Samsung Galaxy M53 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 12:42:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung Galaxy M54 5G चा नवा लुक; लाँच होण्याआधी डिजाईन लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m54-5g-render-image-and-video-leaked-design-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m54-5g-render-image-and-video-leaked-design-revealed/#respond Tue, 24 Jan 2023 06:42:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17171 Samsung लवकरच टेक विश्वात मोठा धमाका करणार आहे, कंपनी लवकरच आपली Galaxy S23 Series बाजारात आणणार आहे. ही सीरिज फ्लॅगशिप लेव्हलची असल्यामुळे सर्वांच्याच बजेटमध्ये बसेलच असं नाही. म्हणूनच मिडबजेट युजर्ससाठी कंपनीचा Samsung Galaxy M54 5G येत आहे. कंपनीनं जरी या स्मार्टफोनची अधिकृत माहिती दिली नसली तरी हा फोन यंदा होळी निमित्त ग्राहकांच्या भेटीला येईल. तत्पूर्वी […]

The post ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung Galaxy M54 5G चा नवा लुक; लाँच होण्याआधी डिजाईन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy M54 5G चा 360डिग्री व्हिडीओ लीक झाला आहे.
  • यात फोनचे सर्व पॅनल्स व अँगल दाखवण्यात आले आहेत.
  • हा सॅमसंग फोन एक्सनॉस 1380 चिपसेटवर लाँच होऊ शकतो.

Samsung लवकरच टेक विश्वात मोठा धमाका करणार आहे, कंपनी लवकरच आपली Galaxy S23 Series बाजारात आणणार आहे. ही सीरिज फ्लॅगशिप लेव्हलची असल्यामुळे सर्वांच्याच बजेटमध्ये बसेलच असं नाही. म्हणूनच मिडबजेट युजर्ससाठी कंपनीचा Samsung Galaxy M54 5G येत आहे. कंपनीनं जरी या स्मार्टफोनची अधिकृत माहिती दिली नसली तरी हा फोन यंदा होळी निमित्त ग्राहकांच्या भेटीला येईल. तत्पूर्वी एका नवीन लीकमधून या सॅमसंग फोनची रेंडर ईमेज आणि 360डिग्री व्हिडीओ लीक झाला आहे ज्यात फोनच्या संपूर्ण लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy M54 5G फोन संबंधित ही माहिती टेक वेबसाइट माय स्मार्ट प्राइसनं शेयर केली आहे. वेबसाइटनं फोनचा व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोन 360डिग्री अँगलनं दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फोनचे सर्व पॅनल व पोर्ट्स दिसत आहेत. लीकच्या माध्यमातून लाँचच्या आधीच गॅलेक्सी एम54 5जी फोनच्या डिजाईन सोबतच अनेक महत्वाच्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे तर ही कंपनी आणतेय स्वस्त 5G Phone; 4 फेब्रुवारीला येणार भारतात

कशी असेल Samsung Galaxy M54 5G ची डिजाईन?

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन पंच-होल अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येईल. या स्क्रीनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तथा खालच्या बाजूला बारीक चीन आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या होलमध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या मागे डावीकडे व्हर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. हा फोन dark blue, blue, pink आणि green कलरमध्ये दिसत आहे. हे देखील वाचा: पुन्हा स्वस्तात फ्लॅगशिप फोन देणार वनप्लस? आगामी OnePlus 11 price लीक, जाणून घ्या व्हेरिएंट्स व किंमत

Samsung Galaxy M54 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 12GB RAM
  • Android 13
  • 2.40Ghz Processor
  • Samsung Exnos 1380 SoC

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती उपलब्ध नाही. लीक्स व सर्टिफिकेशन्स नुसार हा फोन 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येईल. हा 5जी सॅमसंग फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 13 सह येईल. तसेच मार्केटमध्ये या स्मार्टफोनचा 12जीबी रॅम व्हेरिएंट देखील येऊ शकतो.

The post ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung Galaxy M54 5G चा नवा लुक; लाँच होण्याआधी डिजाईन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m54-5g-render-image-and-video-leaked-design-revealed/feed/ 0
Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/#respond Wed, 30 Nov 2022 10:20:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15524 सॅमसंगनं एप्रिलमध्ये भारतीय बाजारात आपला मिड बजेट 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 5G लाँच केला होता जो 26,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे तसेच 108MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. कोरियन कंपनी सॅमसंग आता या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनची तयारी करत आहे जो Samsung Galaxy M54 5G नावानं […]

The post Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं एप्रिलमध्ये भारतीय बाजारात आपला मिड बजेट 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 5G लाँच केला होता जो 26,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे तसेच 108MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. कोरियन कंपनी सॅमसंग आता या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनची तयारी करत आहे जो Samsung Galaxy M54 5G नावानं लाँच होऊ शकतो. कंपनीच्या घोषणेआधीच सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन स्पेसिफिकेशन्ससह गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy M54 5G

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर SM-M546B मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 29 नोव्हेंबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. स्पेसिफिकेशन डिटेल्स आधी बेंचमार्किंग स्कोर पाहता, या आगामी सॅमसंग मोबाइल फोनला सिंगल-कोर 750 मध्ये आणि मल्टी-कोर मध्ये 2696 पॉईंट्स मिळाले आहेत. हे देखील वाचा: Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा

