E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) आज भारतीय नागरिकांसाठी नवीन डिजिटल करन्सी (Digital Rupee) लाँच केली आहे. सर्वप्रथम ही रिटेल बिजनेससाठी वापरण्यात येईल. ही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC गुरुवारी लाँच करण्यात आली आहे. आता ही डिजिटल करन्सी आल्यामुळे भारतीय युजर्स सुरक्षितरित्या व्यवहार करू शकतील. तसेच डिजिटल करन्सीच्या पायलट प्रोजेक्ट अंतगर्त सरकार सर्व माहिती गोळा करेल आणि यात काही बदल देखील होऊ शकतात. चला जाणून घेऊया डिजिटल करन्सी कशी वापरता येईल आणि ही क्रिप्टो करन्सी (cryptocurrency) पेक्षा वेगळी का आहे.

Digital Rupee चा वापर

1 डिसेंबर 2022 ला लाँच करण्यात आलेला Digital Rupee चा पायलट प्रोजेक्ट आहे. जो सर्वप्रथम ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या छोट्या ग्रुप्समध्ये टेस्ट केला जाईल. सुरुवातीला हा प्रोजेक्ट मुंबई, नवीन दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर सारख्या चार शहरांमध्ये एंट्री करेल. इथले ग्राहक आणि व्यापारी digital rupee (e₹-R) किंवा e-rupee चा वापर करू शकतील. या चार शहरांमध्ये डिजिटल करन्सीला स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचा सपोर्ट असेल. त्यानंतर ही सेवा अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, इंदौर, कोची, लखनऊ, पटना आणि शिमला सारख्या शहरांमध्ये उपलब्ध होईल. जिथे बँक ऑफ बडौदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यात सहभागी होतील.

e-rupee म्हणजे काय

नवीन ई-रुपया कॅशची जागा घेणारी एक इलेक्ट्रॉनिक करन्सी आहे. जो खास करून रिटेल व्यवहारांसाठी वापरला जाणार आहे. हा रुपया खूप सुरक्षित आहे ही याची खासियत आहे. कारण ही केंद्रीय बँकेची थेट जबाबदारी आहे. याबाबत आरबीआयनं म्हटलं आहे की, “सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) केंद्रीय बँकेद्वारे डिजिटल स्वरूपात जारी करण्यात आलेलं कायदेशीर चलन आहे. हे चलन कागदी चालनाप्रमाणे आहे आणि त्यानुसार याची देवाणघेवाण करता येईल परंतु याचं स्वरूप वेगळं आहे.”

कशाप्रकारे वापरता येईल Retail digital rupee

e₹-R डिजिटल टोकन म्हणून युजर्सना सुविधा देईल, ज्याला कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. तुम्ही याचा वापर नोट आणि नाण्याप्रमाणे करू शकता. आरबीआयनुसार, युजर्स बँकेद्वारे सादर करण्यात आलेल्या आणि मोबाइल फोनवरील डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून देखील ई-आरचे व्यवहार करू शकतील. हा व्यवहार पर्सन टू पर्सन (P2P) आणि पर्सन टू मर्चंट (P2M) दोन्ही प्रकारे करता येईल. तसेच व्यापारी क्यूआर कोड (QR Code) चा देखील वापर करू शकतील. “ई-आर” नोटांइतकं सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे, तसेच यावर व्याज मिळणार नाही आणि याचे रूपांतर इतर स्वरूपात करता येईल.

e-rupee चे फायदे

भारतात सीबीडीसीचे अनेक फायदे असतील, ज्यात प्रमुख कॅश मॅनेजमेंटमध्ये येणारा खर्च कमी होईल. तसेच आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देणे, पेमेंट प्रणालीमध्ये लवचिकता, कार्यक्षमता आणि नावीन्य आणणे. तसेच, e-rupee मुळे जनतेची जोखीम कमी होईल.

क्रिप्टो आणि डिजिटल रुपया मधील फरक

RBI चा डिजिटल रुपया किंवा सीबीडीसी ब्लॉकचेन आणि अन्य टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आला आहे. क्रिप्टो देखील ब्लॉकचेनचा वापर करतं परंतु तिथे सेंट्रल बँक नसते. डिजिटल रुपया लीगल टेंडरचं डिजिटल स्वरूप आहे, जे केंद्रीय बँकेच्या नियंत्रणात असेल. त्याउलट क्रिप्टोकरन्सी एक डिजिटल करन्सी आहे, जी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या नियंत्रणात नसते. क्रिप्टोकरन्सी कोणत्याही सरकारी संस्थेद्वारे चालवली जात नाहीत आणि क्रिप्टोचे मूल्य मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबुन असतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here