सॅमसंगनं एप्रिलमध्ये भारतीय बाजारात आपला मिड बजेट 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M53 5G लाँच केला होता जो 26,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे तसेच 108MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. कोरियन कंपनी सॅमसंग आता या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनची तयारी करत आहे जो Samsung Galaxy M54 5G नावानं लाँच होऊ शकतो. कंपनीच्या घोषणेआधीच सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन स्पेसिफिकेशन्ससह गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
Samsung Galaxy M54 5G
सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर SM-M546B मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 29 नोव्हेंबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. स्पेसिफिकेशन डिटेल्स आधी बेंचमार्किंग स्कोर पाहता, या आगामी सॅमसंग मोबाइल फोनला सिंगल-कोर 750 मध्ये आणि मल्टी-कोर मध्ये 2696 पॉईंट्स मिळाले आहेत. हे देखील वाचा: Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा
Samsung Galaxy M54 5G गीकबेंचवर 8जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्याच्या मदरबोर्ड सेग्मेंटमध्ये Samsung s5e8835 कोडनेम लिहिण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग एक्सनॉस 1380 चिपसेटसह मार्केटमध्ये येऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 13 सह दाखवण्यात आला आहे. तसेच गीकबेंचवर 8जीबी रॅम व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा सॅमसंग स्मार्टफोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो, ज्यात 12जीबी रॅमचा देखील समावेश असू शकतो. Samsung Galaxy M54 5G च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी आणि अन्य डिटेल्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.
Samsung Galaxy M53 5G
भारतात उपलब्ध असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी फोन पाहता या मोबाइल फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये कोर्निंग ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी68 जीपीयू मिळतो. सॅमसंगचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. हे देखील वाचा: जबरदस्त! सिंगल चार्जवर 480Km चालणारी Hyundai Ioniq 5 EV येतेय भारतात; बुकिंग 20 डिसेंबरपासून
Samsung Galaxy M53 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.