5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम सह लॉन्च झाला Samsung चा स्वस्त फोन Galaxy M02s, जाणून घ्या किंमत

Samsung देशात आपला नवीन स्मार्टफोन ‘Max Up’ Galaxy M02s लॉन्च करण्यासाठी तयार आहे. गॅलेक्सी एम02एस भारतात 7 जानेवारीला लॉन्च केला जाईल. पण त्याआधी धक्का देत कंपनीने हा फोन शेजारच्या नेपाळ मध्ये अधिकृतपणे सादर केला आहे. भारताआधी दुसऱ्या देशात लॉन्च केल्यानंतर आता स्पष्ट झाले आहे कि Galaxy M02s मध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील. चला जाणून घेऊया या फोन बाबत सर्वकाही.

डिजाइन आणि डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला आहे जो 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह येतो. इतर फीचर्स पाहता फोन मध्ये 720 x 1,560 पिक्सल डिस्प्ले रिजोल्यूशन आहे. तसेच फोनच्या बॉटमला थोडा जाड बेजल दिसतो. तसेच दोन्ही बाजूंना बारीक बेजल्स आहेत. मागे चौकोनी आकाराच्या कॅमेरा मॉड्यूल मध्ये वर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि त्याच्या बाजूला एलईडी लाइट देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. Samsung Galaxy M02s कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 450 SoC आणि Adreno 506 GPU सह सादर केला आहे. भारतात पण कंपनी स्नॅपड्रॅगॉन चिपसेट सह फोन सादर करेल. पण चिप बद्दल पक्की माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

स्मार्टफोन मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13MP प्राइमरी लेंस+ 2MP पोर्टेट लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP सेल्फी सेंसर आहे. फोन अँड्रॉइड 10 बेस्ड वनयुआय कस्टम स्किन वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. नेपाळ मध्ये Samsung Galaxy M02s Blue, Black, आणि Red कलर मध्ये सादर केला गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M02 च्या भारतीय वर्जन मध्ये हेच स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स असल्याची शक्यता आहे. काही बदलांसह पण फोन भारतात येऊ शकतो. 7 जानेवारीला देशात लॉन्च होणाऱ्या या फोनची विक्री अमेझॉन इंडिया वर होईल.

हे देखील वाचा : Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21

किंमत

Nepal मध्ये फोन एकमेव 4GB + 64GB कॉन्फिगरेशन सह सादर केला गेला आहे, ज्याची किंमत NPR 15,999 (जवळपास 10,000 रुपये) आहे. हे आश्चर्यकारक आहे कि स्मार्टफोन भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M02s ची किंमत भारतात 9,999 रुपये असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here