Samsung Galaxy A04s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Mar 2023 15:15:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-smartphone-samsung-galaxy-a04s-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-smartphone-samsung-galaxy-a04s-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Mon, 03 Oct 2022 11:06:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13659 Samsung Galaxy A04s Launch: सॅमसंग आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत असते. आता या सीरिजचा विस्तार करत कंपनीनं Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आणला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 50MP Camera, 90Hz Refresh Rate, 4GB RAM आणि 5000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. एवढे भन्नाट स्पेसिफिकेशन्स असून देखील […]

The post Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A04s Launch: सॅमसंग आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत असते. आता या सीरिजचा विस्तार करत कंपनीनं Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आणला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 50MP Camera, 90Hz Refresh Rate, 4GB RAM आणि 5000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. एवढे भन्नाट स्पेसिफिकेशन्स असून देखील या हँडसेटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कमी किंमतीमुळे सॅमसंग गॅलेक्सी ए04एस स्मार्टफोन या बजेटमधील Realme आणि Redmi सहित OPPO, VIVO, Infinix तसेच Tecno सारख्या ब्रँड्सना टक्कर देईल.

Samsung Galaxy A04s Specifications

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, सॅमसंग गॅलेक्सी ए04एस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीनं याला इन्फिनिटी ‘व्ही’ डिस्प्ले असं नाव दिलं आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone लाँच! चायनीज कंपनीच्या नाकावर टिच्चून स्वदेशी कंपनीची कामगिरी

50mp camera smartphone Samsung Galaxy A04s launched in india know Price Specifications sale offer

Samsung Galaxy A04s अँड्रॉइड ओएससह वनयुआयवर चालतो. हा स्मार्टफोन 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 4जीबी एक्सपांडेबल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास हा सॅमसंग मोबाइल 8जीबी रॅमची ताकद देऊ शकतो. 64 जीबी इंटरनल स्टोरेज सोबतच 1टीबी मायक्रोएसडी कार्डचा पार करता येतो. सॅमसंगनं फोनच्या प्रोसेसरची माहिती मात्र दिली नाही.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A04s launched know price feature specifications sale deal offer details

Samsung Galaxy A04s ड्युअल सिम सपोर्टसह आला आहे. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगनुसार हा फोन एआय पावर मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे बॅटरी 2 दिवसांचा बॅकअप देऊ शकते. हे देखील वाचा: कामालाच झाली! 108MP Camera असलेला Moto G72 भारतात लाँच; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Samsung Galaxy A04s Price

सॅमसंग गॅलेक्सी ए04एसची प्राइस व सेल ऑफर्स पाहता हा मोबाइल फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे ज्यात 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy A04s Price 13499 रुपये आहे तसेच हा Black, Copper आणि Green कलरमध्ये विकत घेता येईल. एसबीआय क्रेडिट कार्ड तसेच वन कार्ड व स्लाइसच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी ए04एसची प्रभावी किंमत 12,499 रुपये होईल.

The post Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-smartphone-samsung-galaxy-a04s-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04s-launched-know-price-feature-specifications-sale-deal-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04s-launched-know-price-feature-specifications-sale-deal-offer-details/#respond Thu, 01 Sep 2022 08:55:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12712 सॅमसंग आपले ए सीरिजमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर करते. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोनची एंट्री झाली आहे, नावावरून हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे. 91मोबाइल्सनं Samsung Galaxy A04s बद्दल अनेक मोठ्या व एक्सक्लूसिव्ह बातम्या याआधीच दिल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की नोयडामधील फॅक्ट्रीमध्ये या सॅमसंग मोबाइलची निर्मिती सुरु झाली आहे. तर आज […]

The post रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपले ए सीरिजमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर करते. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोनची एंट्री झाली आहे, नावावरून हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे. 91मोबाइल्सनं Samsung Galaxy A04s बद्दल अनेक मोठ्या व एक्सक्लूसिव्ह बातम्या याआधीच दिल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की नोयडामधील फॅक्ट्रीमध्ये या सॅमसंग मोबाइलची निर्मिती सुरु झाली आहे. तर आज सॅमसंगनं आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ग्लोबल मार्केटमध्ये ऑफिशियल केला आहे. Samsung Galaxy A04s स्मार्टफोन सर्वप्रथम फिनलँड ध्ये एंट्री घेतली आहे. लवकरच हा फोन भारतीयांच्या सेवेत देखील दाखल होईल.

Samsung Galaxy A04s Specifications

Samsung Galaxy A04s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये

Samsung Galaxy A04s launched know price feature specifications sale deal offer details

Samsung Galaxy A04s स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंग वनयुआय कोर 4.1 वर चालतो. हा सॅमसंग मोबाइल 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो परंतु या फोनमध्ये चिपसेट कोणता आहे याची माहिती मात्र कंपनीनं स्पष्ट केली नाही. भारतीय बाजारात Samsung Galaxy A04s एक्सनॉस 850 चिपसेटवर लाँच होईल, अशी आशा आहे.

Samsung Galaxy A04s launched know price feature specifications sale deal offer details

सॅमसंग गॅलेक्सी ए04एस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Samsung Galaxy A04s चार आर्कषक रांगांमध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात Black, Green, White आणि Copper कलरचा समावेश आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त मोबाईलमध्ये दिला 8GB RAM; Samsung Galaxy A04 लाँच, पाहा फुल स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A04s launched know price feature specifications sale deal offer details

सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ड्युअल सिम फोन आहे जो 4एलटीई वर चालतो. मोबाइल मध्ये 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A04s Price

सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ऑफिशियल वेबसाइटवर तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या व्हेरिएंट्समध्ये 3 जीबी रॅम तसेच 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच स्टोरेज ऑप्शन पाहता यात 32 जीबी स्टोरेज, 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी स्टोरेज मिळते. सॅमसंगनं अजूनतरी Samsung Galaxy A04s Price च्या किंमतीचा खुलासा केला नाही, याची माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.

The post रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04s-launched-know-price-feature-specifications-sale-deal-offer-details/feed/ 0