Tecno Spark 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 07:23:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,499 रुपयांमध्ये 11GB रॅम असलेला स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल Tecno Spark 9 https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-cheapest-smartphone-tecno-spark-9-launch-india-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-cheapest-smartphone-tecno-spark-9-launch-india-check-price-and-specifications/#respond Mon, 18 Jul 2022 08:59:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11484 Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये वर्चुअल रॅमच्या मदतीनं एकूण 11GB रॅमची ताकद मिळते.

The post 8,499 रुपयांमध्ये 11GB रॅम असलेला स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल Tecno Spark 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोनं काही दिवसांपूर्वी भारतात आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Tecno Spark 8P स्मार्टफोन लाँच केला होता. टेक्नो स्पार्क 8पी 50MP Camera असलेल्या भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आता असाच एक विक्रम कंपनीच्या नव्या स्मार्टफोननं केला आहे. Tecno नं आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Tecno Spark 9 भारतात लाँच केला आहे. याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि इतक्या कमी किंमतीत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात 11GB रॅम देण्यात आला आहे. टेक्नोचा हा दमदार बजेट स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India च्या माध्यमातून ग्राहकांना विकत घेता येईल. Tecno Spark 9 स्मार्टफोनचे काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला टेक्नोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Tecno Spark 9 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6-इंच HD+ 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले
  • Mediatek Helio G37 प्रोसेसर
  • 11GB रॅम, 128GB स्टोरेज
  • 5,000mAh बॅटरी
  • 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा
  • Android 12

Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात वॉटरड्रॉप नॉच डिजाईन दिली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे एकूण 11GB रॅमची ताकद आवश्यकता असेल तेव्हा मिळवता येते. तसेच फोनमध्ये 128GB ची स्टोरेज मिळते. टेक्नोच्या या फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 9 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP चा मुख्य सेन्सर आणि सेकंडरी AI कॅमेरा आहे. रियर पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देखील मिळतो. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या नव्या टेक्नो फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. टेक्नोचा हा फोन लेटेस्ट Android 12 वर चालतो.

Tecno Spark 9 ची किंमत

Tecno Spark 9 स्मार्टफोनचा भारतात एकच व्हेरिएंट दाखल झाला आहे, ज्याची किंमत कंपनीनं 9499 रुपये ठेवली आहे. परंतु कंपनीनं लाँच ऑफरची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीसाठी हा 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. त्यामुळे Tecno Spark 9 स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये हा फोन फक्त 8499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन 23 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर सुरु होणाऱ्या प्राईम डे सेलमध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: 125W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेल्या iQOO 9T 5G बाबत मोठा खुलासा

The post 8,499 रुपयांमध्ये 11GB रॅम असलेला स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल Tecno Spark 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-cheapest-smartphone-tecno-spark-9-launch-india-check-price-and-specifications/feed/ 0
11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-9-india-launch-specifications-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-9-india-launch-specifications-and-price/#respond Mon, 18 Jul 2022 06:06:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11473 Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरीसह सादर केला जाईल.

The post 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नो पुन्हा एकदा भारतीय बाजारात रेडमी रियलमीला आव्हान देण्यासाठी तयार आहे. काही दिवसांपूर्वी Tecno Spark 8P स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनी Tecno Spark 9 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करण्यासाठी तयार आहे. कंपनीनं एक ट्वीट करून या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. त्यानुसार, Tecno चा हा फोन भारतात 18 जुलैला लाँच केला जाईल. हा आगामी स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर लिस्ट झाला आहे. टेक्नोच्या आगामी स्मार्टफोनच्या लँडिंग पेजवरून स्मार्टफोनच्या काही मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. टेक्नोचा हा फोन Tecno Spark 8 चा उत्तराधिकारी आहे जो गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. पुढे आम्ही Tecno Spark 9 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती दिली आहे.

अ‍ॅमेझॉन लिस्टिंग

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Tecno Spark 9 स्मार्टफोनचं लँडिंग पेज लाईव्ह झालं आहे. हा 10,000 रुपयांमध्ये येणारा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 11GB रॅम मिळेल. टेक्नोच्या या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये जियोमॅट्रिक पॅटर्न देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात येईल, ज्यात दोन कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश मिळेल. हा फोन इनफिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. हे देखील वाचा: नवीन फोन घेताय? थांबा! जबरदस्त कॅमेऱ्यासह Oppo Reno8 आणि Reno8 Pro येतायत भारतात

Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात येईल, वॉटरड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर देण्यात येईल. यात 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, म्हणजे एकूण 11GB रॅमचा सपोर्ट मिळेल. तसेच फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळेल. या टेक्नो फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल. हा फोन Android 12 वर चालेल.