Samsung Galaxy M54 5G गीकबेंचवर 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्याच्या मदरबोर्ड सेग्मेंटमध्ये Samsung s5e8835 कोडनेम लिहिण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग एक्सनॉस 1380 चिपसेटसह मार्केटमध्ये येऊ शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 13 सह दाखवण्यात आला आहे. तसेच गीकबेंचवर 8जीबी रॅम व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा सॅमसंग स्मार्टफोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो, ज्यात 12जीबी रॅमचा देखील समावेश असू शकतो. Samsung Galaxy M54 5G च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी आणि अन्य डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

Samsung Galaxy M53 5G

भारतात उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी फोन पाहता या मोबाइल फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये कोर्निंग ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी68 जीपीयू मिळतो. सॅमसंगचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. हे देखील वाचा: जबरदस्त! सिंगल चार्जवर 480Km चालणारी Hyundai Ioniq 5 EV येतेय भारतात; बुकिंग 20 डिसेंबरपासून

Samsung Galaxy M53 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

The post Galaxy M54 5G Phone बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-mobile-phone-samsung-galaxy-m54-5g-specifications-leaked-on-geekbench-might-launch-soon/feed/ 0
Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/#respond Wed, 13 Jul 2022 13:25:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11372 कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन […]

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीच्या नथिंग ओएसचे कौतुक देखील केलं जात आहे. परंतु स्मार्टफोनचे अन्य स्पेसिफिकेशन अन्य अँड्रॉइड स्मार्टफोन सारखेच आहेत. भारतात अनेक डिवाइस आहेत जे Nothing Phone (1) ला टक्कर देऊ शकतात ज्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. परंतु त्याआधी Nothing Phone (1) ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. HDR10+ला सपोर्ट करणारा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या कोटिंगसह येतो. यात क्वॉलकॉम Snapdragon 778G+ प्रोसेसरची टाकडे देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 12 सह नथिंग युआयची लेयरिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपीचे दोन सेन्सर आहेत. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500 एमएएचची बॅटरी मिळते जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 38,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. लाँच ऑफर अंतर्गत हे तीन मॉडेल 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

हे 5 फोन देतात Nothing Phone (1) ला टक्कर

  • OnePlus Nord 2T 5G
  • POCO F4 5G
  • iQOO Neo 6 5G
  • Samsung Galaxy M53 5G
  • Motorola Edge 30

OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T 5G

नथिंग ब्रँडचे फाउंडर कार्ल पेई हे वनप्लसचे देखील सहसंस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या ब्रँडची सर्वात मोठी टक्कर वनप्लसशी आहे. 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये वनप्लस नॉर्ड 2टी 5जी नथिंग फोनला टक्कर देत आहे. Nord 2T मध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन 4500mAh च्या बॅटरीसह येतो. या फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरु होते.

POCO F4 5G

Nothing Phone (1) ला शाओमीच्या सब-ब्रँड पोकोकडून 30 हजारांच्या बजेटमध्ये चांगली टक्कर मिळते. POCO F4 5G स्मार्टफोन फ्लॅगशिप ग्रेड Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. जो स्टेबल, हीटिंग समस्या नसलेला चिपसेट आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर 3.2GHz क्लॉक स्पीडसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळतो. फोनच्या मागे 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 20 MP चा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळते. या फोनचा बेस व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

iQOO Neo 6 5G

या बजेटमध्ये iQOO Neo 6 5G देखील एक शानदार डिवाइस आहे जो Nothing Phone (1) साठी पर्याय ठरवू शकतो. हा फोन Snapdragon 870 प्रोसेसरवर चालतो आणि यात 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील 6.62 इंचाची आमोलेड स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनमध्ये 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि ही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. 29,999 रुपयांमध्ये फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M53 5G

जर तुम्ही या प्राईस रेंजमध्ये सॅमसंगचा पर्याय शोधत असाल तर Galaxy M53 5G चा विचार करू शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा Super AMOLED Plus डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. कंपनीनं हा MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबतीला 8GB रॅम पर्यंत आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो. यात 108MP च्या मेन कॅमेऱ्यासह 8MP चा वाईड अँगल, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. कंपनीनं यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 26499 रुपयांमध्ये या फोनचा बेस व्हेरिएंट सॅमसंगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Motorola Edge 30

या बजेटमध्ये मोटोरोलाचा देखील हा फोन खूप चांगला आहे आणि नथिंग फोन 1 च्या ऐवजी Motorola Edge 30 चा चार्ट करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंचाचा P-OLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP च्या मेन कॅमेऱ्यासह 50MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरता येतो. पावर बॅकअपसाठी 4020mAh ची बॅटरी मिळते, जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं हा फोन Snapdragon 778G Plus प्रोसेसरसह सादर केला आहे आणि जो प्रोसेसर नथिंग फोनमध्ये देखील आहे. फ्लिपकार्टवरून हा फोन 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/feed/ 0