Jio पेक्षा अर्ध्या किंमतीत BSNL देतेय दुप्पट फायदे; 100 दिवसांची वैधता आणि रोज 2GB डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे असे Recharge Plans आहेत जे युजर्सना कमी किंमतीत अनेक बेनिफिट्स देतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा प्लॅन्सची माहिती देणार आहोत जे एक किंवा दोन महिने नव्हे तर तीन महिन्यांपेक्षा जास्त वैधतेसह येतात. आम्ही तुम्हाला आज या आर्टिकलमध्ये बीएसएनएलच्या 100 दिवसांच्या रिचार्जची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत Jio च्या 90 दिवसांच्या प्लॅनपेक्षा अर्धी आहे. जर तुम्ही BSNL युजर असाल तर तुम्हाला हा प्लॅन खूप आवडेल. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती.

100 दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळतील भरपूर बेनिफिट्स

बीएसएनएल अशी कंपनी आहे जी विचित्र वैधता असलेले प्लॅन सादर करते. इतर कंपन्या 84 किंवा 90 दिवसांची व्हॅलिडिटी देत असताना सरकारी कंपनी 100 दिवसांचा प्लॅन घेऊन आली आहे. 100 दिवसांची वैधता नव्हे तर या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटाची सुविधा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिनचा लाभ घेता येतो. पुढे आम्ही तुम्हाला प्लॅनची किंमत आणि अन्य माहिती दिली आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! सिंगल चार्जवर 480Km चालणारी Hyundai Ioniq 5 EV येतेय भारतात; बुकिंग 20 डिसेंबरपासून

BSNL चा 100 दिवसांचा प्लॅन

आम्ही ज्या रिचार्ज बद्दल बोलत आहोत तो आहे BSNL चा PV_197 प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 197 रुपये आहे. तर, याची वैधता 100 दिवस आहे. बेनिफिट्स पाहता यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्स कोणत्याही नेटवर्क अमर्याद कॉलिंग करू शकतील. त्याचबरोबर अनलिमिटेड डेटाची सुविधा देखील जाते. युजर्सना 2 जीबी डेटा प्रतिदिन दिला जाईल. जो संपल्यावर युजर्सना 40Kbps च्या स्पीडवर डेटा मिळेल. रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. तसेच ZING अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस देखील दिला जाईल. फक्त या प्लॅनमधील डेटा 18 दिवसांपर्यंतच मिळेल.

दुसरीकडे 90 दिवसांच्या वैधतेसह 749 रुपयांचा प्लॅन जियो देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटिड लोकल, एसटीडी कॉलिंग व्यतिरिक्त रोमिंग कॉल्सचा फायदा मिळतो. तसेच प्लॅनमध्ये 2GB इंटरनेट डेटा आणि काही जियो अ‍ॅप्सचे सब्सस्क्रिप्शन देण्यात आलं आहे. किंमतच्या बाबतीत बीएसएनएल रिचार्जपेक्षा जियोचा प्लॅन खूप महागडा आहे. हे देखील वाचा: महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली

नोट: बीएसएनएलचा हा प्लॅन देशात प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नाही. कंपनीचे रिचार्ज प्लॅन टेलिकॉम सर्कलनुसार बदलत असतात त्यामुळे तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज करण्याआधी कंपनीच्या कस्टमर केयरवर कॉल करून चेक करा की हा प्लॅन तुमच्या सर्कलमध्ये उपलब्ध आहे की नाही, तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील ही माहिती मिळू शकते. आमच्या माहितीनुसार हा प्लॅन महाराष्ट्र, केरळ आणि यूपी ईस्ट सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here