Redmi Pad - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Jun 2023 09:27:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/#respond Thu, 29 Jun 2023 09:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21814 शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया. Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह […]

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Pad 2 ची लवकरच एंट्री होऊ शकते.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • 8000mAh बॅटरीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया.

Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग

  • गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह दिसला आहे.
  • लिस्टिंग नुसार Redmi Pad 2 नं बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राउंड मध्ये 415 आणि मल्टी-कोर राउंड मध्ये 1411 पॉईंट्स मिळवले आहेत.
  • असं देखील समोर आलं आहे की रेडमी पॅड 2 ऑक्टा-कोर चिपसेटसह येईल. जो 2.40GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो.
  • प्रोसेसरचे नाव पाहता लिस्टिंगमध्ये Redmi Pad 2 चिपसेटचं कोडनेम Bengal आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे की ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
  • डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
  • टॅबलेटमध्ये 4GB रॅम सपोर्ट मिळू शकतो.

Redmi Pad 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Redmi च्या नवीन टॅबलेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिजॉल्यूशन असलेला 10.95 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले खूप चांगला एक्सपीरियंस देतो.
  • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला जाईल.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत एफसीसी सर्टिफिकेशनच्या डिटेलनुसार डिवाइस 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतो. ज्यात 4GB रॅम +64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6जीबी रॅम +128GB स्टोरेजचा समावेश असेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता रेडमीचा हा नवीन टॅब 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 8000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फास्ट चार्जिंग बाबत माहिती मिळाली नाही.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता टॅब अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो.

The post Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-2-geekbench-listing/feed/ 0
2K डिस्प्ले आणि 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-launched-at-rs-12999-know-features/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-launched-at-rs-12999-know-features/#respond Tue, 04 Oct 2022 10:22:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13692 टेक निर्माता Xiaomi आपल्या सब ब्रँड रेडमी अंतर्गत नेहमीच शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले किफायतशीर प्रोडक्ट सादर करते. कंपनीनं ही बाब पुन्हा एकदा मिड बजेट सेगमेंटमध्ये Redmi Pad टॅबलेट भारतात लाँच करून अधोरेखित केली आहे. हा टॅबलेट भारतासह जगभरात सादर करण्यात आला आहे. Redmi Pad एंटरटेनमेंट, गेमिंग, ब्राउजिंग आणि ई-लर्निंग उपयुक्त ठरेल. यात जे स्पेक्स देण्यात आले […]

The post 2K डिस्प्ले आणि 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक निर्माता Xiaomi आपल्या सब ब्रँड रेडमी अंतर्गत नेहमीच शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले किफायतशीर प्रोडक्ट सादर करते. कंपनीनं ही बाब पुन्हा एकदा मिड बजेट सेगमेंटमध्ये Redmi Pad टॅबलेट भारतात लाँच करून अधोरेखित केली आहे. हा टॅबलेट भारतासह जगभरात सादर करण्यात आला आहे. Redmi Pad एंटरटेनमेंट, गेमिंग, ब्राउजिंग आणि ई-लर्निंग उपयुक्त ठरेल. यात जे स्पेक्स देण्यात आले आहेत ते टॅबलेट युजर्सना खूप आवडू शकतात. नवीन Redmi Tab मध्ये मीडियाटेक चिपसेट, 8,000mAh बॅटरी, 2K डिस्प्ले आणि शानदार कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला Redmi Pad चे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

Redmi Pad specifications

Redmi Pad मध्ये 10.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. टॅबमध्ये MediaTek Helio G99 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जोडीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. हे देखील वाचा: मनमोहक लूकसह Oppo च्या शानदार स्मार्टफोनची एंट्री; स्वस्तात 50MP Camera आणि 5000mAh Battery

Redmi pad launched at rs 12999 know features

फोटोग्राफीसाठी रेडमी पॅडच्या मागे सिंगल कॅमेरा सेन्सर मिळतो 8MP चा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी या टॅबलेटमध्ये 8,000mAh ची दणकट बॅटरी मिळते जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रेडमीचा नवीन अँड्रॉइड टॅबलेट Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो.

अन्य फीचर्स पाहता यात डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत. स्टोरेज वाढवण्यासाठी डिवाइसमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. तसेच टॅबमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड WiFi 5, Bluetooth 5.3 सारख्या सुविधा मिळतात. हा रेडमी पॅड टॅबलेट फक्त 7.05 मिमी पातळ आणि याचे वजन 465 ग्राम आहे. हे देखील वाचा: चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू!

Redmi pad launched at rs 12999 know features

Redmi Pad price

शाओमीनं Redmi Pad भारतात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. यातील 3GB रॅम व 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे तिन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 12,999 रुपये, 14,999 रुपये आणि 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तसेच Redmi Pad वर 10 टक्के बँक डिस्काउंट देखील मिळेल. Redmi Pad ची विक्री Mi.com, Mi Homes, Flipkart आणि सर्व रिटेल पार्टनर्सच्या माध्यमातून 5 ऑक्टोबरपासून सुरु होईल. कंपनीचा हा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट मूनलाइट सिल्व्हर, ग्रॅफाइट ग्रे आणि मिंट ग्रीन अशा तीन रंगात विकत घेता येईल.

