इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत

Most Affordable 5G Smartphone Of India Lava Blaze 5G Launched At 10000 Price Check Feature Specifications

5G नेटवर्क भारतात सक्रिय झालं आहे आणि देशातील आठ शहरांमध्ये एयरटेलनं 5G Network सुरु केलं आहे. लवकरच जियोची 5G सेवा देखील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. आता भारतात 5G चा विस्तार होण्याच्या मार्गात 5G स्मार्टफोन्स हाच एक मोठा अडथळा आहे. जरी 5जी सेवा येण्याआधीच मोबाइल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत, परंतु India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन आज देशात लाँच झाला आहे. हा फोन भारतीय कंपनी लावानं बनवला आहे तसेच रेल्वे, संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे. इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) India Mobile Congress च्या मंचावरून Lava Blaze 5G phone लाँच झाला आहे.

Lava Blaze 5G ची किंमत

India’s most affordable 5G smartphone Lava Blaze 5G आहे जो आयएमसी 2022 दरम्यान लाँच करण्यात आला आहे. लावा ब्लेज 5जी फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास आहे, विशेष म्हणजे या प्राइस रेंजमध्ये आतापर्यंत कोणताही 5जी मोबाइल फोन भारतीय बाजारात आला नाही. Lava Blaze 5G दिवाळीच्या निमित्ताने भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 8 5G bands ला सपोर्ट करतो ज्यात 1/3/5/8/28/41/77/78 चा समावेश आहे. हे देखील वाचा: कामालाच झाली! 108MP Camera असलेला Moto G72 भारतात लाँच; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Most Affordable 5G Smartphone Of India Lava Blaze 5G Launched At 10000 Price Check Feature Specifications

Lava Blaze 5G चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनचा डिस्प्ले Widevine L1 ला सपोर्ट करतो जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह येतो. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो त्यामुळे यात एकूण 7जीबी रॅमची पावर मिळते. तसेच फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here