Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

टेक्नो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये Tecno Pova 4 लाँच केला होता जो आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या घोषणेपुर्वीच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात 7 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो तसेच टेक्नो पोवा 4 ची किंमत (Tecno Pova 4 Price) 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 मध्ये Memory fusion टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे हा स्मार्टफोन 13GB RAM (8GB+5GB) ची पावर देऊ शकतो.

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की टेक्नो भारतात आपला नवीन स्मार्टफोन पोवा 4 लाँच करू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Tecno Pova 4 स्मार्टफोन 7 डिसेंबरच्या आसपास भारतीय बाजारात येऊ शकतो तसेच या टेक्नो मोबाइलची किंमत 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 ची लाँच डेट आणि याच्या प्राइस सोबतच आम्हाला या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Pova 4 Specifications

टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे Tecno Pova 4 स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. भारतात हा स्मार्टफोन 128जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी टेक्नो पोवा 4 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Phantom X2 series इंडिया लाँच डेट आणि प्राइस

इंडस्ट्री सोर्सकडून आम्हाला टेक्नो पोवा 4 सोबतच आगामी Tecno Phantom X2 series ची माहितीत देखील देण्यात आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 7 डिसेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते आणि आमच्या सूत्रांनुसार टेक्नो फँटम एक्स2 सीरीज जानेवारी 2023 मध्ये भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते. हे देखील वाचा: 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर 7 हजारांची सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

टेक्नो फँटम एक्स2 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात ज्यांची नावे Tecno Phantom X2 आणि Tecno Phantom X2 Pro अशी असू शकतात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टेक्नो फँटम एक्स2 स्मार्टफोनची किंमत 40,000 च्या बजेटमध्ये असू शकते तर टेक्नो फँटम एक्स2 प्रो स्मार्टफोन 50 हजारांच्या रेंज मध्ये भारतात लाँच होऊ शकतो. किंमतीवरून हे फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन वाटत आहेत आणि फीचर्स देशील किंमतीला साजेशे असतील अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here