Redmi Pad 2 मध्ये मिळू शकतो Snapdragon 680 चिपसेट; गीकबेंचवर लिस्ट झाला हा टॅब

Highlights

 • Redmi Pad 2 ची लवकरच एंट्री होऊ शकते.
 • ह्यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
 • 8000mAh बॅटरीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.

शाओमी सध्या एका नवीन टॅबलेटवर काम करत आहे जो Redmi Pad 2 नावानं लवकरच एंट्री मिळू शकते. ह्याआधी डिवाइस एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला होता. आता हा टॅब गीकबेंचवर दिसला आहे त्यामुळे ह्या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया.

Redmi Pad 2 गीकबेंच लिस्टिंग

 • गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर Redmi Pad 2 को मॉडेल नंबर 23073RPBFC सह दिसला आहे.
 • लिस्टिंग नुसार Redmi Pad 2 नं बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राउंड मध्ये 415 आणि मल्टी-कोर राउंड मध्ये 1411 पॉईंट्स मिळवले आहेत.
 • असं देखील समोर आलं आहे की रेडमी पॅड 2 ऑक्टा-कोर चिपसेटसह येईल. जो 2.40GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो.
 • प्रोसेसरचे नाव पाहता लिस्टिंगमध्ये Redmi Pad 2 चिपसेटचं कोडनेम Bengal आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे की ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो.
 • डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
 • टॅबलेटमध्ये 4GB रॅम सपोर्ट मिळू शकतो.

Redmi Pad 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

 • डिस्प्ले: Redmi च्या नवीन टॅबलेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 2K रिजॉल्यूशन असलेला 10.95 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले खूप चांगला एक्सपीरियंस देतो.
 • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला जाईल.
 • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत एफसीसी सर्टिफिकेशनच्या डिटेलनुसार डिवाइस 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतो. ज्यात 4GB रॅम +64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6जीबी रॅम +128GB स्टोरेजचा समावेश असेल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
 • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता रेडमीचा हा नवीन टॅब 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.
 • बॅटरी: डिवाइसमध्ये 8000mAh बॅटरी सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फास्ट चार्जिंग बाबत माहिती मिळाली नाही.
 • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता टॅब अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here