The post 2K डिस्प्ले आणि 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-launched-at-rs-12999-know-features/feed/ 0
सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-4g-specs-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-4g-specs-details/#respond Wed, 28 Sep 2022 06:05:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13513 Redmi Pad 4G: लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइसची मागणी वाढली. त्यामुळे बरीच वर्ष दुर्लक्षित असलेल्या अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटकडे स्मार्टफोन ब्रॅण्ड्स लक्ष देऊ लागले. आता फक्त सॅमसंग नव्हे तर शाओमी, रियलमी, मोटोरोला आणि नोकिया सारख्या ब्रँड्सनी आपले टॅबलेट सादर केले आहेत. तसे 4G Smartphone मार्केटमध्ये नाव कामवाल्यानंतर Xiaomi कंपनी […]

The post सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Pad 4G: लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइसची मागणी वाढली. त्यामुळे बरीच वर्ष दुर्लक्षित असलेल्या अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटकडे स्मार्टफोन ब्रॅण्ड्स लक्ष देऊ लागले. आता फक्त सॅमसंग नव्हे तर शाओमी, रियलमी, मोटोरोला आणि नोकिया सारख्या ब्रँड्सनी आपले टॅबलेट सादर केले आहेत. तसे 4G Smartphone मार्केटमध्ये नाव कामवाल्यानंतर Xiaomi कंपनी आता आपल्या रेडमी ब्रँडसह टॅबलेट बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी रेडमीच्या 5G टॅबलेटची माहिती आली होती परंतु आम्हाला आज Redmi Pad 4G ची माहिती मिळाली आहे.

शाओमी द्वारे लाँच करण्यात येण्याआधीच आता रेडमी पॅड 4जीचे फोटो व स्पेसिफिकेशन एक्सक्लूसिव्हली 91मोबाइल्स हिंदीला मिळाले आहेत ज्यात Redmi Pad 4G Tablet च्या फुल स्पेसिफिकेशन आणि कलर व्हेरिएंटचा खुलासा करण्यात आला आहे. या इमेज आणि माहिती भारतातील प्रमुख टिपस्टर सुधांशूनं शेयर केले आहेत. रेडमीचा हा टॅबलेट MediatTek के Helio G99 चिपसेटवर चालतो जो एक 4G प्रोसेसर आहे. तसेच यात तुम्हाला 10.61 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. फोनची इतर माहिती आम्ही पुढे दिली आहे.

Redmi Pad 4G Specs Details

Redmi Pad 4G चा डिस्प्ले

सर्वप्रथम रेडमी पॅड 4जीची स्क्रीन पाहता, लीकनुसार हा टॅबलेट डिवायस 10.61 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल. टॅबची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा टॅबलेट 1बिलियन+ कलर्स, 400nits ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोसह येईल.

Redmi Pad 4G Specs Details

विशेष म्हणजे रेडमी पॅड 4जी Low Visual Fatigue Certification मिळवणारा जगातील पहिला टॅबलेट असेल. तसेच या टॅबलेट डिवायसमध्ये बिल्ट-इन ब्लू लाइट रीडक्शन सारखे अ‍ॅडव्हान्स फीचर देखील देण्यात येईल. डिस्प्लेच्या चारही बाजूंना नॅरो बेजल्स असतील ज्या फोटोमध्ये देखील दिसत आहेत. हे देखील वाचा: 210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

Redmi Pad 4G चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी टॅब 4जीचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार या टॅबलेट डिवायसमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला जाईल जो 4G LTE नेटवर्कवर चालेल. हा डिवायस अँड्रॉइड 12 वर लाँच होईल जो मीयुआय व्हर्जनवर काम करेल. पावर बॅकअपसाठी 8,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. लीकनुसार टॅबलेटच्या बॉक्समध्ये कपंनी 22.5W चार्जर देखील देईल.

Redmi Pad 4G Specs Details

मिळालेल्या माहितीनुसार Redmi Pad 4G तीन व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री घेईल. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज दिली जाईल तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि सर्वात मोठा Redmi Pad 5G 6GB RAM + 128GB Storage वर लाँच होईल. सर्व मॉडेल LPDDR4X + UFS 2.2 टेक्नॉलॉजी वर चालतील.

फोटोग्राफीसाठी रेडमी पॅड 4जीच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाईल तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो फोकस फ्रेम टेक्नॉलॉजीसह येईल. या रेडमी टॅबलेटमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस क्वॉड स्पिकर्स देण्यात येतील. हे देखील वाचा: 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह Nokia T10 अँड्रॉइड टॅबलेट भारतात लाँच; किंमत फक्त 11,799 रुपये

Redmi Pad 4G Specs Details

Redmi Pad 4G मेटल यूनिबॉडी डिजाइनसह सादर करण्यात येईल ज्याचे डायमेंशन 250.38×73.70×7.05एमएम आणि वजन 445 ग्राम असेल. लीकनुसार रेडमी पॅड 4जी टॅबलेट डिवायस मार्केटमध्ये Grey, Silver आणि Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या आगामी रेडमी टॅबलेटची किंमत मात्र समोर आली नाही, परंतु हा नक्कीच शाओमीचा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट असेल.

The post सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-pad-4g-specs-details/feed/ 0