South Indian Movie - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 Nov 2022 13:12:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम https://www.91mobiles.com/marathi/5-best-south-movies-like-kantara-to-watch-on-ott/ https://www.91mobiles.com/marathi/5-best-south-movies-like-kantara-to-watch-on-ott/#respond Tue, 08 Nov 2022 10:31:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14713 दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट कांतारा चित्रपटगृहांत दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. दर्शकांसह हा चित्रपट समीक्षकांना देखील आवडला आहे. परंतु काही फॅन्स या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत. परंतु अजूनतरी ओटीटी दर्शकांसाठी गुड न्यूज येण्यास वेळ लागणार आहे कारण चित्रपटाचे प्रोड्यूसर कार्तिक गौडा यांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू केव्हा हा चित्रपट ओटीटीवर येईल. […]

The post Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट कांतारा चित्रपटगृहांत दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. दर्शकांसह हा चित्रपट समीक्षकांना देखील आवडला आहे. परंतु काही फॅन्स या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत. परंतु अजूनतरी ओटीटी दर्शकांसाठी गुड न्यूज येण्यास वेळ लागणार आहे कारण चित्रपटाचे प्रोड्यूसर कार्तिक गौडा यांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू केव्हा हा चित्रपट ओटीटीवर येईल. त्यामुळे या चित्रपटाच्या OTT Release साठी थोडी वाट बघावी लागू शकते. परंतु, तुम्ही ओटीटीवर Kantara (Best Kantara like South Movies to watch online) सारखे काही दाक्षिणात्य चित्रपट बघू शकता.

Best Kantara like South Movies to watch online

  1. Garuda Gamana Vrishabha Vahan
  2. Asura
  3. KGF 2
  4. Pushpa
  5. Karnan

Garuda Gamana Vrishabha Vahan

जर तुम्ही Kantara मधील काम पाहून Rishab Shetty चे फॅन झाला असाल तर त्याचा एक शानदार दाक्षिणात्य चित्रपट Garuda Gamana Vrishabha Vahana ओटीटीवर बघू शकता. हा चित्रपट Zee5 वर स्ट्रीम केली जाऊ शकते. चित्रपट कन्नड भाषेत आहे आणि याचे सबटाइटल इंग्लिशसह मल्याळममध्ये दिसतात. तसेच यात दोन मित्र शिवा आणि हरी मधील संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात राज बी. शेट्टी आणि ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत.

Asuran

साल 2019 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटासाठी धनुषला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे. असुरनमध्ये जोरदार अ‍ॅक्टिंग करून धनुषनं दर्शकांसह चित्रपट समीक्षकांची मने देखील जिंकली होती. या चित्रपटाची गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर बघू शकता. तसेच युट्युबवर देखील हा चित्रपट मोफत बघता येईल.

KGF 2

कन्नड सिनेसृष्टीतील धमाकेदार चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) देखील ओटीटीवर बघता येईल, जो अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर आहे. तुम्हाला आठवत असेल की मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यावर या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले होते. ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) मध्ये यश व्यतिरिक्त Sanjay Dutt, Raveena Tandon, Srinidhi Shetty आणि Anant Nag सारखे स्टार आहेत.

Pushpa

साउथ सुपरस्टार Allu Arjun चा चित्रपट Pushpa: The Rise हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर बघता येईल. Amazon Prime Video वरील हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. चित्रपटातील स्टार कास्ट पाहता यात टॉलीवुड अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.

