Samsung Galaxy M02s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Mar 2021 16:48:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/#respond Fri, 26 Mar 2021 16:48:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10415 टिप्स्टर Abhishek Yadav नुसार Samsung Galaxy F02s दोन रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला जाईल. या फोनच्या बेस वेरिएंट 3GB RAM आणि 32GB स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM व 64GB स्टोेरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये असेल.

The post Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या लेटेस्ट गॅलेक्सी F सीरीजचा पोर्टफोलियो वाढवण्याची तयारी करत आहे. अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी नवीन 5G स्मार्टफोन Galaxy F52 वर काम करत आहे. तसेच या बातमी नंतर F-सीरीजचा अजून एक नवीन फोन Galaxy F02s गुगल प्ले कंसोल लिस्टिंग सोबतच NBTC, FCCC आणि अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला होता. आता इंडियाचे टिप्सटर अभिषेक यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर Galaxy F02s च्या किंमतीचा खुलासा करत माहिती दिली आहे कि फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. (samsung galaxy f02s india price leaks ahead of launch specification)

Samsung Galaxy F02s ची किंमत

टिप्स्टर Abhishek Yadav नुसार Samsung Galaxy F02s दोन रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला जाईल. या फोनच्या बेस वेरिएंट 3GB RAM आणि 32GB स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM व 64GB स्टोेरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये असेल. तसेच टिप्सटरने एक इमेज पण शेयर केली आहे, ज्यात फोन मॉडेल नंबर E025FE व E025FF सह दिसत आहे. फोनच्या लॉन्च डेट बद्दल टिप्सटरने कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F02s चे स्पेसिफिकेशन

आम्ही तुम्हाला अलीकडेच सांगितले होते कि हा स्मार्टफोन Google Play कंसोलवर लिस्ट झाला होता, ज्यात पुष्टी करण्यात आली होती कि Galaxy F02s क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसरसह एड्रेनो 506 GPU सह चालेल. तसेच, हँडसेट 1600 x 720 पिक्सलच्या स्क्रीन रिजॉल्यूशन आणि 280ppi च्या पिक्सेल डेंसिटीसह HD + डिस्प्लेवर सादर केला जाईल. लिस्टिंगवरून असे समजले होते कि स्मार्टफोन एंड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

Samsung Galaxy F02S ची डिजाइन

गुगल प्ले लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या फोटोजनुसार फोनमध्ये बारीक बेजलसह वॉटर-ड्रॉप नॉच डिजाइन दिली जाईल आहे. पण अजूनही निश्चितपणे म्हणता येणार नाही कि हा फोन अपकमिंग गॅलेक्सी F02s असेल. बोलले जात आहे कि हा सॅमसंग गॅलेक्सी M02s चा रीब्रँडेड वर्जन असेल.

हे देखील वाचा : ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

Samsung Galaxy M02S

फोनमध्ये 6.5 इंचाचा TFT LCD इनफिनिटी-V कट डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट, 4जीबी पर्यंत रॅम आणि 64जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी लेंससह दोन 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहेत. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा 5000mAh च्या बॅटरीसह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस व्हिडीओ

The post Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/feed/ 0
5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/#respond Tue, 19 Jan 2021 12:51:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9689 तुम्हाला अश्या काही स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे 5000एमएएचच्या बॅटरी सह येतात. विशेष म्हणजे हे सर्व अलीकडेच बजेट कॅटेगरी मध्ये लॉन्च केले गेले आहेत.

The post 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन बाजारात दिवसेंदिवस असे हँडसेट येत आहेत जे आपल्या अनोख्या फीचर्समुळे चर्चेत राहतात. कंपन्यांचा पण प्रयत्न असतो कि ते फ्लॅगशिप सोबतच बजेट सेगमेंट मध्ये ते फीचर द्यायचे ज्यांची मागणी जास्त आहे. आपण सर्व जेव्हा एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा प्लान करतो तेव्हा त्याचे अनेक फीचर्स पाहतो, यातील महत्वाचे एक फीचर आहे बॅटरी. जर बॅटरी दमदार असेल तर फोन वारंवार चार्ज करण्याची झंझट राहत नाही. म्हणूनच तुम्हाला अश्या काही स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे 5000एमएएचच्या बॅटरी सह येतात. विशेष म्हणजे हे सर्व अलीकडेच बजेट कॅटेगरी मध्ये लॉन्च केले गेले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्स बाबत सर्वकाही.

Infinix Smart HD 2021

Infinix Smart HD 2021 मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

या फोन मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, या फोनची किंमत 5,999 रुपये आहे. फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 6.1 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह

Tecno Spark 6 Go

Tecno Spark 6 Go 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

टेक्नोचा हा फोन फक्त एकच वेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोन मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. दुसरा एआय कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

Vivo Y12s

Vivo Y12s मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोन मध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत 9,990 रुपये आहे. या फोन मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात ड्यूल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा एआय कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M02s

Samsung Galaxy M02s ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम सह येतो.

