्बों 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो.

बॅटरी पावर

Realme XT मध्ये पावर बॅकअप साठी VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Redmi Note 8 Pro कंपनी द्वारा 18वॉट फास्ट चार्जिंग असेलल्या 4500एमएएच च्या दमदार बॅटरी सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे जी यूएसबी टाईप-सी सह चालते.

वेरिएंट व किंमत

Redmi Note 8 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. Redmi Note 8 Pro गामा ग्रीन, हॉलो वाईट आणि शॅडो ब्लॅक कलर मध्ये 21 ऑक्टोबर पासून अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल.

Realme XT पण भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये तथा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन पर्ल ब्लू आणि पर्ल वाईट कलर मध्ये फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.

The post Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-8-pro-vs-realme-xt-64-mp-quad-rear-camera-features-specifications-price-review-difference-india/feed/ 0
64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/#respond Thu, 29 Aug 2019 12:22:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5161 कंपनीने Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

The post 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आज आपल्या सब ब्रँड Redmi मध्ये Redmi Note 7 सीरीजची अपग्रेडेड सीरीज Redmi Note 8 सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. Redmi Note 8 व Note 8 Pro च्या लॉन्चच्या आधी फोन्स संबंधित अनेक स्पेसिफिकेशन्स व लीक बातम्या समोर आल्या होत्या, त्यांच्यावर पूर्णविराम देत कंपनीने हे अधिकृतपणे लॉन्च केले आहेत.

डिजाइन

Redmi Note 8 ची डिजाइन पाहता हि अगदी Redmi Note 7 प्रो च्या डिजाइनच्या आधारवर सादर केली गेली आहे. फोन मध्ये वर्टिकल रियर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच फोन मध्ये फ्रंटला डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या नॉच मध्ये फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 8 Pro ची डिजाइन पाहता यात पण Redmi Note 8 प्रमाणे रियर क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. फक्त कॅमेरा पोजिशन वेगळी आहे. Redmi Note 8 Pro मध्ये मधोमध तीन कॅमेऱ्यांसह फिंगरप्रिंट सेंसर आहे. तर उजवीकडे फ्लॅश सह एक कॅमेरा सेंसर आहे. मागे खालच्या बाजूला वर्टिकली Redmi ची ब्रँडिंग आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. Redmi Note 8 Pro मध्ये खाली 3.5एमएम हेडफोन जॅक व स्पीकर ग्रिल आहे.

Redmi Note 8 चा कॅमेरा सेटअप

कॅमेरा सेगमेंट बद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 8 मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. इतर 3 कॅमेरे पाहता फोन मध्ये दुसरा रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे जी वाइडस एंगल लेंस आहे. तिसरा 2-मेगापिक्सलचा आहे जी मॅक्रो लेंस आहे. तर चौथा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 8 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 8 मध्ये डॉट नॉच वाला 6.3-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340X1080 पिक्सल रिजोल्यूशन सह येतो. यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे Redmi Note 8 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई बेस्ड MIUI 10 वर चालतो.

तसेच फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB + 64GB स्टोरेज वेरिएंट आणि 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. पावर बॅकअप साठी Note 8 मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Note 8 Pro मध्ये 6.53-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो डॉट नॉच सह येतो. तसेच Redmi Note 8 Pro मीडियाटेक हीलियो G90T चिपसेट आहे. हा पहिला फोन आहे ज्यात हा नवीन चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा रियर कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे जी अल्ट्रावाइड लेंस आहे. तिसरा 2-मेगापिक्सलचा आहे जी मॅक्रो लेंस आहे. तर चौथा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा आहे.

Redmi Note 8 Pro 6GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

64MP चा कॅमेरा आहे खास

Redmi Note 8 मध्ये कंपनीने 64-मेगापिक्सल वाला Samsung चा GW1 सेंसर दिला आहे. GW1 सेंसर ISOCELL टेक्नॉलजीचा वापर करून पिक्सल-टू-पिक्सल बॅरियर बनवतो ज्यामुळे पिक्सल्स मधील प्रकाश कमी होऊन कलर रिप्रॉडक्शन चांगले होते. 64-मेगापिक्सलचा हा सेंसर (9248×6936) पिक्सल रेजोल्यूशनचा फोटो आउटपुट देतो. इतकेच नव्हे तर या सेंसर मधून 480-फ्रेम प्रति सेकंद स्पीड वर स्लो-मोशन विडियो पण शूट करता येतो.

