सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय iQOO 9T; लाँच पूर्वीच Unboxing व्हिडीओ वायरल

iQOO 9 सीरीज स्मार्टफोन यावर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्यात आली होती. कंपनीनं iQOO 9, iQOO 9 Pro, आणि iQOO 9 SE हे तीन हँडसेट देशात सादर केले आहेत. यातील प्रो व्हेरिएंटमध्ये आयकूनं क्वॉलकॉमच्या तत्कालीन शक्तिशाली प्रोसेसरचा वापर केला होता. आता क्वॉलकॉमच्या नव्या आणि शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 9T लाँच करण्याची योजना कंपनी बनवत आहे. आता भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर iQOO 9T स्मार्टफोन लिस्ट झाला आहे. तसेच लाँचपूर्वीच या डिवाइसचा एक अनबॉक्सिंग व्हिडीओ देखील युट्युबवर वायरल झाला आहे.

अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमधून समजले आहे की iQOO 9T स्मार्टफोनची डिजाइन iQOO 10 सारखीच असेल. लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनच्या रियर कॅमेरा मॉड्यूलची डिजाइन समोर आली आहे. आयकूचा हा स्मार्टफोन कार कंपनी BMW Motorsport च्या पार्टनशिपसह देखील सादर केला जाईल.

iQOO 9T स्मार्टफोनच्या भारतीय लाँच पूर्वीच या स्मार्टफोनच्या रियर पॅनलची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स एक Youtube व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहेत. यह अनबॉक्सिंग व्हिडीओ Tech Burner युट्युब चॅनेलनं शेयर केला आहे. या व्हिडीओमधून आगामी आयकू स्मार्टफोनमधील Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरचा खुलासा झाला आहे.

iQOO 9T Unboxing

iQOO 9T स्मार्टफोनच्या अनबॉक्सिंग व्हिडीओमधून रियर डिजाइन लोकांसमोर आली आहे. बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम बटन आणि पावर बटन देण्यात आले आहेत. हा फोन ब्लॅक आणि BMW मोटरस्पोर्ट एडिशनमध्ये सादर केला जाईल. दोन्ही व्हेरिएंट ड्युअल टोन डिजाइनसह सादर करण्यात येतील. या फोनचा ब्लॅक कलर व्हेरिएंट iQOO ब्रँडिंगसह सादर केला जाईल तसेच ग्लॉसी ग्लास फिनिशिंग मिळेल. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी V1+ इमेजिंग चिप देण्यात आली आहे.

BMW Motorsport एडिशन बद्दल बोलायचे तर हा ड्युअल टोन डिजाइनसह येतो. फोनचा टॉप मॉड्यूल काळ्या रंगाचा आहे ज्यात कॅमेरा मॉड्यूल देखील देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलचा दुसरा भाग व्हाईट कलरचा आहे, ज्यात BMW स्ट्रिप दिसते. या फोनच्या फ्रंट डिजाइनची माहिती मात्र मिळाली नाही.

iQOO 9T चे स्पेसिफिकेशन

iQOO 9T स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसरसह येईल जो आतापर्यंतचा शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन प्रोसेसर आहे. सोबतीला कंपनी LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज देईल. या फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी V1+ इमेजिंग चिपसेटचा वापर करण्यात येईल. या फोनचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50MP Samsung GN5 आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

iQOO 9T फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. आयकूच्या या फोनबद्दल बोलले जात आहे की यात 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. iQOO 9T चा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असू शकतो, सोबतीला 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 12MP चा तिसरा कॅमेरा सेन्सर असेल. तसेच यात 16MP चा सेल्फी कॅमेरा सेन्सर दिला जाईल. आगामी आयकू फोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here