5000एमएएचची बॅटरी असलेल्या या या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. हि किंमत 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. यात 6.50 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रेजोल्यूशन 720 x 1560 आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम सह येतो. तसेच यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : POCO F2 बद्दल कंपनीचा मोठा खुलासा, लवकरच होईल भारतात लॉन्च

Vivo Y20A

Vivo Y20A 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो जो 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हा फोन 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो जो 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर आणि 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग देण्यात आली आहे.

The post 5000mAh बॅटरी असलेले टॉप 5 लेटेस्ट स्मार्टफोन, किंमत सुरु होत आहे फक्त 5,999 रुपयांपासून first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2021-latest-top-smartphones-with-5000mah-battery/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/#respond Thu, 14 Jan 2021 09:01:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9673 Samsung Galaxy M02s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला लो बजेट सेग्मेंटचा विस्तार केला होता. सॅमसंगने साल 2021 चा पहिला स्मार्टफोन म्हणून Samsung Galaxy M02s भरतात लाॅन्च केला आहे. फोन ऑफिशियल करताना कंपनीने याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सांगितले होते पण सेल डेट सांगितली नव्हती. तसेच आता शाॅपिंग साइट अमेजॉनने फोनचे प्रोडक्ट पेज अपडेट करत घोषणा केली आहे कि Samsung Galaxy M02s स्मार्टफोन 19 जानेवारीला भारतात सेलसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M02s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. भारतात फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे तसेच 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. 19 जानेवारी पासून हा स्मार्टफोन Black, Blue आणि Red कलर मध्ये अमेजॉन इंडिया वर सेलसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तिन्ही बाजूंना बारीक बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे.

Samsung Galaxy M02s एंड्रॉयड 10 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम02एस ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलाॅक फीचर आहे. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम02एस 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस वीडियो

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल शानदार Samsung Galaxy M02s स्मार्टफोन, 19 जानेवारी पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-sale-in-india-from-19-january-on-amazon-price-rs-8999-know-specs-offer/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 5,000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्वस्त Samsung Galaxy M02s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-india-with-5000mah-battery-know-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-india-with-5000mah-battery-know-specs-price-sale-offer/#respond Fri, 08 Jan 2021 06:57:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9588 Samsung Galaxy M02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलाॅक फीचर आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 5,000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्वस्त Samsung Galaxy M02s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतात आपला पोर्टफोलियो वाढवत ‘गॅलेक्सी एम’ सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने हा नवीन डिवाईस Samsung Galaxy M02s नावाने लाॅन्च केला आहे जो लो बजट मध्ये आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम02 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत भारतीय बाजारात आला आहे जो आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह ऑनलाईन शाॅपिंग साइट अमेजॉन इंडिया आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तिन्ही बाजूंना बारीक बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे.

Samsung Galaxy M02s एंड्रॉयड 10 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतीय बाजारात हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम02एस ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलाॅक फीचर आहे. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम02एस 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात फोनचा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे तसेच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये आला आहे. हा स्मार्टफोन Black, Blue आणि Red रंगात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस विडिओ

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 5,000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्वस्त Samsung Galaxy M02s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-india-with-5000mah-battery-know-specs-price-sale-offer/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-nepal-with-5000mah-battery-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-nepal-with-5000mah-battery-rs-10000/#respond Tue, 05 Jan 2021 12:14:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9535 Samsung Galaxy M02s नेपाळ मध्ये सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 450 SoC आणि Adreno 506 GPU आहे.

The post 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung देशात आपला नवीन स्मार्टफोन ‘Max Up’ Galaxy M02s लॉन्च करण्यासाठी तयार आहे. गॅलेक्सी एम02एस भारतात 7 जानेवारीला लॉन्च केला जाईल. पण त्याआधी धक्का देत कंपनीने हा फोन शेजारच्या नेपाळ मध्ये अधिकृतपणे सादर केला आहे. भारताआधी दुसऱ्या देशात लॉन्च केल्यानंतर आता स्पष्ट झाले आहे कि Galaxy M02s मध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील. चला जाणून घेऊया या फोन बाबत सर्वकाही.

डिजाइन आणि डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला आहे जो 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह येतो. इतर फीचर्स पाहता फोन मध्ये 720 x 1,560 पिक्सल डिस्प्ले रिजोल्यूशन आहे. तसेच फोनच्या बॉटमला थोडा जाड बेजल दिसतो. तसेच दोन्ही बाजूंना बारीक बेजल्स आहेत. मागे चौकोनी आकाराच्या कॅमेरा मॉड्यूल मध्ये वर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि त्याच्या बाजूला एलईडी लाइट देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. Samsung Galaxy M02s कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 450 SoC आणि Adreno 506 GPU सह सादर केला आहे. भारतात पण कंपनी स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह फोन सादर करेल. पण चिप बद्दल पक्की माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

स्मार्टफोन मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13MP प्राइमरी लेंस+ 2MP पोर्टेट लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP सेल्फी सेंसर आहे. फोन अँड्रॉइड 10 बेस्ड वनयुआय कस्टम स्किन वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. नेपाळ मध्ये Samsung Galaxy M02s Blue, Black, आणि Red कलर मध्ये सादर केला गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M02 च्या भारतीय वर्जन मध्ये हेच स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स असल्याची शक्यता आहे. काही बदलांसह पण फोन भारतात येऊ शकतो. 7 जानेवारीला देशात लॉन्च होणाऱ्या या फोनची विक्री अमेझॉन इंडिया वर होईल.

हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21

किंमत

Nepal मध्ये फोन एकमेव 4GB + 64GB कॉन्फिगरेशन सह सादर केला गेला आहे, ज्याची किंमत NPR 15,999 (जवळपास 10,000 रुपये) आहे. हे आश्चर्यकारक आहे कि स्मार्टफोन भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M02s ची किंमत भारतात 9,999 रुपये असू शकते.

The post 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-launch-in-nepal-with-5000mah-battery-rs-10000/feed/ 0
5,000mAh बॅटरी सह 7 जानेवारीला लॉन्च होईल सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy M02s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-india-launch-on-7-january-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-india-launch-on-7-january-5000mah-battery-4gb-ram/#respond Mon, 04 Jan 2021 13:46:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9530 Samsung Galaxy M02s स्मार्टफोन 7 जानेवारी दुपारी 1 वाजता भारतात ऑफिशियल केला जाईल. फोनची किंमत आणि याच्या विक्रीची तारीख पण याच दिवशी समजेल.

The post 5,000mAh बॅटरी सह 7 जानेवारीला लॉन्च होईल सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy M02s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपला लो बजेट सेग्मेंट वाढवत Samsung Galaxy M01s लॉन्च केला होता जो 8,000 रुपयांच्या आसपास किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. हि कोरियन कंपनी आता या फोनचा अपग्रेडेड वर्जन आणण्यासाठी तयार आहे जो Samsung Galaxy M02s नावाने लॉन्च केला जाईल. कंपनीने घोषणा केली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम02एस स्मार्टफोन येत्या 7 जानेवारीला भारतीय बाजारात येईल आणि या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy M02s कंपनीने अधिकृतपणे टीज केला आहे आणि या फोनचे प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडिया वेबसाइट वर लाईव झाले आहे. या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फोटो सोबतच महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. सॅमसंगने स्वतःहून प्रेस रिलीज पाठवून Samsung Galaxy M02s च्या लुक, डिजाईन आणि फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. त्याचबरोबर शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण सॅमसंग गॅलेक्सी एम02एसचे प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आले आहे.

Samsung Galaxy M02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस पाहता हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला जाईल ज्यात बेजल लेस डिस्प्ले दिली जाईल. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाईल. या फोटोज मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला नाही त्यामुळे या फोनचा रियर कॅमेरा सेटअप कसा असेल हे सांगता येणार नाही. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सोबतच पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि Samsung Galaxy M02s रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंगने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. अँड्रॉइड ओएस सह या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन चिपसेट मिळेल. भारतात हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च होईल. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy M02s स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21

Samsung Galaxy M02s स्मार्टफोन 7 जानेवारी दुपारी 1 वाजता भारतात ऑफिशियल केला जाईल. फोनची किंमत आणि याच्या विक्रीची तारीख पण याच दिवशी समजेल. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम02एस या बजेट मध्ये Xiaomi आणि Realme ला चांगलीच टक्कर देईल.

The post 5,000mAh बॅटरी सह 7 जानेवारीला लॉन्च होईल सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy M02s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-india-launch-on-7-january-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0
Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/#respond Wed, 16 Dec 2020 15:00:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9328 गॅलेक्सी एम02एस चे कोडनेम ‘a02q’ सांगण्यात आले आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी फोन Samsung Galaxy A02s चा रिब्रँडिंड वर्जन म्हणून लॉन्च करेल.

The post Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Samsung Galaxy M02 स्मार्टफोन वर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्चची माहिती अजूनतरी दिली नाही पण मागे गॅलेक्सी एम02 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर स्पॉट झाला होता. तसेच आता या सीरीजच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर येत आहे ज्याचे नाव Samsung Galaxy M02s असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M02s गुगल प्ले सपोर्टेड डिवायसेज लिस्ट मध्ये अपडेट केला गेला आहे जो एमएसपीने स्पॉट केला आहे. वेबसाइट वर हा फोन SM-M025F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, सोबतच फोनचे नाव ‘Galaxy M02s’ चा पण खुलासा झाला आहे. इथे गॅलेक्सी एम02एस चे कोडनेम ‘a02q’ सांगण्यात आले आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी फोन Samsung Galaxy A02s चा रिब्रँडिंड वर्जन म्हणून लॉन्च करेल.

Samsung Galaxy A02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस च्या लॉन्चची स्थिती तर स्पष्ट झाली नाही पण अलीकडेच सादर झालेला गॅलेक्सी ए02एस पाहता हा 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने गॅलेक्सी ए02एस मधील चिपसेट सांगितला नाही पण आशा आहे कि मार्केट मध्ये हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर

सॅमसंग गॅलेक्सी ए02एस मधील फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए02 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A02s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही तसेच पावर बॅकअपसाठी हा गॅलेक्सी ए02एस स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन येत्या काही दिवसांत Black आणि White कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/feed/ 0