OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट

भारतात काही प्रमुख शहरांमध्ये Reliance Jio चं सुपरफास्ट 5G Network तर आलं आहे परंतु त्यासाठी काही 5G स्मार्टफोन्स रेडी नाहीत. आता मोबाइल निर्माता OnePlus नं आपल्या काही निवडक डिवाइससाठी 5G सपोर्टचा अपडेट जारी केला आहे. या ओटीए (over-the-air-update) अपडेटच्या मदतीनं युजर्स आपल्या OnePlus Smartphone मध्ये 5G सेवा वापरू शकतील. नवीन अपडेट मिळवण्यासाठी युजर्सना सॉफ्टवेयर अपडेट डाउनलोड करावा लागेल, त्यानंतर मोबाइलमध्ये 5जी मॉडेम काम करू लागेल आणि भारतात उपलब्ध असलेली Jio 5G सर्व्हिस सहज वापरण्याची संधी मिळेल.

या वनप्लस फोन्सना मिळेल Reliance Jio 5G सपोर्ट

वनप्लसनं आपल्या OnePlus 10T, OnePlus 10 Pro आणि OnePlus 10R डिवाइससाठी 5G अपडेट जारी केला आहे. या तिन्ही स्मार्टफोनना वेगवेगळे अपडेट दिले जात आहेत. ज्याच्या मदतीनं 5G सपोर्टमध्ये मदत मिळेल. OnePlus 10T मध्ये सर्वात मोठा अपडेट मिळेल. ज्यात bug fixes आणि performance enhancements होतील. तसेच OnePlus 10 Pro मध्ये देखील सिक्योरिटी पॅच आणि महिन्याच्या अपडेट जारी केला जाईल. OnePlus 10R मध्ये देखील अँड्रॉइड सिक्योरिटी पॅचचा अपडेट दिला जात आहे. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

तुमच्या मोबाइलमध्ये अशाप्रकारे चेक करा 5G अपडेट

सध्या कंपनीनं सर्व वनप्लस डिवाइस अपडेट केले नाहीत. काही निवडक मोबाइल डिवाइसना 5G सपोर्ट दिला जात आहे. युजर्स आपल्या मोबाइलमध्ये चेक करू शकतात की त्यांना अपडेट मिळाला आहे की नाही. यासाठी युजर्सना सेटिंग्समध्ये जावं लागेल. ज्यात सिस्टम सेक्शनमध्ये सिस्टम अपडेटचा ऑप्शन मिळेल. जिथे युजर्स चेक करू शकतात की त्यांना लेटेस्ट अपडेट मिळाला आहे की नाही. हे देखील वाचा: Jio Phone 5G 2023: भारतीयांना 5जीचा नाद लावण्यासाठी अंबानी तयार; इतकी असू शकते 5G Phone ची किंमत

Jio 5G Welcome Offer how to get the invite 5G plans 5g speed

Jio 5G Welcome Offer

Reliance Jio नं 5G नेटवर्कची सुरुवात दसऱ्याच्या मुहूर्तावर केली आहे. कंपनीनं Jio 5G Welcome Offer अंतगर्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि वाराणसीमध्ये आपल्या सर्व्हिसेस सुरु केल्यात आहेत. इथल्या युजर्सना त्यांच्या 5G स्मार्टफोनवर कंपनीची सुपरफास्ट सेवा वापरता येईल. परंतु ही सेवा सध्या बीटा ट्रायलमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला कंपनीकडून इन्व्हाइट येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या 4G सिमवरच 5G सेवा वापरू शकाल. तसेच यासाठी 4G रिचार्ज प्लॅन्सचा देखील वापर करता येईल. कंपनीनं शिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड आणि कमर्शियल हाउसमध्ये Jio 5G WiFi services देखील सुरु केली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here