Karnan

साउथचा सुपरस्टार धनुषचा चित्रपट कर्णन (Karnan) देखील अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बघता येईल. या चित्रपटाची गोष्ट सत्य घटनांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. तामिळनाडुमध्ये 90 च्या दशकात एका गावात ही घटना घडली होती, ज्यात मोठया प्रमाणावर पोलिसांनी गावकऱ्यांवर हल्ला केला होता. चित्रपटात धनुष व्यतिरिक्त लाल पॉल, योगी बाबू, नटराजन सुब्रमण्यम, राजिशा विजयन, गौरी जी किशन आणि लक्ष्मी प्रिया चंद्रामौली सारखे कलाकार आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-best-south-movies-like-kantara-to-watch-on-ott/feed/ 0
अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली https://www.91mobiles.com/marathi/south-movie-in-hindi-the-ghost-nagarjuna-film-ott-release-date/ https://www.91mobiles.com/marathi/south-movie-in-hindi-the-ghost-nagarjuna-film-ott-release-date/#respond Wed, 26 Oct 2022 07:31:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14330 The Ghost OTT Release Date: बॉलीवुड पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपट आवडणाऱ्या दर्शकांसाठी मोठी बातमी आली आहे. साउथ चित्रपट प्रेमींसाठी Telugu Star Nagarjuna (Akkineni Nagarjuna) चा चित्रपट The Ghost मोठ्या पदड्यानंतर ओटीटी (The Ghost Release On OTT) वर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटचा खुलासा झाला नव्हता की हा कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केला […]

The post अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
The Ghost OTT Release Date: बॉलीवुड पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपट आवडणाऱ्या दर्शकांसाठी मोठी बातमी आली आहे. साउथ चित्रपट प्रेमींसाठी Telugu Star Nagarjuna (Akkineni Nagarjuna) चा चित्रपट The Ghost मोठ्या पदड्यानंतर ओटीटी (The Ghost Release On OTT) वर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटचा खुलासा झाला नव्हता की हा कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. चला जाणून घेऊया नागार्जुनचा द घोस्ट (The Ghost) कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल.

या ओटीटीवर रिलीज होईल The Ghost

नेटफ्लिक्सनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट (Instagram) वर एक पोस्ट करून माहिती दिली आहे की नागार्जुन आणि सोनल चौहान स्टारर द घोस्टची ऑनलाइन स्ट्रीमिंग पुढील महिन्यात 2 नोव्हेंबरला होईल. म्हणजे जर तुम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघितला नसेल तर तुम्ही हा घर बसल्या पुढील महिन्यात 2 तारखेला Netflix वर बघू शकता. हे देखील वाचा: OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट

https://www.instagram.com/p/CkIAJIAuWsK/?utm_source=ig_embed&ig_rid=60c1daf5-ab8c-4ffb-9809-80253a644374

Praveen Sattaru द्वारे दिग्दर्शित ही Telugu action film थिएटर मध्ये 5 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आली होती. या चित्रपटाने दर्शकांची निराशा केली आणि थिएटर रिलीजनंतर एका महिन्यांनी ही ओटीटीवर रिलीज केली जात आहे.

द घोस्ट चित्रपटाची गोष्ट

इंटरपॉल एजेंट विक्रम (नागार्जुन) आणि त्याची प्रेमिका प्रिया (सोनल चौहान) दोघेही दुबईमध्ये काम करतात. त्यांचं खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य व्यवस्थित सुरु असतं. परंतु एका प्रसंगामुळे विक्रमची मानसिक स्थिती बिघडते आणि तो प्रियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. त्याला एक दिवस अनु (गुल पनाग) कडून कॉल येतो जिला तिची मुलगी अदितीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते, आणि ती विक्रमकडे मदत मागते.

अनू कोण आहे? ती विक्रमकडे का मदत मागते? अनू आणि अदितीचा जीव कोणामुळे धोक्यात आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी चित्रपट पाहावा लागेल. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

Netflix Plan In India

जर तुम्ही हा चित्रपट पाहू इच्छित असाल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे Netflix चा सर्वात स्वस्त मासिक प्लॅन आता फक्त 149 रुपयांमध्ये मिळतो. तसेच, प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांच्या ऐवजी 649 रुपये मंथली करण्यात आला आहे. 149 रुपयांचा प्लॅन फक्त Mobile Only आहे, त्यामुळे तुम्ही फक्त फोनवरच कंटेंट बघू शकाल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/south-movie-in-hindi-the-ghost-nagarjuna-film-ott-release-date/feed/ 0