सॅमसंग आपले ए सीरिजमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर करते. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोनची एंट्री झाली आहे, नावावरून हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे. 91मोबाइल्सनं Samsung Galaxy A04s बद्दल अनेक मोठ्या व एक्सक्लूसिव्ह बातम्या याआधीच दिल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी आम्ही सांगितलं होतं की नोयडामधील फॅक्ट्रीमध्ये या सॅमसंग मोबाइलची निर्मिती सुरु झाली आहे. तर आज सॅमसंगनं आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ग्लोबल मार्केटमध्ये ऑफिशियल केला आहे. Samsung Galaxy A04s स्मार्टफोन सर्वप्रथम फिनलँड ध्ये एंट्री घेतली आहे. लवकरच हा फोन भारतीयांच्या सेवेत देखील दाखल होईल.
Samsung Galaxy A04s Specifications
Samsung Galaxy A04s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये
Samsung Galaxy A04s स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंग वनयुआय कोर 4.1 वर चालतो. हा सॅमसंग मोबाइल 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो परंतु या फोनमध्ये चिपसेट कोणता आहे याची माहिती मात्र कंपनीनं स्पष्ट केली नाही. भारतीय बाजारात Samsung Galaxy A04s एक्सनॉस 850 चिपसेटवर लाँच होईल, अशी आशा आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए04एस स्मार्टफोन 20:9 अॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Samsung Galaxy A04s चार आर्कषक रांगांमध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात Black, Green, White आणि Copper कलरचा समावेश आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त मोबाईलमध्ये दिला 8GB RAM; Samsung Galaxy A04 लाँच, पाहा फुल स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ड्युअल सिम फोन आहे जो 4एलटीई वर चालतो. मोबाइल मध्ये 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy A04s Price
सॅमसंग गॅलेक्सी ए04एस ऑफिशियल वेबसाइटवर तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या व्हेरिएंट्समध्ये 3 जीबी रॅम तसेच 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच स्टोरेज ऑप्शन पाहता यात 32 जीबी स्टोरेज, 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी स्टोरेज मिळते. सॅमसंगनं अजूनतरी Samsung Galaxy A04s Price च्या किंमतीचा खुलासा केला नाही, याची माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येईल.