किंमत

Redmi Note 8

4जीबी + 64जीबी- 999 Yuan (जवळपास 10,000 रुपये)

6जीबी + 64जीबी- 1199 Yuan (जवळपास 12,000 रुपये)

8जीबी + 128जीबी- 1399 Yuan (जवळपास 14,000 रुपये)

Redmi Note 8 Pro

6जीबी + 64जीबी- 1399 Yuan (जवळपास 14,000 रुपये)

6जीबी + 128जीबी- 1599 Yuan (जवळपास 16,000 रुपये)

8जीबी + 128जीबी- 1799 Yuan (जवळपास 18,000 रुपये)

The post 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 8 Pro ने केला प्रवेश, चार कॅमेरे असलेला Note 8 पण झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-launch-redmi-note-8-smartphone-in-china-with-four-camera/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/#respond Mon, 19 Aug 2019 10:47:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5052 चर्चेला उधाण आले असताना Redmi 8a ची खरी ईमेज पण समोर आली आहे ज्यावरून फोन संबंधित अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर Xiaomi फोन लिस्ट केला गेला होता जो मीडिया रिपोर्ट्स मध्ये Redmi Note 8 सीरीजचा मॉडेल असल्याचे सांगण्यात आले होते. जेव्हा पासून Redmi General Manager Lu Weibing ने या सीरीजच्या विस्ताराची घोषणा केली आहे तेव्हापासूनच Redmi Note 8 सीरीजची वाट बघितली जात आहे. या पावरफुल सीरीज व्यतिरिक्त कंपनी Redmi सीरीज वर पण काम करत आहे ज्या अंतर्गत सर्वात आधी Redmi 8a स्मार्टफोन लॉन्च केला जाणार असल्याचे समोर येत आहे. चर्चेला उधाण आले असताना Redmi 8a ची खरी ईमेज पण समोर आली आहे ज्यावरून फोन संबंधित अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.

Xiaomi Redmi 8a चे रियल फोटोज प्रसिद्ध टिपस्टर स्लॅशलीक द्वारा शेयर केले गेले आहे. या फोटोज मुळे एकीकडे फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे तर दुसरीकडे Redmi 8a चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लीक झालेल्या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या फोटोज मध्ये फोनचा सेटिंग मेनू पण ओपन केला गेला आहे ज्यावरून ईमेज मधील फोन मॉडेलचे रियल स्पेसिफिकेशन्स पण स्पष्ट झाले आहेत.

अशी असेल डिजाईन

फोटो मध्ये दाखवण्यात आलेल्या फोनचे नाव Xiaomi Redmi 8a असल्याचे बोलले जात आहे. सर्वात आधी फोनच्या बॅक पॅनल विषयी बोलायचे झाले तर हा फोन Redmi सीरीज मध्ये आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन पेक्षा वेगळा आहे. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर एक लांब पट्टी बनवण्यात आली आहे आणि यात सर्वात वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. कॅमेरा सेंसर्सच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि पट्टी मध्ये सर्वात खाली Redmi ची ब्रॅण्डिंग आहे. या पट्टीच्या वर फ्लॅश लाईट आहे.

Redmi 8a च्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला ‘Design by Xiaomi’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर तिथे वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे जी ‘यू’ शेप आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे, ज्यावर Redmi लिहिण्यात आले आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे फोटो मध्ये दाखवण्यात आलेला फोन रेड कलरचा आहे.

स्पेसिफिकेशन्स

Redmi 8a चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोटो मध्ये झालेल्या खुलासे आणि आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार हा फोन 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर सादर केला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड असेल. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर केला जाऊ शकतो ज्यात 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट मिळू शकतो.

समोर आलेल्या फोटो मध्ये Redmi 8a 4जीबी रॅम मेमरी सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच लीक नुसार कंपनी Redmi 8a 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी आणि 2जीबी रॅम + 16जीबी इंटरनल स्टोरेज वर पण लॉन्च करू शकते. लीक नुसार तिन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल.

Xiaomi Redmi 8a च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर लीक्स नुसार फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल जो 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर सह काम करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीक नुसार Redmi 8a डुअल सिम फोन असेल जो 4जी ला सपोर्ट करेल. तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत Redmi 8a मध्ये पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

शाओमी रेडमी 7ए वीडियो

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह समोर आला Xiaomi Redmi 8a, लॉन्चच्या आधीच लीक झाले संपूर्ण स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-real-images-leaked-specifications-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0