Tecno Spark 8P चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 8P स्मार्टफोनमध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.6 इंचाचा हा FHD+ डिस्प्ले 401PPI पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. या टेक्नो मोबाईलचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.1 टक्के आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित HiOS 7.6 वर चालतो ज्यात प्रोसेसिंगसाठी ARM Cortex-A75 ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच Mediatek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन Arm Mali-G52 GPU ला सपोर्ट करतो जो 1GHz Graphics core वर चालतो.

Tecno Spark 8P स्मार्टफोन 4GB RAM सह लाँच झाला आहे, सोबतीला 3जीबी वचुर्अल रॅम देण्यात आल्यामुळे एकूण 7GB RAM ची परफॉर्मन्स फोनमधून मिळते. या फोनमध्ये 64GB Storage देण्यात आली आहे जी 512GB पर्यंत वाढवता येते. हा फोन IPX2 स्प्लॅश रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. Tecno Spark 8P मध्ये 5000mAh Battery देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये हा फोन 25 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय iQOO 9T; लाँच पूर्वीच Unboxing व्हिडीओ वायरल

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलच्या अन्य दोन लेन्सला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो तसेच एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील ड्युअल फ्लॅशलाईट दिली आहे.

The post 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-9-india-launch-specifications-and-price/feed/ 0
Tecno Spark 9 लवकरच येणार बाजारात; कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-phone-under-10000-soon-to-launch-in-india-by-tecno/ https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-phone-under-10000-soon-to-launch-in-india-by-tecno/#respond Wed, 06 Jul 2022 10:30:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11167 Hongkong मधील स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno नेहमीच आपल्या ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन देण्याचं काम करत असते. कंपनी आता नवा विक्रम आपल्या नावे करण्याची तरी करत आहे. टेक्नो भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो 10 हजारांच्या बजेटमध्ये 11GB रॅम देईल. या रेंजमधील इतर हँडसेट 3 ते 4 जीबी रॅम देतात. परंतु टेक्नोच्या Spark सिरीज […]

The post Tecno Spark 9 लवकरच येणार बाजारात; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hongkong मधील स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno नेहमीच आपल्या ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन देण्याचं काम करत असते. कंपनी आता नवा विक्रम आपल्या नावे करण्याची तरी करत आहे. टेक्नो भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो 10 हजारांच्या बजेटमध्ये 11GB रॅम देईल. या रेंजमधील इतर हँडसेट 3 ते 4 जीबी रॅम देतात. परंतु टेक्नोच्या Spark सिरीज आगामी Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 11GB RAM मिळणार आहे. कंपनी 7 जुलैला आपला स्वस्त फोन Spark 8P दखल लाँच करणार आहे जो भारतीय लाँचच्या आधी जागतिक बाजारात देखील सादर करण्यात आला आहे.

इथून घेता येईल विकत

कंपनीनं एक ट्विटकरून सांगितलं आहे की, Tecno Spark 9 देखील लवकरच सादर केला जाईल. परंतु या ट्विटमध्ये लाँच डेटची मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 11GB रॅम मिळेल, असा दावा कंपनीनं केलं आहे. या स्मार्टफोनची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. या फोनसाठी अ‍ॅमेझॉन इंडियावर एक मायक्रो साइट देखील बनवण्यात आली आहे. या लिस्टिंगमधून आगामी डिवाइसच्या फीचर्ससह किंमतीची माहिती देण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉनच्या लिस्टिंगनुसार Tecno Spark 9 ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी बॅटरी मिळेल. फोनमध्ये 11GB रॅम देण्यात येईल, जो या रेंजमध्ये खूप दुर्मिळ आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल, तसेच प्रोसेसिंगसाठी ऑक्टा कोर मीडियाटेक G37 ची ताकद देण्यात येईल. तसेच या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल.

Tecno Spark 8P चे स्पेसिफिकेशन

Tecno Spark 8P स्मार्टफोनमध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो असलेला 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. हा आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. TECNO Spark 8P अँड्रॉइड 11 आउट आफ द बॉक्ससह लाँच केला जाईल आहे. सोबतीला ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेटची ताकद मिळेल.

फोटोग्राफीसाठी TECNO Spark 8P मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. जोडला अन्य दोन रियर सेन्सर असतील, ज्यात एक एआय सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

TECNO Spark 8P ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन मिळेल. तसेच या टेक्नो मोबाईलमध्ये फेस अनलॉक फीचर देखील मिळेल. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post Tecno Spark 9 लवकरच येणार बाजारात; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-phone-under-10000-soon-to-launch-in-india-by-tecno/feed/ 0