Hyundai Ioniq 5 EV ची बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरु होणार भारतात

काही दिवसांपूर्वी हुंडईनं एक इलेक्ट्रिक व्हेईकल Hyundai Ioniq 5 जागतिक बाजारात लाँच केली होती. या इलेक्ट्रिक कारची रेंज पाहून भारतीयांना देखील ही कार आवडली होती, आता या कारची प्रतीक्षा संपली आहे. Hyundai नं अधिकृतपणे घोषणा केली आहे की Ioniq 5 EV ची बुकिंग भारतात 20 डिसेंबर, 2022 पासून सुरु होईल. नवीन इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर जानेवारी 2023 ऑटो एक्सपोमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. नवीन Hyundai Ioniq 5 EV CBU (कंप्लीटली बिल्ट यूनिट) स्वरूपात येईल आणि हिची किंमत जवळपास 45 ते 60 लाख रुपयांदरम्यान असेल, असा अंदाज लावला जात आहे.

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर ब्रँडची ईव्ही डेडिकेटेड ई-जीएमपी या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर डिजाइन आणि डेव्हलप करण्यात आली आहे. Kia EV6 इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील E-GMP आर्किटेक्चरवर आधारित आहे. Ioniq 5 या प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला प्रोडक्ट आहे. Hyundai या प्लॅटफॉर्मचा वापर 2028 पर्यंत भारतीय बाजारात अनेक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल डेव्हलप करण्यासाठी करेल. फक्त Ioniq 5 नव्हे Hyundai 2023 मध्ये भारतीय बाजारात अपडेटेड Kona EV, Creta Creta facelift, नवीन Verna आणि एक नवीन मायक्रो एसयूव्ही देखील लाँच करेल. ईव्ही-डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवरून हुंडईला केबिनमध्ये जास्त जागा बनवण्याची सुविधा मिळते. हे देखील वाचा: महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली

Hyundai Ioniq 5 ची रेंज

Hyundai Ioniq 5 EV दोन बॅटरी ऑप्शनमध्ये येते, ज्यात 72.6kWh आणि 58kWh चा समावेश आहे आणि हे रियर-व्हील किंवा ऑल-व्हील-ड्राईव्ह लेआउटसह सादर केली जाते. 72.6kWh बॅटरी व्हर्जन बाबत दावा केला गेला आहे की ही जवळपास 470-480kms ची रेंज देते. ही कार 800V बॅटरी टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते जी अल्ट्रा-रॅपिड चार्जिंग देते. ही 220kW डीसी चार्जिंगसह कॉम्पिटेबल आहे, जी फक्त 18 मिनिटांत बॅटरीला 10% ते 80% पर्यंत चार्ज करते. हे देखील वाचा: Motorola चा दणकट स्मार्टफोन येतोय; वनप्लसची सुट्टी करू शकतो Moto X40

टॉप-स्पेक Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हरमध्ये ड्युअल-मोटर, ऑल-व्हील-ड्राईव्ह लेआउट आहे, जी 306bhp ची कम्बाइन्ड पावर आणि 605Nm ची पीक टॉर्क देते. 185km ताशी टॉप स्पीडसह ही कार बाजारात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार फक्त 5.2 सेकंदात 0-100km ताशी वेग सहज गाठू शकते. 58kWh च्या बॅटरीमध्ये 169bhp, सिंगल मोटर आहे. या व्हेरिएंट बद्दल दावा आहे की ही 0 ते 100 km ताशी वेग फक्त 8.5 सेकंदात मिळवू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here