9999 रुपयांमध्ये कोणता फोन आहे बेस्ट, Realme 5s कि Redmi Note 8? बघा थोडक्यात तुलना

Realme ने कालच भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन आणले आहेत. कंपनीने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये Realme X2 Pro स्मार्टफोन सादर केला गेला आहे तर सोबतच लो बजेट सेग्मेंट मध्ये Realme 5s लॉन्च केला आहे. Realme 5s चे दोन वेरिएंट भारतात लॉन्च झाले आहेत ज्यात 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. Realme 5s ची टक्कर या बजेट सेग्मेंट मध्ये Xiaomi च्या Redmi Note 8 स्मार्टफोनशी होईल. Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम वेरिएंट पण 9,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहे. सध्या भारतात Realme आणि Xiaomi एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे 9,999 रुपयांमध्ये Realme 5s निवडावा कि Redmi Note 8, हा एक मोठा प्रश्न आहे. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोनची छोटीशी तुलना केली आहे, ज्यात कळेल कि Redmi बेस्ट आहे कि Realme पुढे आहे.

लुक व डिजाईन

एखाद्या फोनची पहिली झलक तो आवडला कि नाही हे ठरवण्यास महत्वपूर्ण असते. लुक व डिजाईन पाहता Xiaomi Redmi Note 8 कंपनीने ग्लॉस बॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. तर Realme 5s कंपनीने डायमंड कट डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा फ्रंट पॅनल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे तर या फोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा आहे. Realme 5s सामान्य लुक असलेला फोन आहे तर Redmi Note 8 प्रीमियम दिसतो.

डिस्प्ले

Redmi Note 8 कंपनीने 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे तसेच हा स्मार्टफोन 90 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Realme 5s 89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे तसेच हा डिवाईस 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi Note 8 ची पिक्सल डेनसिटी 403 PPI आहे तर Realme 5s 269 PPI म्हणजे पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 चा कॉन्ट्रास्ट रेशियो 1500:1 आहे तर Realme 5s मध्ये 1200:1 चा कॉन्ट्रास्ट रेशियो मिळतो.

कॅमेरा

हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. Realme 5s मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा जीएम1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फी साठी Realme 5s मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Note 8 पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सुपर वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. Redmi Note 8 मध्ये सेल्फी साठी एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर

प्रोसेसर आणि चिपसेटच्या बाबतीत पण Xiaomi आणि Realme चे दोन्ही स्मार्टफोन एकसारखे आहेत. Realme 5s एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे तर हा फोन 2गीगाहर्टज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर केला गेला आहे तसेच हा स्मार्टफोन पण आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी असलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

रॅम व स्टोरेज

सिर्फ 9,999 रुपयांच्या वेरिएंट बद्दल बोलायचे तर या किंमतीत Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट सेल साठी उपलब्ध आहे. तर Realme 5s चा पण 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो. विशेष म्हणजे Redmi Note 8 ची एक्सपांडेबल स्टोरेज 512 जीबी आहे तर Realme 5s मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंतच वाढवता येते.

बॅटरी

Xiaomi Redmi Note 8 कंपनीने 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे तसेच हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तर Realme 5s स्मार्टफोन 5000एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे तसेच हा डिवाईस मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे Redmi Note 8 मध्ये तुम्हाला यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल तर Realme 5s माइक्रो यूएसबी सह लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here