अजून एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट येतोय OTT वर; Nagarjuna च्या ‘द घोस्ट’ ची रिलीज डेट समजली

The Ghost OTT Release Date: बॉलीवुड पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपट आवडणाऱ्या दर्शकांसाठी मोठी बातमी आली आहे. साउथ चित्रपट प्रेमींसाठी Telugu Star Nagarjuna (Akkineni Nagarjuna) चा चित्रपट The Ghost मोठ्या पदड्यानंतर ओटीटी (The Ghost Release On OTT) वर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटचा खुलासा झाला नव्हता की हा कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. चला जाणून घेऊया नागार्जुनचा द घोस्ट (The Ghost) कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल.

या ओटीटीवर रिलीज होईल The Ghost

नेटफ्लिक्सनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट (Instagram) वर एक पोस्ट करून माहिती दिली आहे की नागार्जुन आणि सोनल चौहान स्टारर द घोस्टची ऑनलाइन स्ट्रीमिंग पुढील महिन्यात 2 नोव्हेंबरला होईल. म्हणजे जर तुम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघितला नसेल तर तुम्ही हा घर बसल्या पुढील महिन्यात 2 तारखेला Netflix वर बघू शकता. हे देखील वाचा: OnePlus च्या ‘या’ डिवाइसना मिळाला Jio 5G चा सुपर स्पीड; इथे पाहा सर्व फोन्सची लिस्ट

https://www.instagram.com/p/CkIAJIAuWsK/?utm_source=ig_embed&ig_rid=60c1daf5-ab8c-4ffb-9809-80253a644374

Praveen Sattaru द्वारे दिग्दर्शित ही Telugu action film थिएटर मध्ये 5 ऑक्टोबरला रिलीज करण्यात आली होती. या चित्रपटाने दर्शकांची निराशा केली आणि थिएटर रिलीजनंतर एका महिन्यांनी ही ओटीटीवर रिलीज केली जात आहे.

द घोस्ट चित्रपटाची गोष्ट

इंटरपॉल एजेंट विक्रम (नागार्जुन) आणि त्याची प्रेमिका प्रिया (सोनल चौहान) दोघेही दुबईमध्ये काम करतात. त्यांचं खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य व्यवस्थित सुरु असतं. परंतु एका प्रसंगामुळे विक्रमची मानसिक स्थिती बिघडते आणि तो प्रियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. त्याला एक दिवस अनु (गुल पनाग) कडून कॉल येतो जिला तिची मुलगी अदितीच्या सुरक्षेची चिंता सतावत असते, आणि ती विक्रमकडे मदत मागते.

अनू कोण आहे? ती विक्रमकडे का मदत मागते? अनू आणि अदितीचा जीव कोणामुळे धोक्यात आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी चित्रपट पाहावा लागेल. हे देखील वाचा: Safe Browser List: Google Chrome हॅक होण्याची शक्यता जास्त, ‘हे’ आहेत जास्त सुरक्षित ब्राउजर

Netflix Plan In India

जर तुम्ही हा चित्रपट पाहू इच्छित असाल तर तुमच्याकडे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे Netflix चा सर्वात स्वस्त मासिक प्लॅन आता फक्त 149 रुपयांमध्ये मिळतो. तसेच, प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांच्या ऐवजी 649 रुपये मंथली करण्यात आला आहे. 149 रुपयांचा प्लॅन फक्त Mobile Only आहे, त्यामुळे तुम्ही फक्त फोनवरच कंटेंट बघू शकाल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here