Tecno Pova 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 16:29:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh च्या बॅटरीसह Tecno Pova 4 ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-50mp-camera-phone-tecno-pova-4-launched-in-india-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-50mp-camera-phone-tecno-pova-4-launched-in-india-check-price-and-specifications/#respond Wed, 07 Dec 2022 06:30:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15738 स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनी टेक्नोनं काही दिवसांपूर्वी Tecno Pova 4 आणि Tecno Pova 4 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केले होते. आता यातील 13GB रॅम, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन कंपनीनं भारतीय बाजारात लाँच केला आहे. चला जाणून घेऊया टेक्नोच्या या लेटेस्ट […]

The post 6000mAh च्या बॅटरीसह Tecno Pova 4 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनी टेक्नोनं काही दिवसांपूर्वी Tecno Pova 4 आणि Tecno Pova 4 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केले होते. आता यातील 13GB रॅम, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन कंपनीनं भारतीय बाजारात लाँच केला आहे. चला जाणून घेऊया टेक्नोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची सविस्तर माहिती.

Tecno Pova 4 ची किंमत

Tecno Pova 4 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं भारतात सादर केला आहे. या हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. Tecno Pova 4 स्मार्टफोनच्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Uranolith Grey आणि Cryolite Blue कलर्समध्ये विकत घेता येईल. टेक्नोच्या या फोनची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावर 13 डिसेंबरपासून सुरु होईल. हे देखील वाचा: स्टायलिश स्मार्टफोन हवा? मग OPPO A78 5G साठी काही काळ थांबा; लाँच पूर्वीच वेबसाइटवर लिस्ट

Tecno Pova 4 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1640 × 720 पिक्सल आहे. तसेच फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आली आहे. या फोनमध्ये DTS ऑडियो आणि स्टीरियो स्पिकर सेटअप देण्यात आला आहे.

लेटेस्ट Pova 4 फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. तसेच हा फोन 5GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे फोनचा एकूण रॅम वाढवून 13GB करता येतो. टेक्नोचा हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित HiOS 12 वर चालतो.

Tecno Pova 4 स्मार्टफोन सीरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेऱ्यासह AI लेन्स आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर मिळतो, जो LED फ्लॅशसह येतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये चार्जिंगसाठी Type-C पोर्ट आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 2,500 रुपयांमध्ये तुमचा होईल 12 5G बँड असलेला फोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा मिळवा स्वस्तात

सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो उजवीकडे असलेल्या पावर बटनमध्ये एम्बेड करण्यात आला आहे. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे, ज्याची मदत से फोन की स्टोरेज को 2TB पर्यंत वाढवता येते. या फोनचे वजन 212 ग्राम आहे, हा फोन IPX2 रेटिंगसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Dual-SIM, 4G, WiFi, Bluetooth 5.0, NFC, GPS, आणि Glonass चा सपोर्ट मिळतो.

The post 6000mAh च्या बॅटरीसह Tecno Pova 4 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-50mp-camera-phone-tecno-pova-4-launched-in-india-check-price-and-specifications/feed/ 0
Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/#respond Fri, 02 Dec 2022 05:30:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15599 टेक्नो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये Tecno Pova 4 लाँच केला होता जो आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या घोषणेपुर्वीच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात 7 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो तसेच टेक्नो पोवा 4 ची किंमत (Tecno Pova 4 Price) 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 […]

The post Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये Tecno Pova 4 लाँच केला होता जो आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या घोषणेपुर्वीच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात 7 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो तसेच टेक्नो पोवा 4 ची किंमत (Tecno Pova 4 Price) 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 मध्ये Memory fusion टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे हा स्मार्टफोन 13GB RAM (8GB+5GB) ची पावर देऊ शकतो.

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की टेक्नो भारतात आपला नवीन स्मार्टफोन पोवा 4 लाँच करू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Tecno Pova 4 स्मार्टफोन 7 डिसेंबरच्या आसपास भारतीय बाजारात येऊ शकतो तसेच या टेक्नो मोबाइलची किंमत 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 ची लाँच डेट आणि याच्या प्राइस सोबतच आम्हाला या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Pova 4 Specifications

टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे Tecno Pova 4 स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. भारतात हा स्मार्टफोन 128जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी टेक्नो पोवा 4 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Phantom X2 series इंडिया लाँच डेट आणि प्राइस

इंडस्ट्री सोर्सकडून आम्हाला टेक्नो पोवा 4 सोबतच आगामी Tecno Phantom X2 series ची माहितीत देखील देण्यात आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 7 डिसेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते आणि आमच्या सूत्रांनुसार टेक्नो फँटम एक्स2 सीरीज जानेवारी 2023 मध्ये भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते. हे देखील वाचा: 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर 7 हजारांची सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

टेक्नो फँटम एक्स2 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात ज्यांची नावे Tecno Phantom X2 आणि Tecno Phantom X2 Pro अशी असू शकतात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टेक्नो फँटम एक्स2 स्मार्टफोनची किंमत 40,000 च्या बजेटमध्ये असू शकते तर टेक्नो फँटम एक्स2 प्रो स्मार्टफोन 50 हजारांच्या रेंज मध्ये भारतात लाँच होऊ शकतो. किंमतीवरून हे फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन वाटत आहेत आणि फीचर्स देशील किंमतीला साजेशे असतील अशी अपेक्षा आहे.

The post Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/feed/ 0