8GB रॅम असलेल्या 5G Phone वर सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G

Motorola नं काही दिवसांपूर्वी मिडबजेट सेगमेंटमध्ये एक स्वस्त 5G फोन सादर केला होता. इतर कंपन्या 1 किंवा 2 बँडसह फोन सादर करत असताना मोटोरोलानं 12 5G बँडच्या सपोर्टसह Moto G62 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आता हा हँडसेट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह विकला जात आहे. Moto G62 स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी असे दमदार फीचर्स मिळतात. मोटोरोलाचा हा 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून बँक आणि एक्सचेंज ऑफरसह खूप स्वस्तात विकत घेता येईल. इथे आम्ही तुम्हाला Motorola G62 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Motorola Moto G62 5G ऑफर

Motorola G62 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध झाला आहे, ज्यावर 6000 रुपयांची सूट मिळत आहे. तर फोनचा दुसरा 8GB रॅम असलेल्या व्हेरिएंट 7000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त हा फोन HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Moto G62 5G विकत घेण्यासाठी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच Discovery+ च्या सब्सक्रिप्शनवर 25 टक्के डिस्काउंट देखील मिळेल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून या हँडसेटची प्राइस आणखी कमी करू शकता. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळतो. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here